सलग दुसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी घेतली पंतप्रधान पदाची शपथ, ५७ मंत्र्यांसह शपथ सोहळा संपन्न!

नवीदिल्ली:- आज सायंकाळी ७ वाजून ४ मिनिटांनी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ५७ मंत्र्यांनी शपथ घेतली असून शानदार शपथ सोहळ्यास देश विदेशातील मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात देशविदेशातून आलेल्या तब्बल ८ हजार मान्यवरांच्या उपस्थित अतिशय दमट आणि ४० अंश सेल्सियस तापमानात १२३ मिनिटे शपथविधीचा सोहळा चालला. २४ कॅबिनेट, स्वतंत्र प्रभार असलेले ९ राज्यमंत्री, तर २४ राज्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा बिमस्टेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या तसेच देश-विदेशातील नामवंतांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यानिमित्ताने भारताला नरेंद्र मोदींच्या रूपाने समर्थ नेतृत्व लाभले असून पुढील पाच वर्षे भारतासाठी त्यांच्याकडून निश्चितच दैदिप्यमान कार्य संपन्न होईल; अशी आशा भारतीयांची आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात लोकसभेच्या ४५ व राज्यसभेच्या १३ सदस्यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या मंत्रिमंडळातील अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, वाणिज्य, व्यापार आणि नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू, आरोग्यमंत्री जगतप्रकाश नड्डा, माहिती व प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड, महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी या बड्या मंत्र्यांना वगळण्यात आले आहे. याशिवाय अनेक राज्यमंत्र्यांनाही डच्चू देण्यात आला आहे.

२४ कॅबिनेट मंत्री-

१) राजनाथ सिंग,
२) अमित शहा,
३) नितीन गडकरी,
४) सदानंद गौडा,
५) निर्मला सीतारामन,
६) रामविलास पासवान,
७) नरेंद्रसिंह तोमर,
८) रवीशंकर प्रसाद,
९) श्रीमती हरसिमरत कौर बादल,
१०) थावरचंद गहलोत,
११) सुब्रमण्यम जयशंकर,
१२) रमेश पोखरियाल निःशंक,
१३) अर्जुन मुंडा,
१४) स्मृती इराणी,
१५) डॉ. हर्षवर्धन,
१६) प्रकाश जावडेकर,
१७) पीयूष गोयल,
१८) धर्मेंद्र प्रधान,
१९) मुख्तार अब्बास नकवी,
२०) प्रल्हाद जोशी,
२१) महेंद्रनाथ पांडे,
२२) अरविंद सावंत,
२३) गिरीराज सिंह
२४ गजेंद्रसिंह शेखावत

नऊ राज्यमंत्र्यांना स्वतंत्र प्रभार

१) संतोष गंगवार,
२) राव इंद्रजीत सिंह,
३) श्रीपाद नाईक,
४) डॉ. जितेंद्र सिंह,
५) किरण रिजीजू,
६) प्रल्हादसिंह पटेल,
७) आर. के. सिंह,
८) हरदीपसिंह पुरी,
९) मनसुख मंडाविया

२४ राज्यमंत्री

१) फग्गनसिंह कुलस्ते,
२) अश्विनीकुमार चौबे,
३) अर्जुनराम मेघवाल,
४) जनरल व्ही. के. सिंह,
५) कृष्णपाल गुर्जर,
६) रावसाहेब दानवे पाटील,
७) जी. किशन रेड्डी,
८) पुरुषोत्तम रुपाला,
९) रामदास आठवले,
१०) साध्वी निरंजन ज्योती,
११) बाबूल सुप्रियो,
१२) संजीव बालियान,
१३) संजय धोत्रे,
१४) अनुराग ठाकूर,
१५) सुरेश बसप्पा आंगडी,
१६) नित्यानंद राय,
१७) रतनलाल कटारिया,
१८) व्ही. मुरलीधरन,
१९) रेणुका सिंह,
२०) सोमप्रकाश,
२१) रामेश्वर तेली,
२२) प्रताप सारंगी,
२३) कैलाश चौधरी,
२४) देवश्री चौधरी

You cannot copy content of this page