केंद्र सरकारचे खाते वाटप जाहीर, अमित शहा गृहमंत्री तर राजनाथ सिंह यांची संरक्षणमंत्री

नवीदिल्ली:- कालच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या नव्या सरकारच्या मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर झालं आहे. लोकसभा निवडणूक जिंकून प्रथमच लोकसभेत निवडून आलेले भाजपाध्यक्ष व मोदींचे विश्वासू सहकारी अमित शहा गृहमंत्रीपदी आणि राजनाथ सिंह यांची संरक्षण मंत्रीपदी निवड झाली असून निर्मला सीतारामन यांना अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, पीयूष गोयल यांच्याकडील खाती तशीच ठेवण्यात आली आहेत. नेहमीप्रमाणे शिवसेनेला दुय्यम दर्जाचे अवजड उद्योग खाते मिळाले आहे.

मंत्रीमंडळाचे खातेवाटप पुढीलप्रमाणे:-

कॅबिनेट मंत्री

पंतप्रधान – नरेंद्र मोदी
संरक्षणमंत्री – राजनाथ सिंह
गृहमंत्री – अमित शहा
केंद्रीय भूपृष्ठ व परिवहन – नितीन गडकरी
अर्थ व कंपनी व्यवहार – निर्मला सीतारामन
परराष्ट्र – एस. जयशंकर
महिला-बालकल्याण – स्मृती इराणी
रेल्वे – पीयूष गोयल
आरोग्य, विज्ञान-तंत्रज्ञान – डॉ. हर्षवर्धन
मनुष्यबळ विकास – रमेश पोखरियाल निशंक
माहिती व प्रसारण – प्रकाश जावडेकर
सामाजिक न्याय – थावरचंद गेहलोत
कृषिमंत्री – नरेंद्रसिंह तोमर
खते व रसायन – सदानंद गौडा
संसदीय कामकाज व खाण – प्रल्हाद जोशी
अन्न व पुरवठा, ग्राहक संरक्षण – रामविलास पासवान
कायदा – रवीशंकर प्रसाद
आदिवासी विकास – अर्जुन मुंडा
अल्पसंख्याक – मुख्तार अब्बास नक्वी
कौशल्य विकास – महेंद्र नाथ पांडे
अन्न प्रक्रिया उद्योग – हरसिमरत कौर बादल
अवजड उद्योग – अरविंद सावंत
पशूपालन, दूग्धविकास, मत्स्यपालन – गिरीराज सिंह
जलसंपदा – गजेंद्रसिंह शेखावत

राज्यमंत्री – स्वतंत्र प्रभार

श्रम व रोजगार – संतोषकुमार गंगवार
सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी – राव इंद्रजीत सिंह
आयुष व संरक्षण – श्रीपाद नाईक
पीएमओ, अणुऊर्जा – डॉ. जीतेंद्र सिंह
युवा, क्रीडा, अल्पसंख्याक – किरेन रिजीजू
सांस्कृतिक, पर्यटन – प्रल्हादसिंह पटेल
ऊर्जा मंत्री, कौशल्यविकास – राजकुमार सिंह
नागरी उड्डाण, वाणिज्य, गृहनिर्माण व नगरविकास – हरदीपसिंह पुरी
जहाजबांधणी, खते व रसायन – मनसुखलाल मांडवीय

राज्यमंत्री

पोलाद उद्योग – फग्गनसिंह कुलस्ते
आरोग्य व कुटुंबकल्याण – अश्विनीकुमार चौबे
संसदीय कामकाज, अवजड उद्योग – अर्जुनराम मेघवाल
रस्ते, परिवहन, महामार्ग – व्ही. के. सिंह
सामाजिक न्याय व सबलीकरण – किशनपाल
ग्राहक संरक्षण, अन्न व नागरी पुरवठा – रावसाहेब दानवे
गृह – जी. किशन रेड्डी
कृषी – पुरुषोत्तम रुपाला
सामाजिक न्याय व सबलीकरण – रामदास आठवले
ग्रामीण विकास – साध्वी निरंजना ज्योती
वन व पर्यावरण – बाबुल सुप्रियो
पशूपालन, दूग्धविकास, मत्सपालन – डॉ. संजीवकुमार बालियान

You cannot copy content of this page