बातम्या सिंधुदुर्ग जिल्हा माहिती कार्यालयातून…
संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत
सिंधुदुर्गनगरी:- जिल्ह्यातील शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या थकीत कर्ज रक्कम असलेल्या लाभार्थींनी ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्याबाबतची एकरक्कमी परतावा (OTS) योजना दि.31 मार्च 2025 पर्यंत राबविण्यात येत आहे. महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थीनी सदर योजनेचा फायदा घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहनही जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय (ओबीसी) वित्त आणि विकास महामंडळ मर्यादीत. मुंबई यांची उपकंपनी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ लि., सिंधुदूर्ग यांच्यावतीने विविध कर्ज योजनेतंर्गत सिंधुदूर्ग जिल्ह्यातील इतर मागास (ओबीसी) प्रवर्गातील लाभार्थीना स्वयंरोजगाराकरीता अल्प व्याजदराने कर्ज वितरीत करण्यात आले असल्याचे जिल्हा व्यवस्थापक प्रिती आर पटेल यांनी कळविले आहे.
जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन २१ नोव्हेंबर रोजी आयोजन
सिंधुदुर्गनगरी:- क्रिडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने सन २०२४-२५ या वर्षातील जिल्हास्तर युवा महोत्सव दि. २१ नोव्हेंबर २०२४ रोजी जिल्हा नियोजन समिती हॉल सिंधुदुर्गनगरी (नवीन) येथे आयोजन करण्यात असल्याचे जिल्हा क्रिडा अधिकारी विद्या शिरस यांनी कळविले आहे.
राष्ट्रीय युवा महोत्सव सन २०२४-२५ मध्ये संकल्पना आधारित बाबींसाठी “विज्ञान व तंत्रज्ञान वामधील नवसंकल्पना” – “Innovation in Science and Technology” ही संकल्पना दिलेली आहे. या संकल्पनेवर आधारीत जिल्हा युवा महोत्सवात विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
युवकांचा सर्वागिण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागण्यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. राज्यात सन २०२४-२५ या वर्षातील युवा महोत्सवाचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांचे वतीने आयोजित करण्यात येणार आहे. युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर करुन राज्याचा प्रातिनिधिक चमु राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी पाठविण्यात येतो. जिल्हास्तर युवा महोत्सवाची नियमावली गुगल लिंकवर देण्यात आली आहे. युवा होत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी गुगल लिंक फॉर्ममध्ये भरावा.
सांस्कृतिक – समुह लोकनृत्य, वैयक्तिक सोलो लोकनृत्य, लोकगीत, वैयक्तिक सोलो लोकगीत. कौशल्य विकास – कथा लेखन, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा, कविता स्पर्धा. संकल्पना आधरित स्पर्धा-विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना (innovation in science and technology) युवा कृती – हस्तकला, वस्त्रोद्योग, अॅगो प्रोडक्ट यावर आधारीत स्पर्धा होणार आहेत.
जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये जिल्ह्यातील १५ ते २९ वयोगटातील युवक युवतींना सहभागी होता येईल. युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी नाव नोंदणी स्पर्धापूर्व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे करावी. तसेच सहभागाबाबत गुगल लिंकवर दि.२० नोव्हेंबर २०२४ पर्यंत नाव नोंदणी करावी. जिल्ह्यातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय / वरीष्ठ महाविद्यालयातील व कृषी महाविद्यालय, इंजिनिअरींग कॉलेज, वैद्यकीय महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थोतील जास्तीत जास्त युवक युवती / संघांनी, महिला मंडळ यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन ही जिल्हा क्रिडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांनी 2 ऑक्टोबरपर्यंत गुगल लिंकवर अभिप्राय नोंदवावा!
सिंधुदुर्गनगरी:- राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत करावायाच्या उपाय योजनांबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत वेळोवेळी शासन निर्णय / परिपत्रकांन्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल सु-मोटो याचिका क्र.01/2024 च्या अनुषंगाने दिनांक 03 सप्टेंबर 2024 रोजी दिलेल्या आदेशानुसार गठीत केलेल्या समितीचा विस्तार व कार्यक्षेत्रा बाबतची निश्चिती केली आहे. त्यानुसार समितीची बैठक आयोजित करण्यात आलेली होती.
समाजातील विविध घटकांतून विद्यार्थी सुरक्षा विषयी सूचना/अभिप्राय मागविण्याबाबत https://forms.gle/JDcKbVaouch7A5BT7 या लिंकवर सूचना/अभिप्राय देण्यासाठी कार्यालयाने नागरीकांना आवाहन केलेले आहे. या लिंकवर अभिप्राय नोंदविण्याचा अंतिम दिनांक 12 ऑक्टोबर 2024 पर्यंत आहे.
जिल्ह्यातील नागरीकांनी दिलेल्या लिंकवर विद्यार्थी सुरक्षा बाबत आपल्या सूचना/अभिप्राय नोंदवावेत, असे आवाहन शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. गणपती कमळकर यांनी केले आहे.
आकाशवाणी केंद्र येथे हिंदी पंधरवडा साजरा हिंदी निबंध लेखनात इम्तियाज बिजापुरी यांचा प्रथम क्रमांक
सिंधुदुर्गनगरी:- आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी येथे हिंदी दिवसानिमित्त हिंदी पंधरवडा साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध कार्यकमांचे आयोजन करण्यात आले होते. हिंदी निबंध लेखन प्रतियोगिता घेण्यात आली. त्या प्रतियोगितेतील प्रथम पुरस्कार इम्तियाज बिजापुरी (तंत्रज्ञ), द्वितीय पुरस्कार मोहन कावळे (अभियांत्रिकी सहायक) व तृतीय पुरस्कार ज्ञानदेव परब (तंत्रज्ञ) यांना मिळाले. कार्यक्रमाचे आयोजन विमलन ज्योतिनाथन, उप निदेशक (अभियांत्रिकी), पियुष गौतम, सहायक निदेशक (राजभाषा) व सुजाता कहाळेकर सहायक निदेशक (कार्यकम) यांच्या उपस्थितीत पार पडला.