१ एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांची नंबरप्लेट बदलावी लागणार!

मुंबई:- महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने ४ डिसेंबर २०२४ रोजी एक आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) जारी केली आहे ज्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (एच एस आर पी) बसवणे बंधनकारक केले गेले आहे. ह्यासंदर्भात सार्वजनिक सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या एच एस आर पी प्रणालीमध्ये युनिक आयडेंटीफिकेशन नंबर (युआयएन) आणि लेसर कोड यासारख्या वैशिष्ट्यांसह अशा नोंदणी प्लेट्स असतात की त्यात छेडछाड करून बदल करता येत नाही. यामुळे त्या वाहनांशी संबधित गुन्ह्यांचे परीक्षन आणि प्रतिबंध करण्यासाठी सहाय्यभूत ठरतात.

महाराष्ट्र राज्यातील ज्या वाहन मालकांनी १ एप्रिल २०१९ पूर्वी आपल्या वाहनांची नोंदणी केलेली आहे, त्यांनी आता या सूचनांचे पालन करावे लागणार आहे. त्यांच्या वाहनांवर एच एस आर पी लावणे अनिवार्य आहे.