उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत 21 ते 25 ऑगस्ट रोजी आरोग्य शिबीराचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी:- उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत 21 ते 25 ऑगस्ट 2023 या कालावधीत दररोज देवगड, कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या एसटी डेपोत व गोवा, पुणे, मुंबई या मार्गावर चालणाऱ्या खाजगी प्रवासी बसेसच्या चालकांसाठी झाराप येथे आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी कळविले आहे.
या आरोग्य शिबीरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. या शिबीराचा लाभ सर्व प्रकारच्या बस चालक यांनी घ्यावा यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. तसेच नेत्रतपासणीत वाहन चालकास दृष्टीदोष आढळल्यास आवश्यकतेनुसार मोफत चष्मा वाटप करण्यात येणार असून गंभीर दोष असेल तर त्याबाबत शिफारस पत्र देऊन जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात येणार आहे.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत आयोजित मोफत नेत्र तपासणी आरोग्य शिबीर जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड, सावंतवाडी, यांच्या सेवाभावी संस्थेचे सहाकार्यातून घेण्यात येणार आहे. परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडील पत्रानुसार राज्यातील बसेसच्या अपघातांमध्ये होणारी मोठ्या प्रमा
णावरील जिवितहानी टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या बसचालकांची आरोग्य व नेत्र तपासणी होणे आवश्यक आहे, असेही निर्देश जारी केले आहेत.