सिद्धगिरी हॉस्पिटल येथे मोफत कर्करोग निदान व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन
देशातील नामवंत कॅन्सर तज्ञ करणार शस्त्रक्रिया
कोल्हापूर- ‘रुग्णसेवा हीच ईशसेवा’ व ‘निराधारांना आधार’ या बीदानुसार संचलित “सिध्दगिरी हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर, कणेरी” कोल्हापुर तर्फे अहमदाबाद, बंगळूर, हैद्राबाद, मुंबई, पुणे येथील राष्ट्रीय स्तरावरील कॅन्सर तज्ञांच्या मार्फत दि. १४ ते १६ डिसेंबर २०१८ पर्यंत “मोफत कर्करोग निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात निदान करण्यासाठी गरजू रूग्णांनी दि. १० डिसेंबर २०१८ पर्यंत प्रत्यक्ष येऊन नाव नोंदणी करावी . आपल्या भागातही कोणी गरजू रुग्ण असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहचवून आपण सामाजिक बांधिलकी जपूया. १० डिसेंबर पूर्वी रुग्णाची नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी व अधिक माहितीसाठी फोन 02312671774,2687505 तसेच डॉ . रेशम राजपूत 9421127917 व डॉ.प्रमोद घाटगे 9922115782 यांच्याशी संपर्क साधावा; असे आवाहन संयोजक सिध्दगिरी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रवीण नाईक यांनी केले आहे.