ह्यूमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनची याचिका

विद्युत मंडळाच्या तुटलेल्या तारेचा शॉक लागून मृत्यू झालेल्या
सोळा वर्षीय तरुणाच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी
ह्यूमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनची याचिका

पुणे (संतोष नाईक यांजकडून):- विद्युत मंडळाच्या तुटलेल्या तारेचा शॉक लागून मृत्यू झालेल्या सोळा वर्षीय तरुणाच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी ह्यूमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन तर्फे राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई यांच्या कोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून सदर मृत्यू प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी व्हावी; अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या चाकण खेड विभागाच्या बेजबाबदार व हलगर्जीपणामुळे ६ जून २०२१ रोजी सकाळी ९ वाजता सोळा वर्षीय प्रेम खंडू गावडे (रा. येलवाडी, जि.पुणे) ह्या तरुणाला विद्युत मंडळाच्या तुटलेल्या तारेचा शॉक लागल्याने मृत्यु झाला. विद्युत महामंडळाच्या पोलवरील विद्युत भारित तारा तुटलेल्या अवस्थेत होत्या. त्यामुळे मृत्यू झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले. ह्या जीवघेण्या घटनेला विद्युत महामंडळाचे अभियंतेच जबाबदार आहेत आणि सदर मृत्यू प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी व्हावी; म्हणून १२ जून २०२१ रोजी राज्य मानवी हक्क आयोग मुंबई यांच्या कोर्टात ह्यूमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष एम.डी.चौधरी यांनी याचिका दाखल करण्यात आली असून सदर मृत्यू प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी व्हावी; अशी मागणी करण्यात आली आहे. सदर याचिकेवर लवकरच सुनावणी होऊन मृत्यू झालेल्या कुटुंबाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा एम. डी. चौधरी व्यक्त केली आहे.

या सर्व प्रकरणाची चौकशी निमित्त आज दिनांक २२ जून २०२१ रोजी ह्युमन राईट्सचे असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. एम. डी. चौधरी, पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री. सचिन गाडे, खेड तालुक्याचे अध्यक्ष श्री.नितिन गाडे, महावितरणचे उपअभियंता श्री. राहुल डेरे, कनिष्ठ अभियंता नरवडे, येलवाडी गावचे सरपंच सौ. हीराबाई बोत्रे, उपसरपंच कल्पना गाडे, सदस्य रणजीत गाडे, सागर गादे, त्याचप्रमाणे संघटनेचे जनसंपर्क अधिकारी सुमित रामभाऊ गाडे, खजिनदार तुषार गाडे, अतिरिक्त सचिव सुनिल गाडे, सल्लागार अनिल गाड़े, सहाय्यक सचिव श्रीकांत भसे, कार्याध्यक्ष प्रमोद गाडे, कायदे सल्लागार निखिल भसे यावेळी उपस्थित होते.