फिनिक्स फाऊंडेशनची चिपळूणच्या पूरग्रस्तांना मदतीचा हात!

मुंबई:- फिनिक्स फाऊंडेशनचे विश्वस्त जितेंद्र लोके यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूणच्या पूरग्रस्तांना अत्यावश्यक औषधांसह विविध जीवनोपयोगी वस्तू देण्यात आल्या. सुमारे ५०० कुटुंबांना त्याचा लाभ झाला असून नेहमीप्रमाणे फिनिक्स फाऊंडेशनने आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

पाचशे कुटुंबियांना प्रत्येकी ५ किलो तांदुळ, ३ किलो डाळ, १ लिटर खाद्य तेल, २ किलो कांदे, २ किलो बटाटा, ३ साबण, पॅराशुट तेलाची १ बाटली, क्रोसीन गोळीचे १ पॅकेट, विक्स बामची १ बाटली, २ सॅनिटरी पॅड, १ बॉक्स मेणबत्ती, १ माचीस बॉक्स, १ बाटली फिनाईल, ५ लिटर पॅकिंगचे पिण्याचे पाणी, बिस्किट्स अशा वस्तू प्रत्येकाच्या घरी जाऊन फिनिक्स फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी दिल्या.

विश्वस्त जितेंद्र लोके फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतात. मोफत आरोग्य शिबीर, वृद्धाश्रम, रूग्णमित्रांची शैक्षणिक सहल असे विविध नाविन्यपूर्ण आणि समाजपयोगी कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न करून फिनिक्स फाऊंडेशनने आदर्श निर्माण केला आहे.