उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- रविवार दिनांक ८ ऑगस्ट २०२१

रविवार दिनांक ८ ऑगस्ट २०२१
राष्ट्रीय मिती श्रावण- १७
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- आषाढ अमावास्या सायंकाळी १९ वाजून १९ मिनिटापर्यंत आहे.
नक्षत्र- पुष्य सकाळी ०९ वाजून १८ मिनिटापर्यंत
योग- व्यतिपात रात्री २३ वाजून ३७ मिनिटापर्यंत
करण १- चतुष्पाद सकाळी ०७ वाजून १९ मिनिटापर्यंत
करण २- नाग सायंकाळी १९ वाजून १९ मिनिटापर्यंत

चंद्रराशी- कर्क अहोरात्र आहे.

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून २० मिनिटांनी होईल.
सूर्यास्त- सायंकाळी १९ वाजून ०८ मिनिटांनी होईल.

चंद्रोदय- पहाटे ०५ वाजून ४८ मिनिटांनी होईल.
चंद्रास्त- सायंकाळी १९ वाजून २२ मिनिटांनी होईल.

ओहोटी- पहाटे ०५ वाजून २८ मिनिटे आणि सायंकाळी १८ वाजून २३ मिनिटे
भरती- दुपारी १२ वाजून १६ मिनिटे

दिनविशेष:-

१५०९ साली सम्राट कृष्णदेवरायचा राज्याभिषेक झाला आणि विजयनगर साम्राज्याची स्थापना झाली.
१९४२ साली चले जाव आंदोलनाची सुरुवात मुंबईतील अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय कॉॅंग्रेसने चले जावचा ठराव मंजूर करून झाली.

आज आहे आषाढ ह्या मराठी महिन्यातील अमावस्या अर्थात दर्श अमावस्या! ह्या अमावास्येला हरियाली अमावास्याही म्हणतात. आजच्या दिवशी मध्य आणि उत्तर भारतात श्रावण महिन्यातील अमावास्या असते. मात्र आषाढी अमावास्येला आध्यात्मिक महत्व असून खऱ्या अर्थाने ही दीप अमावास्या होय! या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते.

आजच्या दिवशी सायंकाळी घरातील दिवे, समया, निरांजने, लामणदिवे स्वच्छ करावेत आणि ते पाटावर मांडून पाटाभोवती सुरेख रांगोळी रेखाटावी, फुलांची आरास करावी. सर्व दिव्यांमध्ये तेल वात घालून प्रज्वलित करावेत. या सर्वांची हळद कुंकू , फुले, अक्षता वाहून मनोभावे पूजा करावी. गोडाचा नैवेद्य दाखवावा. आणि प्रार्थना करावी

दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम ।
गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥

ह्याचा अर्थ होतो…
हे प्रकाश रुपी दिव्या, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस, तेजामध्ये उत्तम तेज आहेस. मा‍झ्या पूजेचा स्वीकार कर आणि मा‍झ्या सर्व इच्छा पूर्ण कर!

प्रकाश म्हणजेच ज्ञान, जिथे प्रकाश पडतो तिथे अंध:कार नाहीसा होतो. ज्ञान आल्यावर अज्ञानाचा अंध:कार दूर होतो.

You cannot copy content of this page