सिंधुदुर्गनगरीमध्ये डाक अदालत

सिंधुदुर्गनगरी,दि.29 (जि.मा.का) दिनांक 10 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता अधीक्षक डाकघर सिंधुदुर्ग यांचे कार्यालयामध्ये डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अधीक्षक डाकघर सिंधुदुर्ग विभागाचे आ.ब. कोड्डा  यांनी दिली आहे.

पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल,स्पीड पोस्ट काऊटर सेवा, डाक वस्तू,पार्सल, मनीऑर्डर, बचत खाते, याबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास पाठविली असेल त्याचे नाव, हुद्दा इ.

संबंधितानी  डाक सेवेबाबतची आपली तक्रार सिंधुदुर्ग विभागाचे अधीक्षक डाकघर आ.ब. कोड्डा  सिंधुदुर्गनगरी 416812 यांचे नावे दिनांक 6 डिसेंबर 2021 पर्यंत अथवा त्यापुर्वी पोहाचेल  अशा रीतीने पाठवावी त्यानंतर आलेल्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही .