विद्यार्थ्यांनी बनविलेल्या जगातील सर्वांत हलक्या उपग्रहाचे इस्त्रोनं केलं यशस्वी प्रक्षेपण
PSLVC 44 प्रक्षेपक याना सह नकलामसॅट आणि मायक्रोसॅट-आर या उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण
श्रीहरिकोटा:- पीएसएलव्हीसी – ४४ (PSLVC 44) ह्या प्रक्षेपक याना सह कलामसॅट आणि मायक्रोसॅट-आर या दोन उपग्रहांचं भारतीय अंतराळ संशोधन केंद्राने अर्थात इस्त्रोने गुरुवारी रात्री ११ वाजून ३८ मिनिटांनी श्रीहरिकोटातील सतीश धवन स्पेस रिसर्च सेंटरमधून यशस्वी प्रक्षेपण केले. इस्रोनं हे प्रेक्षपण यशस्वी झाल्याचं जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे इस्रो प्रमुख के. सिवन यांनी आपल्या पथकाचं आणि देशाचं अभिनंदन केलं.
कलामसॅट पहिला उपग्रह आहे, जो रॉकेटच्या चौथ्या चरणाला ऑरबिटल प्लेटफॉर्मच्या रूपात उपयोग करेल. ह्या उपग्रहाचे नाव माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. १.२६ किलोग्रॅम असलेला हा उपग्रह आतापर्यंतचा जगातील सर्वांत हलका उपग्रह असून हा उपग्रह विद्यार्थ्यांनी बनविला आहे. या उपग्रहाचा उपयोग रेडिओ कम्युनिकेशनसाठी होणार आहे. या उपग्रहाची निर्मिती चेन्नईच्या स्पेस किड्स इंडिया या फर्मशी संबंधित विद्यार्थ्यांनी केली आहे. आतापर्यंत भारतीय विद्यार्थ्यांनी बनवलेल्या ९ उपग्रहांच प्रक्षेपण झालं आहे.