`परमपूज्य सद्गुरु अनिरुद्ध बापू’- कलियुगात तारणारा `तो’ एकच!
हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्
येणारा काळ हा खूप म्हणजे खूप बेकार व भीषण आहे; ज्याची आपण स्वप्नात सुद्धा विचार केलेला नाही. आज आजूबाजूची परिस्थिती भयावह झालेली आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्या, आत्मघाती हल्ले, बलात्कार, वाढत्या कामाचा ताण अशा अनेक गोष्टींनी खूप मनस्ताप दररोज आपल्याला सहन करावा लागतो. ह्यामधून बाहेर पडावं व खूप सुंदर आयुष्य जगावं असं प्रत्येकाला वाटतं असतं!
आणि ते बरोबरच आहे. एवढं सुंदर आयुष्य आपल्या देवाने आपल्याला दिलंय; मग असं मरत मरत का जगायचं?
आपण आपलं आयुष्य खरंच बिनधास्त जगता आलं पाहिजे असं वाटतं ना!
म्हणूनच खूप आधीच्या काळापासून सांगण्यात आलं आहे की, आपण परमेश्वरी नियमानुसार वागलो आणि त्यानुसार आपलं आचरण ठेवलं तर खरंच असं बिनधास्त जीवन जगता येत. म्हणून आपल्याला श्रीराम, श्रीकृष्ण ह्यांच्या कथा सांगण्यात येतात. संतांच्या आचरणाचे धडे दिले जातात; कारण त्यांनी परमेश्वरी नियमानुसार वागून आपलं आयुष्य सुंदर केलेलं असतं. असा कोणताही महापुरुष ह्या जगाच्या पाठीवर नाही की, ज्याने देवाची भक्ती केली नाही.
परमात्म्याच्या भक्तीतूनच मानवाकडे शुरत्व येतं.
आपण ही आपलं जीवन खूप सुंदर करू शकतो; फक्त त्याला जरूरत असते एका `सदगुरू’ची!
खरा सद्गुरू जाणतो की, आपल्या बाळांना कसं जगायला शिकवायचं?
ह्या कलियुगात असा सद्गुरु मिळणं कठीण आहे, असं लोक म्हणतात. पण आपला आपल्या देवावर विश्वास असेल तर तोच आपल्याला असा सद्गुरू मिळवून देतो. कारण शेवटी त्या माऊलीला आपल्या बाळांची काळजी असतेच असते.
शिर्डीचे श्रीसाईनाथ, अक्लकोटचे स्वामी समर्थ, शेगावचे गजानन महाराज; असे सद्गुरु होऊन गेले व त्यांनी आपल्या अवतार कार्यातून जगाला दाखवून दिलं की खरंच आम्हा मानवांची काळजी त्या परमेश्वराला खूप आहे. त्यांनी आपल्या भक्तांवर खूप प्रेम केलं आणि बिनधास्त जगायला शिकवून त्यांचा बेडा पार केला.
माझ्या मित्रांनो; आजही अशीच आपल्यावर निरतिशय प्रेम करणारी व बिनधास्त जगायला शिकविणारी सद्गुरू माऊली परत एकदा लाभली आहे. डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी म्हणजे ( अनिरुद्ध बापू ) आमचे बापू.
हितकारक उपदेश आम्हाला करण्यापूर्वी ते आधी स्वतः तशी कृती करतात आणि तो एकमेव परमेश्वर किती आपल्यासाठी झटतो आणि आपली किती काळजी घेतो; हे प्रवचनद्वारे सांगतात. अनेक उदाहरणं देऊन साध्यासोप्या भाषेत पटवून देतात. आपण सुंदर सुखाचा संसार करून देवाची भक्ती कशी करायची ते स्वतःच्या आचरणाद्वारे दाखवून देतात.
आज लाखो लोकांना बापूंचे अनुभव आले आहेत आणि येत आहेत. जो बापूंना अगदी मनापासून संकटात साद घालतो त्याच्यासाठी बापू १०८ टक्के धावत येतात आणि त्यांना संकटातून अगदी अलगद बाहेर काढतात. काही भक्तांना बापूंनी तर मरणाच्या दारामधून बाहेर काढले आहे.
बापू शिक्षित-अडाणी, श्रीमंत-गरीब, धर्म, जात, वर्ण असा भेदभाव मानत नाहीत. सर्व स्तरातून लोक इथे येतात आणि समाधानी-सुखी होतात. इथे अंधश्रद्धेला अजिबात जागा नाही.
खरंच जर कोणाला वाटत असेल की आपलं आयुष्य खूप सुंदर असावं तर एकदा माझ्या सद्गुरू माऊली वर विश्वास ठेऊन तर बघा! मग स्वतःच आयुष्य खऱ्या अर्थाने सार्थक झालं असं वाटेल. माझ्या सद्गुरुंकडे ना कसली जादू-ना कसला चमत्कार. फक्त माझ्या सदगुरुंकडे शुद्ध प्रेम आहे. लाभेविन प्रेम तो आमच्यावर करतो, जे संपूर्ण जग जिंकू शकतं.
तुम्हाला खरंच काही प्रश्न असतील तर विचारा. काही शंका असतील तर अनिरुद्ध बापूंकडे येणाऱ्या तुमच्या मित्राला विचारा. जमलं तर दर गुरुवारी सायंकाळी न्यू इंग्लिश स्कुल, वांद्रे (ई) येथे आमच्या बापूंच प्रवचन असतं. तुम्ही ऐकू शकता, एकही रुपया न देता. कारण आमचे सदगुरु कोणाकडूनही आणि कधीही काहीच घेत नसतात. फक्त खूप काही देत असतात.
आपण सुजान नागरिक आहोत आणि काय खरं व खोटं ह्यामधला आपल्याला फरक नक्कीच कळतो. म्हणून सांगतो मित्रांनो ह्याचा प्रेमाने हात धरून तर बघा. आयुष्यात खूप काही भेटलं आणि आयुष्य सार्थकी लागलं असं वाटेल.
येणारा काळ हा खूपच भयावह आहे व `मला माझ्या देवाने एकही संधी दिली नाही’ असं बोलत बसू नका. तुमच्या प्रश्नांची उत्तरं येणारा काळच तुम्हाला देणार आहे. बापूंनी २००५ पासून वारंवार सांगितले आहे की, हा काळ इतका भयानक आहे की ह्यामध्ये फक्त श्रद्धावान वाचू शकणार आहेत.
बापूंचे विचार थोडक्यात सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल की हे सदगुरुतत्व किती महान आहे आणि आम्ही का जातो त्यांच्याकडे?
बापू सांगतात…
* तुम्ही त्याची( परमेश्वराची) काळजी घ्या, तो तुमची काळजी घ्यायला समर्थ आहे.
* देव २४ तास आपल्या बरोबर असतो, मग आपण दिवसातील फक्त २४ मिनिटे त्याच्यासाठी नक्कीच देऊ शकतो.
* तुमचा जेवढा परमेश्वरावर विश्वास तेवढीच तुमच्यावर त्याची जास्त कृपा ( कारण जेवढे पीठ असते तेवढीच भाकरी बनते.)
* परमेश्वर कोणावर तीळमात्रही अन्याय करत नाही.
* मानवाने सेवा-भक्ती ही केलीच पाहिजे (सेवा व भक्ती आपल्या जीवन रथाची दोन चाके आहेत आणि ती बरोबरच चालली पाहिजेत तरच रथ व्यवस्थित चालेल.)
*कोण काय म्हणेल? ह्याचा विचार करण्यापेक्षा माझ्या देवाला माझ्याकडून काय अपेक्षित आहे? त्याप्रमाणेच आपण वागलं पाहिजे.
* तुम्ही कितीही पापी असाल, पण वाल्याकोळी एवढे पापी नक्कीच नाही आहात. जर त्याचा उद्धार त्या परमेश्वराने केला तर मग आमचा का नाही करणार?
* स्वतःला कधी कमी लेखू नका. जर त्याने आम्हाला जन्म दिलाय तर त्याचा नक्कीच काहीतरी चांगला हेतू असणार, मग आम्ही स्वतःला इतरांपेक्षा का कमी मानावे.
* जीवनात कितीही मोठे संकट आले तरी त्या संकटापेक्षा माझा देव नक्कीच मोठा आहे आणि तो माझं संकट १०८ टक्के दूर करेल; हा दृढविश्वास असला पाहिजे.
* तुम्ही जगामध्ये सगळ्यांना विसरा पण त्या परमेश्वराला कधीही विसरू नका.
* आपण जेवढे प्रेम परमेश्वरावर करतो, जेवढी चांगली कामे करततो ती १० पट वाढवून तो परत आपल्याकडे पाठवतो आणि जी वाईट कामे करतो ती तेवढ्याच प्रमाणात आपल्याकडे येतात. ह्यालाच म्हणतात त्या परमेश्वराचे अकारण कारुण्य.
*तुम्ही परमेश्वराला विसरलात तरी ही तो तुम्हाला कधीच विसरत नाही.
* आपण जे काही करतो ते तो नक्की बघतच असतो. कारण तो २४ तास आपल्यासोबत असतो म्हणून त्याची भीती नका बाळगू. फक्त त्याचा धाक बाळगा.
* आपल्या कर्माच्या अटळ सिद्धांतामुळे आपण जे वाईट कर्म केले आहे त्यानुसार आपल्यावर संकट येते. तरी आपण देवाला म्हणत असतो की देवा तू हे काय केले? तुला मला दुःख देताना आनंद होतो का? असे कधीच बोलू नका. कारण आपला विश्वास डगमगतो आणि आपण त्याच्यापासून दूर जातो. आपल्यावर संकट येते ते आपल्या कर्माच्या अटळ सिद्धांतामुळे येते आणि जर सद्गुरू आपल्या जीवनात असेल तर त्या संकटाची तीव्रता ९० टक्के तो कमी करतो; ते पण आदिमाता चण्डिकेने बनविलेला कोणताही नियम न मोडता.
* जर आमची त्या परमेश्वरावर श्रद्धा असेल तर तो तेच देईन जे आमच्यासाठी योग्य आहे. कारण एक आईच जाणत असते की आपल्या बाळाला कोणत्या वेळी काय आवश्यक आहे. उदा. लहान मुलाने जर सूरी घेतली तर आई त्याला मारते आणि ती परत घेते. आईच जाणते की ह्या सुरीमुळे माझ्या बाळाला दुखापत होईल. त्या बाळाला वाटते की आई मला जे पाहिजे ते देत नाही. खरंच आपलेही असेच असते ना!)
असे खूप काही आहे, ह्या माझ्या सद्गुरू अनिरुद्ध बापूंकडून शिकण्यासारखे. त्यांनी खूप काही सांगितले आहे प्रवचनामधून.
हे मी फक्त ००. १ टक्के तुम्हाला सांगितले आहे. बाकी अजून खूप काही आहे; परमपूज्य अनिरुद्धांकडे गेल्यावरच आपणास समजेल.
अनुभवांचा अनुभव स्वतः घेतल्यानंतर तुम्ही स्वतः म्हणाल की, खरंच बापूंच्या प्रवचनाला जायलाच पाहिजे. कारण प्रवाचनामध्येच आपल्याला आपल्या कित्येक प्रश्नांची उत्तरे मिळालेली असतात. म्हणूनच सांगावसे वाटते, एकदातरी आपण जरूर यावे.
एक नियम आम्हाला माहीत पाहिजे की, आम्ही स्वतःहून फक्त एक पाऊल त्याच्या दिशेने टाकले पाहिजे. मग उरलेली ९९ पाऊले तो माझ्याकडे चालत येणारच आहे. अगदी १०८ टक्के! आम्हाला माहीत आहे की एका बीजापासून असंख्य फळे आम्हाला प्राप्त होतात. हा सृष्टीचा नियम आहे. अगदी हाच नियम इथेही लागू होतो, हे आम्हाला कळलं पाहिजे.
आणखी काय बोलणार? शेवटी एकाच सांगतो, गुरुचरितामधील एक ओवी आहे
देव कोपता गुरू तारी, पण गुरू कोपता कोण तारी (पण खरं सांगू गुरू हा कधीच कोपत नाही.)
सद्गुरू असणे खूप फायद्याचे आहे. आपण जे काही चांगले कर्म करतो ते १० पट वाढून आपल्याला तो परत देतो आणि जे आपले संकट आहे ते १०० टक्के वरून १० टक्केवर आणून ठेवतो आणि ते १० टक्के संकटाची झळ सोसायची ताकतही तोच देतो.
म्हणूनच आपण ह्याच्या गोड शाळेमध्ये एकदातरी नक्की या आणि स्वतः अनुभवा इकडे सर्वकाही मिळतेच. तो फक्त द्यायलाच आला आहे. ह्याला काहीच द्यावे लागत नाही आणि बापू स्वतः सांगतात की, तुम्हाला मला जर काही द्यायचेच असेल तर ते तुमचे पाप द्या. बाकी मला काहीही नको.
मला सांगा ह्या कलियुगात असा सद्गुरू खरंच कुठे शोधून मिळेल का? हा प्रश्न नक्की आपण स्वतःला विचारला पाहिजे. कारण प्रत्येकाला आपले स्वहित कशात आहे? हे नक्कीच कळते. कलियुगात तारणारा `तो’ एकच आहे. काही चूक असल्यास क्षमस्व!
हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्
– संतोषसिंह वाघुले