ओम साईधाम मंदिरात श्रीरामनवमी साजरी!

मुंबई:- दरवर्षी प्रमाणे श्रीरामनवमी निमित्त श्रीसाईसच्चरित ग्रंथ अखंड पारायण आणि श्रीरामजन्मोत्सव ओम साईधाम देवालय समिती व कॉस्मोपॉलिटन को-ऑप. हाऊसिंग सोसायटी असोसिएशन उत्सव मंडळाच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरा झाला.

शनिवार दि. ५.४.२०२५ रोजी सकाळी ७.३० वाजता परमपूज्य श्री साईबाबांचे पूजन करून ओम कृपासिंधु श्रीसाईनाथय नमः चा जप करण्यात आला. त्यानंतर श्रीसाईसच्चरित ग्रंथ अखंड पारायणाला श्री. प्रकाश सोनाळकर प्रथम अध्याय वाचून शुभारंभ केला. संपूर्ण दिवसरात्र पारायण सुरु होते. श्री रामनवमी दिवशी सकाळी श्रीसाईसच्चरित ग्रंथ सफल संपूर्ण झाले. पारायणात अनेक साईभक्तांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२ वाजता श्रीरामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी ५६ भोग म्हणून विविध खाद्यपदार्थ परमात्म्यास समर्पित करण्यात आला व त्या प्रसादाचा लाभ उपस्थितांनी घेतला.  सायंकाळी कॉस्मोपॉलिटन को ऑ हौसिंग सोसायटी महिला मंडळाचे सुश्राव्य भजन करण्यात आले. विशेषतः महिलांचं मोठ्या प्रमाणात सहभाग होता.  त्यानंतर श्री साईनाथ महाराज प्रासादिक भजन मंडळ, जोगेश्वरी यांचे सुश्राव्य संगीत भजन झाले. घाडीगावकर बुवांनी आपल्या भजनातून श्रीराम आणि श्रीसाईंवरती अनेक भक्तिगीते सादर केली. भजनानंतर महाआरती झाली. उपस्थित भक्तांनी तीर्थ प्रसादाचा लाभ घेतला.

ओम साईधाम देवालय समितीचे अध्यक्ष रवि जाधव, सेक्रेटरी रेश्मा पाटील, खजिनदार चेतन नाईक, मुख्य सल्लागार मोहन सावंत तसेच कॉस्मोपॉलिटन को-ऑप. हाऊसिंग सोसायटी असोसिएशन उत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सोनाळकर, सेक्रेटरी मोहन सावंत, खजिनदार विष्णू भट यांनी आणि कॉस्मोपॉलिटन महिला मंडळाच्या सर्व सदस्या यांनी श्रीरामनवमी उत्सवाचे योग्य नियोजन केले होते. कार्यक्रम यशस्वी संपन्न करण्याकरिता महिला मंडळाने मोठे योगदान दिले. श्रीराम- श्रीसाई भक्तांनी दोन दिवस झालेल्या आध्यत्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला.