`निसर्ग माझा सखा सोबती’ मुक्त कविता लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर!

मुंबई:- भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था, मुंबई या संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय मराठी भाषा `निसर्ग माझा सखा सोबती’ मुक्त कविता लेखन स्पर्धेचे ( जानेवारी २०२२ मध्ये) नुकतेच आयोजन केले होते. ऑननलाइन स्वरुपात झालेल्या या काव्यलेखन स्पर्धेत ७५ पेक्षा जास्त कवींनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्राबाहेर गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, गोवा राज्यातील मराठी भाषिक कवींचा सुद्धा या स्पर्धेत मोठा सहभाग होता. कमीत कमी शब्दांत आशयघन व प्रेरणादायी शब्दरचना याशिवाय लेखनातील रचनावृत्त शब्दलयता इत्यादी अन्य निकष यासाठी निश्चित केले होते.

यामध्ये राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत प्रथम क्रमांक विभागून श्री. श्रीकांत म.शिरभाते ( सुरत) व श्री. रत्नाकर बाबुराव पाटील ( उस्मानाबाद), द्वितीय क्रमांक विभागून सौ. मेधा विनायक लोवलेकर (चिपळूण ) व वर्षा पितळे (ठाणे) यांना तर तृतीय क्रमांक विभागून सौ. सविता उ. वडगांवकर ( परभणी) व सौ. वत्सला पवार-पाटील ( परभणी ) या कवींना मिळाला आहे.

याशिवाय विशेष उत्तेजनार्थ कविता म्हणून सौ. वसुंधरा श्रीकांत मराठे ( ठाणे ),सौ. माधुरी बर्वे (ठाणे), सौ. शुभांगी कपिल डांगरे ( नागपूर), सौ. राधा रायकर ( चिपळूण), सौ. प्रतिमा अरुण काळे (पुणे) यांना मिळाला आहे. सर्व विजेत्या कविवर्यांना संस्थेच्या परिवारातर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था मुंबई संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॅा.आनंदसर व संस्था संबंधित मराठी भाषा व समिक्षण क्षेत्रातील अभ्यासक व मान्यवरांचे यामध्ये विशेष मार्गदर्शनपर योगदान लाभले.

You cannot copy content of this page