ह्यूमन राईट असो. फॉर प्रोटेक्शन कोकण विभागीय अध्यक्षपदी संतोष नाईक यांची सलग पाचव्यांदा निवड!
कणकवली:- ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी सलग पाच वेळा संतोष नाईक यांची निवड संघटनेच्या मुख्य कार्यालय पुणे येथे जाहीर करण्यात आली. संतोष नाईक यांनी गेली चार वर्ष संघटनेच्या माध्यमातून कोकण विभागात केलेल्या उत्तम कार्याची दखल घेऊन त्यांना पुन्हा पाचव्यांदा कोकण विभागीय अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. ही निवड संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने जाहीर केली आहे.
ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन कोकण विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्यावर कोकण विभागातील प्रत्येक जिल्ह्यातील (सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर) या तालुक्यातील उत्तम संघटना बांधणी केली आहे. “संपूर्ण कोकण विभागात ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने मानवाचे अधिकार मिळवून देण्यासाठी संघटकनात्मक कौशल्याच्या प्रयत्नाने संघटना यापुढे अधिक जोमाने कोकण विभागात सर्व पदाधिकारी व सदस्य यांना सोबत घेऊन चांगले कार्य करुन कोकण विभागात संघटनात्मक ताकद वाढवू!” असे संतोष नाईक म्हणाले.
संघटनेच्यावतीने नियुक्त पत्र देतेवेळी पुणे येथील राष्ट्रीय कार्यालयात एमडी चौधरी, राष्ट्रीय अध्यक्ष खंडूदेव कठारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमोद केसरकर, राष्ट्रीय निरीक्षक रामदास खोत,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुभाष कोठारी, उपाध्यक्ष लक्ष्मण दवणे, निरीक्षक घनःश्याम सांडीम, मुळशी तालुका अध्यक्ष श्री. विशाल भानुसे, मुळशी तालुका सचिव श्री.आदिनाथ बुचडे, सामाजिक कार्यकर्ते श्री. जयहिंद सुतार कार्याध्यक्ष श्री. लक्ष्मण मोरे तसेच नूतन सिंधुदुर्ग रत्नागिरी समन्वयक श्री. प्रणव बांदिवडेकर उपस्थित होते.
श्री. संतोष नाईक यांची सलग पाचव्या वेळी कोकण विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे संघटनेची राष्ट्रीय कार्यकारारणी, राज्य कार्यकारणी, सर्व जिल्हा कार्यकारणी,तालुका कार्यकारणी तसेच कोकण विभाग रिक्षा- टॅक्सी महासंघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य, कोकण रेल्वे प्रवासी संघटना तसेच जिल्हा वीज ग्राहक संघटना, जिल्हा व्यापारी संघटना, ऑप्टिकल वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग, तसेच लोकप्रतिनिधी, पत्रकार, सामाजिक संघटना, सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.