स्त्रियांना दुय्यम वागणूक देणाऱ्यांशी संघटित होऊन प्रतिकार करायला पाहिजे! -निर्मलाताई सामंत-प्रभावळकर
मुंबई:- “स्त्रियांना दुय्यम वागणूक देणाऱ्यांना संघटित होऊन प्रतिकार करायला पाहिजे; तरच स्त्रियांची समर्थता लक्षात येईल!” असे उदगार महाराष्ट्र राज्य महिला आयोग आयोजित `आदिशक्ती अभियान’ प्रारंभ कार्यक्रमात संबोधित करीत असताना सह्याद्री हिरकणी पुरस्कार पुरस्कृत, मुंबईच्या माजी महापौर, महाराष्ट्र महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा, राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी सदस्या, बालविवाह प्रतिबंधक राज्य समितीच्या माजी सदस्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई विभागीय अर्बन सेल अध्यक्षा आणि विधी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका निर्मलाताई सामंत-प्रभावळकर यांनी काढले
वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात `आदिशक्ती अभियान’ कार्यक्रम चिरंतर स्मरणात राहील असा भव्यदिव्य आणि भविष्यात महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी उपयुक्त ठरणारा संपन्न झाला. व्यासपिठावरील सर्व सन्मानिय व्यक्तींनी केलेले मार्गदर्शन आणि चर्चासत्रामध्ये सहभागी झालेल्या उत्तुंग महिला व्यक्तिमत्वांची मनोगते खूपच महत्वपूर्ण होती.