पंचांग आणि दिनविशेष- शुक्रवार दिनांक १७ डिसेंबर २०२१

शुक्रवार दिनांक १७ डिसेंबर २०२१
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- मार्गशीर्ष शुक्लपक्ष चतुर्दशी अहोरात्र
नक्षत्र- कृत्तिका सकाळी १० वाजून ३९ मिनिटांपर्यंत
योग- सिद्ध सकाळी ८ वाजून १२ मिनिटांपर्यंत

करण १- गरज सायंकाळी १८ वाजून ०२ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- वृषभ अहोरात्र

सूर्योदय- सकाळी ०७ वाजून ०७ मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून ०२ मिनिटांनी

चंद्रोदय- सायंकाळी १६ वाजून ४० मिनिटांनी
चंद्रास्त- पहाटे ०५ वाजून २५ मिनिटांनी

भरती- सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी आणि रात्री २३ वाजून ४१ मिनिटांनी
ओहोटी- पहाटे ०५ वाजून ०६ मिनिटांनी आणि सायंकाळी १६ वाजून ५२ मिनिटांनी

राहुकाळ- सकाळी ११ वाजून १२ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांपर्यंत

दिनविशेष:-
१९२७ साली हिन्दुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांना ब्रिटिश सरकारने निर्धारित तारखेच्या दोन दिवस आधीच गोंडा तुरुंगात फाशी दिली
१९२८ साली भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली.
२०१९ साली हिंदी-मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील जेष्ठ अभिनेते- दिग्दर्शक डॉ. श्रीराम लागू यांचे निधन झाले.

You cannot copy content of this page