जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते महादेवराव सुर्वे यांचे देहावसान!
रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी) – मौजे कुंभारखाणी बु. ग्रामोत्कर्ष संघ- मुंबईचे सक्रिय पदाधिकारी व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते महादेवराव अर्जुनराव सुर्वे यांचे २४ जुलै २०२२ रोजी वृद्धापकाळामुळे वयाच्या ९२ व्या वृद्धापकाळामुळे निधन झाले. मुंबईतील उच्च न्यायालयातील जेष्ठ अनुभवी वकील व मुंबईचे माजी सहाय्य्क पोलीस आयुक्त अॅड, सुभाष सुर्वे यांचे ते वडील!
स्वर्गीय महादेवराव अर्जुनराव सुर्वे मुंबईच्या शासकीय मुद्रणालयातून सेवा निवृत्त झाले. लालबागसारख्या गिरणगावात ते राहायचे. गावातून त्यांनी अनेक तरुणांना मुंबईत आणून नोकरीला लावले. ज्यांची मुबंईत राहायची सोय नसायची त्यांना ते आपल्या घरी ठेवायचे. प्रत्येकाशी ते प्रेमाने आपुलकीने वागायचे. त्यांनी वैयक्तिक जीवनात नातीगोती जपताना मित्रमंडळींनाही महत्वाचे स्थान दिले. उभ्या आयुष्यात सर्वांना मदत सहकार्य करून त्यांनी समाजामध्ये आदर्श व्यक्तिमत्व जपले. अनेक सामाजिक स्वयंसेवी संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. मौजे कुंभारखाणी बु. ग्रामोत्कर्ष संघ- मुंबईचे सक्रिय पदाधिकारी म्हणून शेवटपर्यंत कार्य केले. ग्रामीण भागातील सर्वांगिण विकासासाठी ते नेहमी आग्रही असायचे.
त्यांनी आपल्या सर्व मुलांना उच्च शिक्षण देऊन सुसंस्कारित केले. त्यांचा मुलगा मुंबईतील उच्च न्यायालयातील जेष्ठ अनुभवी वकील व मुंबईचे माजी सहाय्य्क पोलीस आयुक्त अॅड, सुभाष सुर्वे व त्यांची इतर मुले आपल्या वडिलांचा आदर्श जपतात. त्यांच्या पश्चात त्यांचे मुलगे, सुना, मुली जावई, नातवंडे आहेत.
आषाढ एकादशीच्या शुभ दिवशी महादेवराव अर्जुनराव सुर्वे आपल्या विठ्ठलाच्या चरणी लिन झाले. पाक्षिक `स्टार वृत्त’ परिवाराकडून त्यांच्या आत्म्याला शांती लाभो; ही ईश्वर चरणी प्रार्थना! सुर्वे कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.