सिंधुदुर्गात ८ नवे रुग्ण, रुग्ण संख्या १८६
१४७ जणांनी कोरोनावरती मात, ३४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु
सिंधुदुर्गनगरी:- सिंधुदुर्गातील एकूण रुग्ण संख्या १८६ वर पोहचली असून बुधवारी नव्याने आठ रुग्ण आढळून आले आहेत. दिलासा देणारी बाब १८६ पैकी १४७ जणांनी कोरोनावरती मात केली असून ३४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी दिली.
एकूण नमुने- ३ हजार ३२४
अहवाल प्राप्त नमुने- ३ हजार ३०५
नकारात्मक नमुने- ३ हजार ११९
सकारात्मक नमुने – १८६
अहवाल प्राप्त न झालेले – १९
मृत्यू रुग्णांची संख्या – ४
मुंबईला गेलेला रुग्ण -१
जिल्ह्यात एकूण कंटेनमेन्ट झोन ९०, सक्रिय १२