प. पू. गगनगिरी महाराज सिद्ध तपोवन मनोरी आश्रमात चक्री कीर्तन सोहळा

मुंबई:- परमपूज्य गगनगिरी महाराज सिद्ध तपोवन मनोरी आश्रम आणि आनंद युवा संघ (रजि.) यांच्या संयुक्त विद्यमाने चक्री कीर्तन सोहळा रविवार २५ मे २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

त्यावेळी ह भ प. कु. श्रुती सावंत (गणेशभक्त शिवशर्मा), ह. भ. प. सौ. श्रावणी सामंत (सद्गुरू त्रिविक्रम भारती), ह. भ. प.सौ. मनाली धायगुडे (गोपी प्रेम), ह. भ. प.सौ. प्राची कर्वे ( गणेशाला दुर्वा का प्रिय?), ह. भ. प. कु. क्षितिजा लोखंडे (समर्थांना दत्त गुरु दर्शन), ह. भ. प. सौ. प्रवेशा भोईर ( ब्रम्हचारी दत्तमूर्ती महाराज), ह. भ. प. श्रीमती अस्मिता दाभोलकर (संत नामदेव गुरुभेट), ह. भ. प. सौ. उमाताई तेंडोलकर (संत योगी गगनगिरी) ह्या महिला कीर्तनकारांची संपन्न होणार आहेत.

कार्यक्रमाची रूपरेषा:- सकाळी ९:३० वाजता मान्यवराच्या हस्ते दीप प्रज्वलन, गगनगिरी महाराज पूजन, सकाळी १० वा.- कीर्तन सुरू प्रथम सत्र, दुपारी १२ व. होम हवन, आरती, महाप्रसाद, दुपारी २ वा. कीर्तन सुरू द्वितीय सत्र, सायंकाळी ४ वा. सांगता कीर्तन (परमपूज्य गगनगिरी महाराज), सायंकाळी ५ वा. कीर्तनकार सन्मान, सायंकाळी ५:३० वा. आभार प्रदर्शन आणि सांगता.

परमपूज्य गगनगिरी महाराज सिद्ध तपोवन मनोरी आश्रम आणि आनंद युवा संघ (रजि.) यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या चक्री कीर्तन सोहळ्यात सर्वांनी उपस्थित राहावे; अशी विनंती आयोजकांनी केली आहे.

आध्यात्मिक भजनाचा खराखुरा `नंदादिप’ कोकणाला गवसला!

आध्यात्मिक आणि सामाजिक सेवेची बांधिलकी जोपासणारा आनंद युवा संघ!