महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेची अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करावीत – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

सिंधुदुर्गनगरी:- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत प्राधान्य गटातील लाभार्थ्यांची ग्रामसभेत यादी वाचून संबंधिताना अनुज्ञये कामांबाबत ग्रामसभेत माहिती द्व्यावी, मुदत संपलेली अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करावीत, तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी कामांच्या नियमित तपासण्या कराव्यात, नियमित आढावा बैठका घ्याव्यात, उद्दिष्टांनुसार मनुष्यदिवस निर्मिती करावी, घरकुलांची कामे वेळेत पूर्ण करावीत, कामांच्या संचिका व नोंदवह्या अद्यावत ठेवाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिल्या.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामकाज आढावा बैठक

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामकाज आढावा बैठक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) नितीन राऊत, जिल्हास्तरीय यंत्रणांचे प्रमुख तसेच तालुका स्तरावरील सर्व गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, वनक्षेत्रपाल उपस्थित होते.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग व बांबू लागवडमध्ये आत्तापर्यंत २५८५४ हे. क्षेत्र लागवडीखाली आलेले आहे. चालू आर्थिक वर्षात ४६३२८० मनुष्य दिवस निर्मिती झाली आहे. योजने अंतर्गत एकूण १९.३२ कोटी रुपये खर्च झालेला आहे. जिल्ह्याची आधार आधारित प्रदानेची टक्केवारी ९९.७२ % पूर्ण झालेली असून Active मजुरांची e-KYC ५६.६१ टक्के पूर्ण झालेली असून उर्वरित मजुरांची e-KYC तात्काळ पूर्ण कराव्यात, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

आर्थिक वर्ष सन २०२५-२६ मध्ये झालेली मनुष्यदिवस निर्मिती: मालवण – ४६१६७ (३६.६० टक्के), सावंतवाडी – ५८४६५ (५८.१४ टक्के), वैभववाडी – ३६५१९ (५९.१० टक्के), दोडामार्ग – ३७१९९ (६९.६० टक्के), कुडाळ – १०२११९ (७१.०१ टक्के), देवगड – ६५०८८ (७४.९९ टक्के), वेंगुर्ला – ३८७४४ (७६.२८ टक्के), कणकवली – ७८९७९ (७६.९३ टक्के) अशी एकूण ४६३२८० (६३.८१ टक्के) मनुष्यदिवस निर्मिती झाली आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत तालुकानिहाय सुरु असलेल्या घरकुल कामांची संख्या: देवगड – १९७, दोडामार्ग – १७७, कणकवली – ३१७, कुडाळ – ५०५, मालवण – २४८ , सावंतवाडी – २८४, वैभववाडी – १०८, वेंगुर्ला – २१६ असे एकूण २ हजार ५२ घरकुलांची कामे सुरु आहेत.

error: Content is protected !!