तिमिरातुनी तेजाकडे… शैक्षणिक चळवळ कोकणातील देवळांमधून… एक नवा आदर्श!
शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव घडविण्यासाठी कोकणातील तसेच महाराष्ट्रातील शैक्षणिक चळवळ
कालपासून एक फोटो सतत प्रसारीत होत आहे नदीघाटावर विविध परीक्षांच्या अनुषंगाने अभ्यासासाठी बसलेले तरुण वर्ग. आता आपला फोटो पहा जो कोकणातील शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव घडवण्यासाठी शैक्षणिक चळवळ असलेला फोटो आहे.
मंदिराच्या आवारामध्ये धार्मिक कार्यक्रम होतात परंतु कोकणात मंदिराच्या आवारामध्ये यूपीएससी, एमपीएससी व विविध परीक्षांसाठी निशुल्क मार्गदर्शन व्याख्याने सुद्धा होतात. गुहागर तालुक्यातील श्री सोमनागेश्वर मंदिर, तळवली येथील ग्रामीण भागातील विद्यार्थी, पालक वर्ग, शिक्षक वर्ग, ज्येष्ठ व्यक्ती म्हणजेच एकंदरीत सर्व वयोगटातील ग्रामीण भागातील व्यक्ती मार्गदर्शनासाठी उपस्थित होते आणि विविध ठिकाणी असतात देखील.
दुसऱ्या चित्रामध्ये मंडणगड तालुक्यातील अंतिम टोक असलेल्या वेसवी या ग्रामीण भागात डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शाळेमध्ये हनुमान जयंतीचा कार्यक्रम असतानादेखील त्या खेड्यामधील व आजूबाजूच्या खेड्यांमधील जवळपास शंभर ते दीडशे विद्यार्थी दुपारच्या वेळेस घरी झोपा न काढता, एसटी उपलब्ध नाही असे कारण न देता किंवा धार्मिक कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून सुद्धा भविष्यातला अधिकारी मी असेन ही धारणा घेऊन नि:शुल्क मार्गदर्शन व्याख्यानाला उपस्थित होते.
मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार या विभागात कनिष्ठ अनुवाद अधिकारी या पदावर कार्यरत व सात शैक्षणिक अर्हता असलेले कोकणचे सुपुत्र श्री. सत्यवान यशवंत रेडकर कोणतेही मानधन न घेता निशुल्क मार्गदर्शन व्याख्यान देत होते. कोणताही वातानुकूलित सभागृह नव्हता, किंवा कोणतीही बैठक व्यवस्था नव्हती परंतु तरीही जवळपास 3 तास खाली मांडी घालून विद्यार्थी व पालक वर्ग लाभ घेत होते. यापूर्वी कधीही कोकणामध्ये प्रशासकीय अधिकारी घडत नाहीत म्हणून आंदोलन झाले नाहीत, उपोषणे झाली नाहीत, केवळ वक्तव्य करण्यामध्ये इतरांनी रस घेतला परंतू तिमिरातुनी तेजाकडे ही सत्यवान यशवंत रेडकर सरांची शैक्षणिक चळवळ नक्कीच प्रभावशाली ठरलेली आहे. जी चळवळ फक्त कोकण पुरती मर्यादित नाही तर संपूर्ण महाराष्ट्र साठी निशुल्क मार्गदर्शन करणारी व प्रशासकीय स्वराज्य निर्माण करण्यासाठी वास्तविक कार्य करणारी संस्था आहे.
आम्ही यापासून काही बोध घेणार का? आपण संबंधित पोस्ट प्रसारित करणार आहात का? तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीला पाठिंबा देऊन संपूर्ण महाराष्ट्र मधील विद्यार्थ्यांना येत्या भविष्यात विविध प्रशासकीय पदांवर नेण्यासाठी व आपले प्रशासकीय स्वराज्य घडवण्यासाठी प्रयत्न करणार आहात का? सोशल मीडिया व प्रसारमाध्यमे या चळवळीला गावागावात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार का? केवळ तुलना करून चालणार नाही तर प्रत्यक्ष कृती, जास्तीत जास्त जनजागृती करून या शैक्षणिक चळवळी मध्ये समाविष्ट होणे आवश्यक आहे.
श्री. सचिन यशवंत रेडकर
अध्यक्ष, तिमिरातुनी तेजाकडे
मो. 9768738554/ 9969657820 (whatsApp & call)
TELEGRAM: https://t.me/timiratunitejakade
Facebook: https://www.facebook.com/groups/2401999590121255/
YouTube: https://www.youtube.com/channel/UCTryLMprTbzXlzIE6HP0wAQ