राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सिंधुदुर्गात विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी:- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व संबंधित खेळाच्या संघटनेच्या सहकार्याने जिल्हा संकुल, सिंधुदुर्गनगरी येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध खेळ प्रकारांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली आहे.
दि. 29 ऑगस्ट 2023 रोजी क्रीडा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्गनगरी येथे दि. 26 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 वाजता 18 ते 40 वयोगटांतील पुरुष व महिलांसाठी 100 मीटर धावणे, योगा, फुटबॉल, बॅडमिटन, कॅरम, लंगडी, लिंबू चमचा, तर 41 ते 60 वयोगटातील पुरुष व महिलांसाठी 50 मीटर धावणे, 300 मीटर धावणे, 1 किलोमीटर चालणे, खो-खो, योगासन, कॅरम, बॅडमिंटन, बुध्दिबळ तसेच 60 वर्षाच्यावर वयोगटासाठी 300 मीटर जोरात चालणे, 1 किलोमीटर चालणे, बुध्दिबळ, कॅरम या खेळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्गनगरी येथे होतील. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडुंनी 24 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत आधारकार्डची झेरॉक्स प्रत जोडून आपल्या नावांची नोंदणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे करावी.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने पोलिस विभाग, वित्त विभाग व महसूल विभाग यांनीही आपल्या विभागामार्फत विविध खेळांच्या स्पर्धेचे आयोजन करावयाचे आहे.