नवी दिल्लीत यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी
नवी दिल्ली:- महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे साजरी करण्यात आली.
कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त विजय कायरकर, अजितसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पअर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र परिचय केंद्रात यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा, उपसंपादक रितेश भुयार, साप्ताहिक हिंदू हितचे संपादक मनोज माहेश्वरी, दैनिक बदलापूर विकासचे वरिष्ठ पत्रकार डॉ. जगन्नाथ कामत यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पअर्पण करून आदरांजली वाहिली.