पॅन कार्ड व आधार कार्ड लिंक करण्याची मुदत उद्यापर्यंत…

पॅन कार्ड व आधार कार्ड लिंक करण्याची मुदत ३० जून २०१८

नवी दिल्ली:- पॅन कार्ड व आधार कार्ड लिंक करण्याची मुदत उद्यापर्यंत म्हणजेच ३० जून २०१८ आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने पॅनकार्ड आधार कार्डला जोडण्यासाठी चार वेळा वाढवून दिलेली मुदत उद्या संपत आहे. पॅन कार्ड व आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक असून ऑनलाईन लिंक करता येते. आयकर विभागाच्या www.incometaxindiaefiling.gov.in ह्या वेबसाइट वर लाल रंगात ‘लिंक आधार’ असे लिहीलेल्या पर्यायावर क्लिक करून सूचनांचे पालन केल्यास पॅन कार्ड व आधार कार्ड लिंक होते. पॅन कार्ड व आधार कार्ड लिंक केले नाही तर इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करता येणार नाही. तसेच कर परतावा मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *