देशात आमदारही सुरक्षित नाहीत! इतके भीतीचे वातावरण देशात ह्यापूर्वी कधीच नव्हते!

मित्रहो,
निर्भय अन् मुक्त वातावरण देशात आता कुठेच राहिलेले नाही! कुणीच सुरक्षित नाही! कुणीच म्हणजे लोकप्रतिनिधीही सुरक्षित राहिलेले नाहीत! तर सामान्य जनतेचे काय? गेल्या आठ दिवसात बिहार अन् झारखंडमधील सुमारे ३०० आमदार भीतीच्या वातावरणात जगत आहेत. त्यांना आपले कर्तव्य निभावू दिले जात नाही. असे वातावरण पहिल्यांदाच निर्माण झाले आहे, असेही नाही! मोदी सत्तेवर आल्यापासुन देश ह्या प्रकारच्या वातावरणाचा सतत सामना करीत आहे. यामध्ये संविधान, लोकशाही व लोकमताचा गळा घोटाला जात आहे!

मतदारांनी मते दिली नाहीत, तरी सरकारं आम्हीच स्थापन करू! त्यासाठी वाट्टेल ते करू! काहीही करून आम्हाला सत्ता हवी आहे! असे धोरण सध्या भाजपचे आहे. ५ वर्षांपूर्वी भाजपने कर्नाटकात घोडेबाजार करून लोकनियुक्त सरकार पाडले. मध्यप्रदेश व गोव्यातही तेच केले अन् महाराष्ट्रात तर जे काही केले ते तर लोकशाही व संविधानाच्या चिंध्या करणारे आहे! नीतिमत्तेच्या अपेक्षा संघ व भाजपकडून करणे म्हणजे मूर्खपणा करण्यासारखे आहे! नितीमत्तेची पातळी भाजपाने ओलांडली आहे.

सकाळी नाश्ता करून नितीशकुमार राज्यपालांना भेटून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतात. दुपारी भाजपसोबत सरकारं स्थापन करण्याच्या दावा करतात. अन् त्याच दिवशी रात्री पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतात. महाराष्टात राज्यपाल पहाटेच फडणवी यांना शपथ देतात. पण पूर्ण बहुमत असताना व राज्यपालांना ते माहित असतानाही त्यांची सदसदविवेक बुद्धी काम करीत नाही. कर्तव्य बजावू देत नाही, संविधान व लोकशाही मार्गाने काम करू देत नाही. इतक्या खालच्या पातळीवर भाजपने सर्व संवैधानिक पदांना आणले आहे.

लोकशाही व संविधानाचा गळा घोटणाऱ्या अन् देशात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या भाजपला संसदीय राजकारणातून हद्दपार करण्याचा पक्का निर्धार आता भारतीय जनतेनेच केला पाहिजे व तो करावा! ती काळाची गरज आहे. संविधान व लोकशाहीने दिलेल्या मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून ते आपण सहज करू शकतो.

जयभीम! जय समाजवाद!! जय संविधान…!!!

-राहुल गायकवाड
महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश

 

(सूचना- राजकीय लेखामध्ये राजकीय व्यक्तीने व्यक्त केलेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही!)

You cannot copy content of this page