Pulwama terror attack: दहशतवाद्यांच्या भीषण हल्ल्यात ३९ जवान शहीद
`जैश-ए-मोहम्मद’ने जबाबदारी स्वीकारली, देशात संतापाची लाट, जगभरातून निषेध
श्रीनगर:- `जैश-ए-मोहम्मद’च्या दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) एका तुकडीवर केलेल्या भीषण आत्मघाती हल्ल्यात ३९ जवान शहीद झाले असून त्याविरोधात देशात तीव्र संताप व्यक्त केला जात असून ह्या भ्याड हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे. २०१९ मधील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून त्यांनी लगेच एक चित्रफीत जाहीर केली आहे.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात श्रीनगर-जम्मू महामार्गावर अवंतीपुरा येथील लट्टूमोड येथे दुपारी सव्वा तीन वाजता जवानांच्या वाहनावर दहशतवाद्यांचं स्फोटकं भरलेलं वाहन धडकलं आणि प्रचंड मोठा स्फोट झाला. ह्यामध्ये अनेक जवान जखमी झाले आहेत.