श्रीगुरुचरणमासनिमित्त अनिरूद्धांचे गुणसंकीर्तन दिवस – १९

*🌟श्रीगुरुचरणमासनिमित्त अनिरूद्धांचे गुणसंकीर्तन दिवस -१९🌟*

*🔆 भक्तिमय सेवा : भाग – ३🔆*

१.रक्तदान शिबीर
२.कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर

*🔅🩸रक्तदान शिबीर🩸🔅*

🔅२०१६-१७ साली आपल्या देशाला १९ लाख युनिट्स रक्ताचा तुटवडा भासला होता. २०१५-१६ साली ही संख्या ११ लाखांवर होती. यावरून किती मोठ्या प्रमाणावर रुग्णालयांमधून रक्ताची गरज आहे, हे लक्षात येते. प्रत्येकवर्षी देशाला पाच कोटी युनिट्स रक्ताची आवश्यकता आहे. प्रत्येक दोन सेकंदाला कोणालातरी रक्ताची गरज भासते. या सर्व गोष्टींचा विचार केल्यास दररोज ३८ हजारहून अधिक रक्तदान शिबिरे आयोजित करायला हवीत. ही सर्व माहिती बातम्या आणि काही संस्थांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालातून समोर आली आहे. यावरून आपल्याला रक्त आणि रक्तदान शिबिराचे महत्त्व लक्षात येते. वेळीच याचे गांभीर्य ओळखून सदगुरु श्रीअनिरुद्धांनी आपल्या कार्यामध्ये रक्तदानाचा समावेश केला.

*🔅‘परमात्म्यास नऊ प्रकारचे थेंब अत्यंत आवडतात, ज्यात एका श्रद्वावानाने दुसर्‍या श्रद्वावानांसाठी निरपेक्ष भावनेने केलेल्या रक्तदानाचे थेंबही महत्त्वाचे आहेत’,* असे सदगुरु श्री अनिरुद्धांनी श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराजाच्या ‘आनन्दसाधना’ या तृतीय खंडात सांगितले आहे.

🔅१९९९ सालापासून सदगुरु श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्ट, अनिरुद्ध समर्पण पथक, अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, दिलासा मेडिकल ट्रस्ट अ‍ॅन्ड रिहॅबिलिटेशन सेंटर, श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन, अनिरुद्धाज् हाऊस ऑफ फ्रेंड्स या संलग्न संस्था दरवर्षी एप्रिल महिन्यात महारक्तदान शिबिराचे आयोजन करतात. हे शिबिर वांद्रे, न्यू इंग्लिश स्कूल (श्रीहरिगुरुग्राम) येथे आयोजित केले जाते.

🔅एप्रिल महिनाच का? कारण उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेक मंडळी गावाला जातात. त्यावेळी रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासतो. म्हणून एप्रिल महिन्यातच रक्तदान शिबिर आयोजित केले जाते.

🔅२१ फेब्रुवारी १९९९ साली संस्थेने दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये पहिल्या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. एका दिवसाच्या या रक्तदान शिबिरात १५४ पिशव्या रक्त जमा झाले होते. जमा करण्यात आलेले हे रक्त टाटा रक्तपेढीकडे सुपूर्द करण्यात आले.

🔅या शिबिराला *२५ वर्ष* पूर्ण झाली. या २५ वर्षात शिबिराचे स्वरूप पूर्णतः बदलले. रक्तदान शिबिराबद्दल उपासना केंद्रांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. त्यानंतर हळूहळू या शिबिराला प्रतिसाद मिळत गेला. आजच्या घडीला या शिबिरात हजारोंच्या संख्येने रक्तदाते सहभागी होतात. केवळ मुंबईतच नाही तर एकाच वेळी महाराष्ट्रात इतर ठिकाणीही रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात.

🔅१९९९ साली १५४ रक्ताच्या पिशव्या जमा झाल्या. त्यानंतरच्या दुसर्‍या वर्षी म्हणजेच २००० साली ४१२ रक्ताच्या पिशव्या आणि २००१ साली ६१३ रक्ताच्या पिशव्या जमा झाल्या. २००२ साली हजारांच्या पुढे म्हणजेच १५४८वर रक्ताच्या पिशव्या जमा झाल्या. त्यानंतर मात्र ही संख्या उत्तरोत्तर वाढतच गेली.

२००३ साल – २४१३

२००४ साल – २४०४

२००५ साल – २३८०

२००६ साल – ३६७६

२००७ साल – २३५२

२००८ साल – २८६६

२००९ साल – ३१७९

२०१० साल – ३०८३

२०११ साल – २४९६

२०१२ साल – ४६९१

२०१३ साल – ५१७८

२०१४ साल – ५७४६

२०१५ साल – ५२२९

२०१६ साल – ४५०४

२०१७ साल – ५२८८

२०१८ साल – ५८३८

त्याचवेळी २०१८ साली राज्यभरात अन्यत्र आयोजित शिबिरात २९३२ रक्तपिशव्या जमा झाल्या.

🔅१९९९ सालापासून २०१८ सालापर्यंत आयोजित रक्तदान शिबिरात एक लाखांहून अधिक रक्तपिशव्या जमा झाल्या आहेत. हा सदगुरु श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्टचा विक्रमच म्हणावा लागेल. हे रक्तदान शिबिर ‘रक्तदान शिबिराचे आयोजन कसे करावे’ याचे जणू मॉडेलच बनले आहे, असे सांगून ‘महाराष्ट्र राज्य रक्तसंक्रमण परिषदे’ने संस्थेचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर संस्थेला इतर संस्थाकडूनही त्यांच्याकरिता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यासाठी निमंत्रणे येतात. हे रक्तदान शिबिराला मिळालेले सर्वात मोठे यश आहे.

🔅२०१० साली एका राजकीय पक्षाने रक्तदान शिबिराच्या आयोजनासाठी संस्थेला निमंत्रित आमंत्रित केले होते. या रक्तदान शिबिरात *२५,०००* बाटल्या रक्त जमा झाले होते. याची *‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’* मध्ये नोंद झाली होती.

🔅शंभरीने झालेली ही सुरुवात आज हजारोंवर पोहोचली याचे कारण याबद्दल केली गेलेली जागरूकता. अनेकांना रक्तदान म्हटले की भिती वाटते. पण रक्तदान शिबिरात केवळ ३०० मि.ली रक्त काढले जाते. रक्तदानानंतर ३६ तासात शरीरात रक्ताची पातळी पूर्ववत होते. तसेच दोन-तीन आठवड्यांमध्ये रक्तपेशीही पूर्ववत होतात. रक्तदान केल्याने कोणताही त्रास किंवा इजा होत नाही. आपल्या काही मि.ली. रक्तामुळे कोणा एकाचा जीव वाचण्यास मदत होते. हे सर्व श्रद्वावानांना पटवून देण्यात संस्था आणि उपासना केंद्राना कमालीचे यश आले.

🔅रक्तदान शिबिराच्या महिनाभर आधी सर्व उपासना केंद्रामधल्या श्रद्वावानांना रक्तदानासाठी प्रोत्साहित केले जाते. इतकेच नाही तर श्रद्वावान आपले नातेवाईक आणि मित्र-परिवारांमध्येही रक्तदान शिबिराची माहिती देऊन त्यांना यात सहभागी करून घेतात. रक्तदान शिबिराच्या आधी रक्तदानासाठी काय आहार करावा? रक्तदान कोणी करावे? रक्तदानाआधी काय काळजी घ्यावी? याची सविस्तर माहिती दिली जाते. आता तर सोशल मीडियाच्या माध्यमातून रक्तदानाबद्दल जागरूकता निर्माण केली जाते.

🔅रक्तदान शिबिरामध्ये रुग्णालये व रक्तपेढ्या सहभागी होतात. त्यांच्या डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफबरोबर संस्थेच्या वैद्यकीय शाखेचे डॉक्टर व पॅरामेडिकल सदस्यही तेवढ्याच तत्परतेने संपूर्ण दिवस रक्तदात्यांच्या मदतीसाठी उपस्थित असतात.

🔅रक्तदान शिबिराच्या दिवशी सकाळपासूनच रक्तदात्यांची रांग लागलेली असते. उपासना केंद्रातले श्रद्वावान बसेस करून या ठिकाणी येतात. अगदी पद्धतशीरपणे या शिबिराचे आयोजन केलेले असते. सुरुवातीला काऊंटर्सवर चहा-नाश्ता केला आहे की नाही, याची विचारणा केली जाते. नसेल तर त्यांच्यासाठी तो उपलब्ध करून दिला जातो. त्यानंतर त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतला जातो. हिमोग्लोबीन इत्यादी सर्व तपासले जाते. त्यानंतरच त्या व्यक्तीला रक्तदानाला पाठविले जाते.

🔅शिवाय क्राऊड मॅनेजमेंटचीही व्यवस्था चोख केलेली असते. त्यामुळे गर्दी देखील होत नाही. तसेच आजूबाजूला भक्तिमय वातावरण असते. गजराच्या तालात रक्तदाते रक्तदान करत असतात. त्यामुळे त्यांची भीती कमी होते आणि त्यांचा उत्साह अधिकच वाढतो. रक्तदानासाठी रिजेक्ट झालेले श्रद्वावान ‘चरखा’ चालविण्याची सेवा करतात. तसेच पुढच्या वर्षी नक्की रक्तदान करू अशी शपथ यावेळी घेतात.

*🔅२०१८ सालचे रक्तदान शिबिर –*

🔅२२ एप्रिल २०१८ साली *‘श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन’* व संलग्न संस्थांनी राज्यभरात एकाच वेळी ३९ ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. संस्थेच्या या महारक्तदान शिबिरात तब्बल *८७७० पिशव्या* रक्त जमा झाले. यात मुंबईत वांद्रे पूर्व येथे आयोजित महारक्तदान शिबिरात ५८३८पिशव्या तर राज्यभरात अन्यत्र आयोजित शिबिरात २९३२ रक्तपिशव्या जमा झाल्या.

🔅मुंबईव्यतिरिक्त राज्यात पुणे, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, अकोला, जळगाव, सिंधुदूर्ग, पालघर जिल्ह्यातही रक्तदान शिबिर पार पडले. पुणे जिल्ह्यात एकूण १७ ठिकाणी आयोजित शिबिरात १६४० पिशव्या, कोल्हापूर ४२४ पिशव्या रक्त जमा झाले. तर, पालघर जिल्ह्यातील बोईसरमध्ये १२७, पालघरमध्ये १३१, डोंगस्तमध्ये ८३ पिशव्या रक्त जमा झाले. या व्यतिरिक्त उरणमध्ये १२१, अकोला, १६, मिरज ६२, वाघोटन २८, संगमनेर ७२, चोपडा ११ आणि डहाणू रोड येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ८९ पिशव्या रक्त जमा करण्यात आले.

🔅वांद्रे येथील रक्तदान शिबिरात ४० रक्तपेढ्या सहभागी झाल्या होत्या. यामध्ये के.ई.एम हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल ब्लड बँक, सैफी हॉस्पिटल, कोकिलाबेन धिरुबाई अंबानी हॉस्पिटल, जे.जे.महानगर ब्लड बँक, बाबासाहेब आंबेडकर म्युनिसिपल हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल, राजावाडी हॉस्पिटल, ‘आयुष ब्लड बँक’ (नागपूर), ब्लड लाईन (ठाणे), वाडिया हॉस्पिटल, डी.वाय.पाटील हॉस्पिटल, बॉम्बे हॉस्पिटल, मसिना हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटलसह इतर रक्तपेढ्यांचा समावेश होता.

🔅रक्तदान शिबिर फक्त एका दिवसापुरतेच मर्यादित न राहता उपासना केंद्र दर सहा महिन्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करते. या रक्तदान शिबिरालाही उस्फूर्त प्रतिसाद मिळतो.

*🔆👨‍⚕️कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर🧑‍⚕️🔆*

🔅शरीराला आवश्यक असणारे एकवेळचे अन्नही जेव्हा उपलब्ध होत नाही, त्या वेळी वैद्यकीय उपचार घेण्याचा विचार ही तर चैनच म्हणावी लागेल. गरिबीमुळे शिक्षण नाही, त्यामुळे स्वच्छतेसारख्या महत्त्वाच्या बाबी दुर्लक्षित राहतात. पुरेसे अन्न मिळत नाही म्हणून कुपोषण येते आणि आरोग्यविषयक समस्या जटिल होत जातात. भारतात कुपोषणाची समस्या सर्वाधिक असल्याचे विविध अहवाल सांगतात. झपाट्याने विकास होत असला, शहरे आणि गावांमधील सीमा धूसर होत असली, तरी ही परिस्थिती फारशी बदललेली नाही. ग्रामीण, दुर्गम भागांमध्ये लहान मुले आणि महिलांमध्ये कुपोषण, अशक्तपणा, रक्ताल्पता यांसारख्या समस्या अजूनही मोठ्या प्रमाणावर कायम आहेत. या मूळ समस्यांना चिकटून मोठ्या होत जाणार्‍या आरोग्यविषयक समस्यांची यादी खूप मोठी आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही.

*🔅मात्र योग्य दिशेने आणि शास्त्रशुद्ध संशोधनाने प्रयत्न केल्यास अशा समस्या असलेल्या ठिकाणांची परिस्थिती पालटू शकते,* हे डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी अर्थात् सद्गुरु श्री अनिरुद्धांनी (बापुंनी) दाखवून दिले आहे.

🔅२००४ सालापासून कोल्हापूर शहरापासून ३० किलोमीटर दूरवर असलेल्या पेंडाखळे या लहानश्या खेड्यात आरोग्य शिबिर भरविण्यास सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या प्रेरणेने सुरुवात झाली. आज चौदा वर्षानंतर पेंडाखळे आणि त्याच्या आजूबाजूच्या खेड्यांमधील परिस्थिती पुरती पालटलेली दिसते. श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन, दिलासा मेडिकल ट्रस्ट ऍण्ड रिहॅब्लिटेशन सेंटर, श्री अनिरुद्ध आदेश पथक, अनिरुद्धाज् हाऊस ऑफ फ्रेंडस व संलग्न संस्था एकत्र येऊन व्यापक प्रमाणात या ‘कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिरा’चे आयोजन करतात.

🔅‘कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिरा’ची व्यापकता, यासाठी संस्थेच्या श्रद्धावान कार्यकर्त्यांनी केलेले सर्वेक्षण, अभ्यास, आखणी आणि नियोजन या सर्व गोष्टी पाहून थक्क व्हायला होते. देशात अनेक ठिकाणी विविध संस्था आरोग्य शिबीराचे आयोजन करीत असतात. मात्र *‘कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य शिबिरा’च्या* आयोजनाचा उद्देश केवळ आरोग्य तपासणी आणि मोफत औषध वाटप इतकाच नसून आरोग्यविषयक समस्यांशी निगडित मूळ कारण उपटून टाकणे हा आहे. रोग झाल्यावर उपाय करण्यापेक्षा रोगास प्रतिबंध करणारे उपाय करणे हा मूलमंत्र या शिबिरातून जपला गेला आहे. यासाठी शिबिराचे आयोजन करण्यापूर्वी शास्त्रशुद्ध अभ्यास केला जातो, तसेच वर्षभर पाठपुरावा चालतो. सर्व समस्यांना सर्वांकष विचार केला जातो.

🔅संस्थेतर्फे आरोग्य शिबिरासाठी पेंडाखळे या गावाचीच निवड का करण्यात आली? हा प्रश्‍न पडू शकतो. कोल्हापूर शहरापासून अवघ्या तीस किलोमीटवर असणार्‍या पेंडाखळे व आजूबाजूच्या गावात कुपोषण व आरोग्य विषयक समस्या भयावह होत्या. बहुसंख्य गावकरी आर्थिक समस्येने ग्रस्त होते. येथील नागरिकांचे राहणीमान शिबिर भरविण्यासाठी आवश्यक निकषांमध्ये बसत होते. याशिवाय कोल्हापूर व आजूबाजूच्या विभागात संस्थेच्या शिस्तबद्ध श्रद्धावान कार्यकर्त्यांची मोठी फळी उपलब्ध होती, म्हणूनच या भागाची निवड करण्यात आली. हे शिबिर २००४ साली पहिल्यांदा *पेंडाखळे* जवळच असणार्‍या करंजफेण या गावात भरविण्यात आले होते, तर २००५ पासून हे शिबिर पेंडाखळेमध्ये भरविले जाऊ लागले.

🔅सद्गुरू श्रीअनिरुद्ध अर्थात डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी स्वत: एम. डी. (मेडीसिन) आहेत. १९८५ पासून दिलासा मेडीकल ट्रस्टद्वारे आपल्या सामजिक कार्याची मुहूर्तमेढ रोवणार्‍या बापूंनी संस्थेच्या माध्यामातून विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये वैद्यकीय शिबिर हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे.

🔅कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिरापूर्वी धुळे जिल्ह्यातील आदिवासीबहुल भाग असलेल्या ‘मेथी’ येथे संस्थेतर्फे वैद्यकीय व आरोग्य शिबिर भरविले जात होते. यामुळे येथील आजूबाजूच्या आदिवासी पाड्यांमधील आरोग्य परिस्थिती सुधारली. हे गाव आरोग्याच्या दृष्टीने सजग झाले. गावकर्‍यांमध्ये वेगळाच आत्मविश्‍वास आला. यानंतर *’कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर’* हा उपक्रम हाती घेण्यात आला. ’मेथी’ येथे काही वर्षे भरवीत असलेल्या वैद्यकीय शिबिराचा अनुभव गाठीशी होता. हा अनुभव गाठीशी घेऊनच शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून कोल्हापुरात वैद्यकीय व आरोग्य शिबिर भरविले जाऊ लागले.

🔅हे शिबिर दोन दिवसाचे असते. परंतू याची पूर्वतयारी मात्र वर्षभर सुरु असते. *या शिबिरासाठी सुमारे ४००० श्रद्धावान कार्यकर्ते सज्ज असतात, त्यातील सुमारे १००० श्रद्धावान कार्यकर्ते मुंबईहून जातात. त्यामध्ये निष्णात डॉक्टर्स, पॅरामेडीकल स्टाफ* देखील असतो.

🔅आजारपणाला आमंत्रण देते ती अनारोग्यस्थिती आणि ती उद्भवते चुकीच्या सवयींमुळे. ह्या शिबिरीच्या सुरुवातीला केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले की अस्वच्छ पाणी, उघड्यावर शौच, केवळ परिसराचीच नव्हे तर शरीराचीही अस्वच्छता यामुळे आजारपणांना आयते आमंत्रण मिळत होते. सर्वच गावकर्‍यांमध्ये मध्यम व तीव्र स्वरूपाचा अ‍ॅनिमिया दिसून आला. त्यातच चुकीच्या समजुती, त्यामुळे येणारे अनारोग्य या सार्‍याचा विचार करुन केवळ वैद्यकीय सेवासुविधाच नाही, तर गरजूंना औषधांचे आणि नित्योपयोगी वस्तूंचे, शालेय विद्यार्थ्यांना गणवेश आणि क्रीडासाहित्य इत्यादींचे वाटप केले जाते. गावातील कुटुंबांची संख्या, कोणत्या भागात अशा वस्तू पुरविण्याची आवश्यकता आहे, याचे नीट सर्वेक्षण केले जाते. त्यानंतर शिबिरासाठी तयारी सुरू होते. हे काम वर्षभर चालते आणि दोन दिवसाच्या शिबिरात अतिशय नियोजन पद्धतीने शिस्तबद्धरित्या, कोणतीही गडबड गोंधळ न होता सर्व आयोजन होते.

🔅गावकर्‍यांना दंतमंजन, साबण, पाणी शुद्ध करण्याचे औषध, ऊवांचे औषध, गोधड्या, कपडे, भांडी अशा गोष्टीचे वाटप केले जाते. मुलींच्या केसांत जटा होऊ नयेत यासाठी कंगव्याचा देखील आवर्जून समावेश केला जातो. तसेच त्यांना स्वच्छतेबद्दलचे मार्गदर्शनदेखील केले जाते. महिलांसाठी लुगडी (साड्या – नऊवारी व सहावारी), बांगड्या व टिकल्यांचेही वाटप होते.

🔅हे वाटप शिबिराच्या पहिल्या दिवशी होते. सकाळी लवकर वाटपाला सुरुवात होते. सर्वेक्षण केलेल्या गावात टेंपोमध्ये सामानांचे गाठोडे भरून श्रद्धावान कार्यकर्ते जातात. गावातील प्रत्येक कुटुंबाच्या नावाने एक गाठोडे बनवलेले असते. २०१७ मध्ये *९२ गावातील ८७६६* कुटुंबांना वाटप केले होते. त्याचबरोबर इतर अनेक आवश्यक गोष्टींचे वाटप केले जाते. दिवसभराच्या मेहनतीनंतर जेव्हा सेवेकरी पुन्हा शिबिराच्या स्थळी येतात, तेव्हा त्यांना श्रमपरिहार म्हणून सत्संगाचे आयोजन केले जाते.

🔅दुसर्‍या दिवशी वैद्यकीय शिबिरास सुरुवात होते. पहाटेपासून गावकरी व शाळेतील विद्यार्थी पेंडाखळेला येऊ लागतात. या शिबिरामध्ये कोल्हापूरमधील बर्‍याच शाळेतील विद्यार्थी हजेरी लावतात. विद्यार्थी आपल्या शिक्षकांबरोबर येतात. विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप केले जातात. हे गणवेश तयार करण्यासाठी सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांचे श्रद्धावान मित्र चरखा योजनेच्या अंतर्गत चरखा चालवून लड्या बनवून देतात. या लड्यांमधून कपडा तयार होतो आणि त्याचाच गणवेष तयार करून या विद्यार्थ्यांना मोफत वाटण्यात येतो. श्रमदानातून निर्माण होणारे हे गणवेष या विद्यार्थ्यांच्या भविष्याला विलक्षण कलाटणी देऊ शकतात याचा अनुभव कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबीरात ठायी ठायी येतो. विद्यार्थ्यांना मोफत स्लिपर्सचे जोडही दिले जातात. शिबिराचे या भागात आयोजन होण्यापूर्वी अनेक गावकरी अनवाणी फिरत. लहान मुलांनी कधीही पायात स्लिपर्स घातलेल्या नव्हत्या. त्यामुळे पहिल्यांदा त्यांना पायात घालण्यासाठी नव्या कोर्‍या चप्पल मिळाल्या, त्यावेळी अनेक मुलांच्या चेहर्‍यावर आनंद व अप्रूप दिसून येत होते.

🔅शिबिरात विद्यार्थ्यांना मोफत टोप्यांचे वाटप ही केले जाते. या शाळांची व शाळांमधून येणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याची नोंदणी केली जाते आणि त्यांची मोफत वैद्यकीय तपासणी केली जाते. या मुलांना आवश्यकतेनुसार व्हिटॅमीनची औषधेही मोफत दिली जातात. तसेच मुलांना सुका मेव्याचे पाकीट दिले जाते, जेणेकरुन त्यांना योग्य ती पोषणतत्त्वे मिळू शकतील. त्यानंतर मुलांना मेणबत्ती व काडेपेटीचे वाटप केले जाते, ज्यामुळे अंधारल्यावर वीज नसतानाही मुले अभ्यास करु शकतात. ह्या काडेपेट्या व मेणबत्त्या सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या १३ कलमी योजनेमधील *‘विद्याप्रकाश’* या योजनेअंतर्गत वाटण्यात येतात.

🔅इतकेच नव्हे तर त्यांच्या शाळांना सुद्धा खेळण्यांचे सेट दिले जातात. जसे की दोरीवरच्या उड्या, रिंग्स, फुटबॉल, फ्रीसबीज्‌, क्रिकेटचा सेट इत्यादी. मुलांनी शाळेत येऊन आपले शिक्षण घ्यावे व ही पुढची भारतीय पिढी अधिक सक्षम व सुदृढ व्हावी यासाठी शिबीराचा हा शैक्षणिक पैलू अत्यंत महत्त्वाचा ठरतो. या शिबीराचा लाभार्थी असणार्‍या दोन मुलांनी तर आज त्यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. हीच गोष्ट या शिबिराचे यश सांगण्यास पुरेसे आहे.

🔅या सर्व वस्तूंचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी खूप विचार करण्यात आला आहे. येथे एक उदाहरण बघता येईल, उवांचे औषध व फण्यांच्या वाटपांचे. केसात वापरण्यास फणी नसल्यामुळे जटा निर्माण होण्याचा धोका असता. लहान मुलींच्या डोक्यात अशा जटा निर्माण झाल्यास त्यांना देवदासी बनविण्याची जुनी चुकीची रीत होती. पण केसात जटा होतात, ते केस स्वच्छ न ठेवल्याने, ते नीट न विंचरल्याने. उवांचे औषध व फण्यांचे वाटप केल्यामुळे अनेक मुली या चुकीच्या रूढीच्या आहारी जाण्यापासून वाचल्या. यावरून या साध्यासुध्या वाटणार्‍या गोष्टीचेही महत्त्व अधोरेखित होते.

🔅 या शिबिरात आसपासच्या गावातील अनेक गावकरी येतात. साधारणतः १० ते १२ हजार रुग्णांची नोंद दरवर्षी होते. वैद्यकीय विभागात रुग्णांची मोफत चिकित्सा केली जाते. त्यांच्यावर औषधोपचार केले जातात. यामध्ये सामान्य तपासणी पासून एक्स-रेची देखील सोय केलेली असते. गरजूंचे डोळे तपासून त्यांना चष्म्याचे मोफत वाटप केले जाते. ईसीजीचा देखील समावेश या वैद्यकीय विभागात केलेला असतो. त्याचबरोबर दंतचिकित्सा सेवा ही पुरवली जाते. वर्ष २०१७मध्ये सुमारे १५ हजार हून अधिक रुग्णांची तपासणी निःशुल्क करण्यात आली. तर *१३३ शाळांमधील एकूण ९३४८* विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

🔅शिबिरात येणार्‍या प्रत्येक लाभार्थीला अन्नपूर्णा महाप्रसादम् अंतर्गत निःशुल्क भोजन दिले जाते. सकाळी शिबिरासाठी लवकर आपल्या गावातून निघून उपाशीपोटी उन्हातून, लांबून आलेल्या लाभार्थ्यांना *अन्नपूर्णा महाप्रसादम्‌* जणू पर्वणीच. मनसोक्त अगदी पोट तुडुंब भरेपर्यंत जेवणारे गावकरी आणि विद्यार्थी पाहिले की मन तृप्त होते. शिबिरातील या पंगतींमध्ये सुमारे *५० हजाराहून* अधिक गावकरी जेवतात. यांना प्रेमाने आणि आग्रहाने जेवण वाढले जाते. तितक्याच प्रेमाने मोठमोठ्या भांड्यांमध्ये हे जेवण बनविले जाते. शेकडो स्वयंसेवक या सेवेसाठी श्रमदान करीत असतात.

🔅या शिबिरामुळे या भागाचे चित्र पालटले आहे. नागरिक आरोग्याविषयक समस्यांविषयी जागृत झाले आहेत. त्यांना स्वच्छतेचे महत्त्व कळले आहे. गावकर्‍यांच्या आरोग्यविषयक तक्रारी मोठ्याप्रमाणावर कमी झाल्यात. गावकर्‍यांना शरिराची व परिसराची स्वच्छता याचे महत्त्व पटून त्यांनी स्वच्छतेची सवयही अंगीकारली आहे. कुष्ठरोग रुग्णांची संख्या प्रकर्षाने कमी झाली आहे. संसर्गजन्य रोगांचे प्रमाण कमी झाले आहे. दूषीत पाण्याने होणारे आजार पूर्णतः नष्ट झाले आहेत. दरवर्षी या शिबीराचा लाभ घेणार्‍या गावांची आणि शाळांची संख्या वाढली आहे.

🔅शिबिराचा लाभ घेतलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. इतकेच नव्हे तर शाळांचा निकालही चांगला लागत आहे. कुटुंब नियोजनाबाबत गावकर्‍यांना चांगली माहिती आहे. त्यांच्यामधील जागृकतेबाबत गायनॅकोलॉजिस्टही समाधान व्यक्त करतात. असे अनेक मुद्दे उल्लेखता येतील.

🔅बापूंनी अर्थात् सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या सामाजिक कार्याचा पाया सदैव *भक्ती आणि अध्यात्म हाच आहे. भक्तीच्याच पायावर नि:स्वार्थ सेवाकार्य उभे राहू शकते,* असे बापू सांगतात. *‘कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर’ भक्ती व सेवा* या दोन पायांवर उभे राहिले आहे. या मार्गाचा वापर करून जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्यास शिकलेले बरेच गावकरी या शिबिरात सहभागी होतात, त्यावेळी बापूंच्या शिकवणीची ताकद कळून येते. सद्गुरू बापूंना अर्थात श्रीअनिरुद्धांना सामान्य जन व रंजल्या गांजल्यांसाठी वाटणारी कळकळही त्यांनी सुरू केलेल्या या उपक्रमातून दिसून येते

*🌺हरिओम 🌺श्रीराम🌺 अंबज्ञ 🌺*
*🙌🙌नाथसंविध्🙌🙌*
*🙌🙌नाथसंविध्🙌🙌*
*🙌नाथसंविध्🙌*

साभार – WhatsApp

error: Content is protected !!