श्रीगुरुचरणमासनिमित्त अनिरूद्धांचे गुणसंकीर्तन दिवस – २२
*🌟श्रीगुरुचरणमासनिमित्त अनिरूद्धांचे गुणसंकीर्तन दिवस -२२🌟*
*🔆भक्तिमय सेवा : भाग – ६🔆*
१.इको फ्रेंडली गणेशमूर्ती
२.वनदुर्गा योजना
३.रामनाम समिधा सेवा
*🔆इको फ्रेंडली गणेशमूर्ती🔆*
🔅विद्यांचा अधिपती व बुद्धिदाता म्हणून ओळखण्यात येणार्या ‘श्रीगणेशा’चा जन्मोत्सव अर्थात गणेशोत्सव हा संपूर्ण देशभरातच नाही तर जगभरात उत्साहात साजरा केला जाणारा उत्सव! भाद्रपद महिन्यातील श्रीगणेश चतुर्थीस आपण मनोभावे गणपतीची मूर्ती घरी घेऊन येतो. त्याची श्रद्धेने पूजा करतो. आरती, भजन, पूजन, प्रसाद, नैवेद्य अशा अनेक तर्हेने बाप्पाला साद घालतो आणि पूनर्मिलापाची वेळ येते तेव्हा मनात बाप्पाचं मनोहारी रूप साठवून जड अंत:करणाने निरोप देऊन पूनर्मिलाप करतो. पण पूनर्मिलाप केल्यानंतरची परिस्थिती काय असते? ती मूर्ती पाण्यात पूर्णपणे विरघळते का?
याचं उत्तर नाही, असंच येईल!
🔅मग, अशा स्थितीत शाश्वत व पर्यावरणास सहाय्य ठरेल, असा पर्याय काय? हा प्रश्नही तात्काळ समोर येतो. तर मग या प्रश्नाचं उत्तर आहे, ‘इको-फ्रेंडली गणेश’!
*🔅‘इको-फ्रेंडली गणेश’मूर्तीची आवश्यकता आताच्या काळातच का निर्माण झाली?*
🔅पूर्वीच्या काळी लाकडाच्या व मातीच्या मूर्ती बनविल्या जायच्या ज्या विघटनशील असत. पण आताच्या काळात बनविल्या जाणार्या ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती आणि त्याचे रंगही अतिशय दुष्परिणाम घडवून आणणारे, आरोग्याला घातक असणारे, पाण्यात न विरघळणारे असतात. म्हणूनच विसर्जनानंतर ह्या मूर्तींमुळे पर्यावरणाची हानी होते. घातक रसायनांमुळे पाण्याचा आम्ल गुणधर्म वाढतो आणि त्याच बरोबरीने त्यात वापरलेल्या धातुच्या कणांमुळे जलजीवनही धोक्यात येते. तसेच हे पाणी दैनंदिन वापरात आले तर मानव व इतर सजीवही अनेक रोगांचे बळी ठरतात.
🔅हे दुष्परिणाम टाळण्यासाठी ‘सद्गुरु श्री अनिरुध्द उपासना फाऊंडेशन’ने आपल्या संलग्न संस्थांच्या सहकार्याने पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविण्याचा उपक्रम हाती घेतला. अशा मूर्ती विसर्जन केल्यानंतर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळतात व पुढे होणारी हानी आटोक्यात येण्यास मदत होते.
🔅२००५ सालापासून *‘अनिरुद्धाज् युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम’* आणि ‘श्री अनिरुद्ध आदेश पथक’ यांच्यामार्फत सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्याचे काम चालू आहे. श्रद्धावानांनी लिहून जमा केलेल्या रामनाम वहीच्या जप लिहिलेल्या कागदाचा वापर करून मूर्ती तयार केल्या जातात.
🔅यासाठी कागद भिजवून ठेवून त्याच्या लगद्यामध्ये पांढरी शाई, झाडाचा डिंक मिसळला जातो. संपूर्ण मिश्रण चांगल्या प्रकारे मळून साच्यामध्ये भरले जाते व मूर्ती बनविली जाते. मूर्ती पूर्णपणे वाळल्यानंतर नैसर्गिक रंगांचा (फूड कलर) वापर करुन त्यांना सुंदररित्या रंगविण्यात येते. विसर्जनानंतर अर्थातच हे सर्व पाण्यात पूर्णपणे विरघळून जाते आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यास त्यामुळे मदत होते.
🔅अशा प्रकारे नाविन्य वापरून प्रथम पर्यावरणपूरक मूर्ती बनविल्याबद्दल संस्थेला पेटंट मिळत असूनही स्वतःच्या नावावर हक्क न ठेवता सर्वसामान्यांसाठी ही पद्धत सर्वांना खुली ठेवली व सर्वसामान्य जनतेला पर्यावरणाबाबत सजग करण्याचे कार्य केले. संस्थेच्या या उपक्रमाला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळत आहे.
🔅संस्थेतर्फे पहिल्या वर्षी २००५ साली ३३५ मूर्ती, नंतर काही वर्षे ३००० मूर्ती तर आता दरवर्षी ६००० ते ७००० मूर्ती तयार केल्या जातात. मागील वर्षी (२०१७ मध्ये) *६५००* भाविकांनी संस्थेची पर्यावरणपूरक मूर्ती पूजनास वापरली. भारतातील अनेक प्रांतात ह्या मूर्ती वापरतातच. परंतु *अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड तसेच साऊथ आफ्रिका, श्रीलंका व आखाती देशांमधील* भाविकांनीही या मूर्ती त्यांच्या-त्यांच्या परदेशातील घरी नेल्या व पूजन केले.
🔅आज अनेक स्तरांवरून इको-फ्रेंडली गणेश मूर्तीसाठी संस्थेला पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
१) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) ‘Go Green Campaign’ अंतर्गत तसेच ‘पर्यावरणपूरक गणपती’ बद्दल २०१० ते २०१२ अशी सलग तीन वर्षे संस्थेला प्रशस्तिपत्रकाने सन्मानित करण्यात आले.
२) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) तसेच ‘मुंबई मिरर असोसिएशन, टाईम्स रेड सेल’ यांच्यामार्फत *‘टाईम्स स्पेशल हरित गणपती अॅवॉर्ड २००९’* हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
३) २००८ साली पवई येथे ‘निती’ (NITIE) मार्फत भरविलेल्या प्रदर्शनात मुंबईच्या महापौर श्रीमती डॉ. शुभा राऊळ यांनी आपल्या संस्थेला गौरविले.
🔅अशा प्रकारे *निष्काम, नि:स्वार्थी* प्रेरणेतून चाललेल्या उपक्रमामध्ये सर्व वयोगटातील पुरुष व स्त्रिया उत्साहाने सहभागी होतात. गणेशोत्सव पर्यावरण पूरकच असला पाहिजे असे आपल्या कृतीतून प्रत्यक्षरित्या दाखवून देणार्या श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशनच्या कार्यात भाविकांनी पुढाकार घेतल्यास होणारा पर्यावरणाचा र्हास नक्कीच टाळता येईल.
*🌱🌳वनदुर्गा योजना🌳🌱*
🔅शहरात वाढत असलेले सिमेंटचे जंगल, कॉंक्रिटीकरण, वृक्षांसह वनराई व जंगलांची होणारी बेसुमार कत्तल, वणव्यांमुळे जंगलांचे घटते प्रमाण ह्यामुळे जागतिक तापमानवाढीचे अवाढव्य संकट आज आपल्यासमोर ‘आ’ वासून उभे आहे. पर्यावरणाचा दिवसेंदिवस होणारा र्हास, त्याचा चढत्या क्रमाने ढासळणारा दर्जा व वातावरणाचे वाढते असंतुलन ह्यामुळे पृथ्वीवरील सामान्य माणसाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाल्याची इशारा-घंटा सातत्याने वाजत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपलब्ध भूभागाच्या कमीत कमी ३३% भूभागावर घनदाट झाडे असणे आवश्यक आहे. आपल्या भारतात मात्र अशी परिस्थिती नाही आणि अनेक कारणांमुळे याकडे दुर्लक्ष होत आहे तर दुसरीकडे हे संकट कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना अद्याप समोर आलेली नाही. ह्याची जाणीव ठेवून व सामाजिक जबाबदारीचे भान बाळगून निसर्गाचे व पर्यावरणाचे संतुलन पूर्ववत करण्यासाठी श्री अनिरुध्द उपासना फाउंडेशन व संलग्न संस्था अनिरुध्दाज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ह्यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्याची पाऊले उचलण्यात आली आहेत. वृक्षारोपण / वनीकरण म्हणजे विविध प्रकारची झाडे लावून त्यांचे नीट संगोपन करणे!
🔅३० नोव्हेंबर २०१७ रोजी सद्गुरु श्रीअनिरुद्ध यांनी वांद्रे येथील ‘न्यू इंग्लिश हायस्कूल’च्या मैदानात आपल्या श्रद्धावान मित्रांना संबोधित करताना चार योजना भेट म्हणून दिल्या होत्या. यावेळी सद्गुरु श्री अनिरुद्धांनी ‘श्रीवनदुर्गा योजने’विषयी माहिती दिली होती.
🔅आपण घरात फळ खातो. चिकू, सीताफळ यांच्या बिया मोठ्या असतात आणि त्या लवकर खराबही होत नाहीत. अशा या बिया फेकून न देता त्या खतमिश्रित मातीमध्ये रोवायच्या आणि त्यांचा एक लहान आकाराचा बॉल तयार करायचा. अशा प्रकारे तयार होणारे ‘सिडबॉल्स’ आपण पिकनिक किंवा विकेन्डला शहराबाहेर जाताना रस्त्याच्या दुतर्फा जिथे रिकामी जागा आहे आणि थोडीशी माती आहे, तिथे पेरायचे व त्यावर थोडेसे पाणी ओतायचे. प्रत्येकाने असे किमान *दहा ‘सिडबॉल्स’* जरी पेरले आणि त्यातून किमान दोन बियांमधून झाडं मोठी झाली तर नक्कीच वृक्षारोपण यशस्वी होईल, अशी माहिती सद्गुरु श्री अनिरुद्धांनी दिली होती.
*🔅‘श्रीवनदुर्गा योजने’* च्या घोषणेनंतर संस्थेच्या वेगवेगळ्या उपक्रमातून सिडबॉल्सचे वाटप करून ‘श्रीवनदुर्गा योजना’ राबविली गेली आहे. पण सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी ‘श्रीवनदुर्गा योजने’च्या अंतर्गत पहिल्यांदाच अशी वृक्षारोपण किंवा वनीकरण सेवा हाती घेतलेली नाही, या वृक्षारोपण योजनेच्या बीजाची रोपणी श्रीअनिरुद्धांनी २००४ रोजीच केली होती.
*🌳डॉ. अनिरुध्द जोशी ह्यांची वृक्षारोपणाची संकल्पना*
🔅‘काही विशिष्ट वृक्षांची व झुडपांची मोठ्या प्रमाणावर लागवड केल्यास डिफॉरेस्टेशन (निर्वनीकरण), जमिनीची धूप, वाळवंटाचे अतिक्रमण ह्यांसारख्या समस्यांवर निश्चित व उत्तमरित्या मात करता येते’, असे सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी दिनांक ६ मे २०१० रोजी हरिगुरूग्राम येथे ‘रामराज्य’ ह्या विषयावरील प्रवचनात सांगितले होते. वृक्षारोपण कसे करावे?, कुठल्या प्रकारच्या जागेत कसे वनीकरण करावे? ह्याची सखोल माहिती श्री अनिरुद्धांनी दिली.
🔅त्यानंतर ‘श्री अनिरुध्द उपासना फाउंडेशन’ तर्फे संस्थेतील इच्छुक श्रद्धावान कार्यकर्त्यांना ह्याचे प्रशिक्षण ‘अनिरुध्दाज् इन्स्टिट्युट ऑफ ग्रामीण विकास’, गोविद्यापीठम्, कोठिंबे, कर्जत येथे दिले गेले आणि ते अजूनही सुरूच आहे.
🔅सद्गुरु श्री अनिरूध्द उपासना फाउंडेशनच्या वेगवेगळ्या उपासना केंद्रांद्वारे सामूहिकरित्या वृक्षारोपण आयोजित केले जाते. त्याकरिता स्थानिक प्रशासनाकडून कधी महामार्गाच्या दुतर्फा, कधी डोंगरावर वा अन्य मोकळ्या जागा उपलब्ध करून देणे, कधी वृक्षारोपणासाठी आवश्यक उत्तम प्रतीचे बी-बियाणे पुरविणे अशा प्रकारचे सहाय्य मिळते, तर कधी श्रद्धावान कार्यकर्ते स्वप्रयत्नाने वृक्षारोपणासाठी उपलब्ध जागांचा तपास करून, बी-बियाणे आणून स्वखर्चाने सुध्दा सामूहिकरित्या वृक्षारोपण करतात.
🔅सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी आपल्या श्रध्दावान मित्रांना वैयक्तिक पातळीवरसुध्दा वनीकरणाचे कार्य करण्याबाबत मार्गदर्शन केले आहे. श्रध्दावान वैयक्तिक पातळीवर स्वत:च्या घरी कमीत कमी तुळस व त्याचबरोबर *५ झाडे (कढीपत्ता, मोगरा, गुलाब, आलं व झिपरी) खिडकीत किंवा गॅलरीत* लावून वृक्षारोपणासाठी आपापल्या परीने हातभार लावीत आहेत. तसेच वाढदिवसाच्या दिवशी किंवा हळदीकुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने एकमेकांना तुळशीची वा अन्य फुलझाडांची लहानशी रोपे देऊन समाजात ह्याचे प्रबोधनही केले जात आहे.
🔅आपापल्या राहत्या निवासस्थानी, बिल्डिंगच्या वा बंगल्याच्या आवारात किमान कडुलिंबाचे झाड व शक्य असल्यास वड, पिंपळ, आंबा इत्यादी वृक्ष वा लहान झाडे लावण्यासाठीही सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रेरीत केले आहे. श्रद्धावानांना वृक्षारोपण व वनीकरणाबाबत सांगण्याआधीच सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी स्वत:च्या इमारतीच्या छतावर वेगवेगळ्या फळा-फुलांची बाग तयार केली आहे. स्वत:पासून या योजनेची सुरुवात केल्यानंतरच सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी आपल्या मित्रांना वृक्षारोपणासारख्या योजनेसाठी प्रेरित केले.
🔅सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या या प्रेरणेने आतापर्यंत *६० हजाराहून अधिक रोपांचे वृक्षारोपण* करण्यात आले आहे.
*🌟🪵रामनाम समिधा सेवा🪵🌟*
🔅बापूंनी दिलेले यावरील प्रवचन पाहुयात:
*। हम लोग यज्ञ करते हैं, रामनवमी के दिन करते हैं, धनत्रयोदशी के दिन करते हैं और कुछ विशेष उत्सव होते हैं तभी करते हैं। लेकिन आजकल क्या हो गया है, ये समिधा कहां से आती हैं? ये यज्ञों की समिधा जो है, कहां से आती है, पेडों से आती है, जंगलों से आती है। ये पेड तोडने पडते हैं। ये समिधायें आती हैं, हम लोग हवन तो जरुर करते हैं, लेकिन कागज जो है हमारे रामनाम वही के वो भी कहां से आते हैं, तो पेडों से ही आते हैं, पेडों को काटने से ही आते हैं। उसके ही कागज बनाये जाते हैं। और पेड इतने काटे जा रहे हैं इस भारत में, शायद पूरे जग में भी ग्लोबल वॉर्मिंग हो रहा है। हम मुंबई मे भी देख सकते हैं कि कैसे बरसात कभी होती है, तो ज्यादा होती है, धुवांधार होती है, नहीं तो होती ही नहीं। कभी आये तो ना आये, पूरे दिन तो गर्मी ही रहती है। यानी कि ग्लोबल वॉर्मिंग जो है, जो तापमान जो बढता जा रहा है, उसके लिये उपाय सिर्फ एक ही है, वृक्षों को बचाये रखना, वृक्षों को बढाना, वृक्षों की संख्या बढाना। इसलिये मैंने निर्णय किया कि अभी आगे से यज्ञ में हमारे लिये समिधायें रामनाम के कागजों से बनायी जायेंगी। और ये रामनाम के कागजों से, पेपर से समिधायें कैसी बनाने की, exactly जैसी मूल समिधायें होती हैं वैसे ही बनायी जाएगी। और ये समिधायें जो हैं, कैसी बनानी है, इसकी भी सीडी तैयार होगी। सेंटर पर केंद्र पर या अपने श्रीहरिगुरुग्राम में यहां आपको कागज मिल जायेंगे, कागज से उसका पल्प कैसे बनाया जाता है, वो सिखाया जाएगा। और उससे कैसे समिधा बनानी है, आप आपके घर बैठकर ये सेवा कर सकते हैं।*
*यानी ध्यान में रखिये, समझ लीजिये कि क्या होनेवाला है, आपके हाथ से जो समिधायें बनेंगी उनकी आहुति पवित्र यज्ञ मे होनेवाली है। दत्त भगवान के लिये, माँ चण्डिका के लिये, हनुमानजी के लिये, श्रीरामजी के लिये। और वो समिधा बनाने के बाद, सुखाने के बाद आपको वापस लाके देना है केंद्र पर या श्रीहरिगुरुग्राम में। और ये वितरण की सारी जो व्यवस्था है, पूरे ढंग से बाद में बतायी जाएगी। इससे क्या फायदा होगा? रामनाम जैसे पवित्र कागजों से समिधाये बनेंगी तो वो सबसे ज्यादा पवित्र होगी। और पेड कटने से बच जायेंगे। इसलिये हमें पुण्य की भी प्राप्ती होगी और हमारे हाथ से जो कष्ट होनेवाला है, श्रम होनेवाले है, जिसके कारण ये समिधा बनेगी, उन समिधाओं की जो आहुती होगी तो उसका पुण्य हमें भी मिलनेवाला है, जो समिधा बनाएगा। कागज आपको केंद्र पर भी मिलेंगे, सीडी भी केंद्र पर भी दिखाई जायेगी वैसे ही हरिगुरुग्राम में भी दिखाई जाएगी। बार बार दिखाई जाएगी, बार बार सीख सकते हैं। तो २१ जनवरी के बाद जो भी यज्ञ होंगे, इन्हीं समिधाओं का इस्तेमाल मैं करनेवाला हूं। और ढेर सारी समिधायें लगती हैं, आप लोग जानते हैं, आप लोगों ने देखा हुआ है कि रामनवमी के दिन कितनी सारी समिधायें लगती हैं। धनत्रयोदशी के दिन कितनी सारी समिधाये लगती हैं। यानी रामनाम से बनेगी, रामनाम के कागजों से बनेगी, हमें और भी पवित्रता प्रदान करनेवाली है, पुण्य प्रदान करनेवाली चीज है।”*
🔅 lockdown च्या काळात अनेक श्रद्धावानांनी भरपूर समिधा बनवल्या.
*🌺हरिओम 🌺श्रीराम🌺 अंबज्ञ 🌺*
*🙌🙌नाथसंविध्🙌🙌*
*🙌🙌नाथसंविध्🙌🙌*
*🙌नाथसंविध्🙌*
साभार – WhatsApp