श्रीगुरुचरणमासनिमित्त अनिरूद्धांचे गुणसंकीर्तन दिवस – २५
*🌟श्रीगुरुचरणमासनिमित्त अनिरूद्धांचे गुणसंकीर्तन दिवस -२५🌟*
*🔆वार्षिक उत्सव भाग -१🔆*
१. गुरुपौर्णिमा
२. हनुमान पौर्णिमा
३. दत्तजयंती
४. श्रीधनलक्ष्मी पूजन व श्रीयंत्र पूजन
५. श्री माघी गणेशोत्सव
६. अनिरुद्ध पौर्णिमा
७. श्रीललिता पंचमी उत्सव
*१.गुरुपौर्णिमा:*
🔅सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्ट, श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन आणि सलग्न संस्थेतर्फे दरवर्षी ‘गुरुपौर्णिमा’ उत्सवपर्व मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. यामध्ये लाखो श्रद्धावान सहभागी होतात. संस्थेतर्फे पहिला गुरुपौर्णिमा उत्सव १९९६ साली दादर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता व त्यानंतर दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो.
🔅उत्सवस्थळी मूळ सद्गुरुतत्वस्वरूप स्वयंभगवान श्री त्रिविक्रमाचे पूजन केले जाते.
🔅भक्तिस्तंभाभोवती प्रदक्षिणा,श्रीनृसिंहसरस्वतींच्या पादुकांचे उत्सवस्थळी षोडश पुजन ,श्रीअनिरुद्धचलिसाचे पठण, इ. मध्ये आपल्याला सहभागी व्हायला मिळते.
🔅‘अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो’ या ऋणज्ञापक स्तोत्रातील हाच भाव घेऊन या पावन दिवशी सद्गुरुंचे दर्शन घेतात.
🔅२०२४ च्या गुरुपौर्णिमेपासून श्रद्धावानांना सदगुरु श्री अनिरुद्धांचा साक्षात आत्मा असणाऱ्या *” श्री कृपाचैतन्य पादुकांचे दर्शन “* दर वर्षीच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी घेता येणार आहे.
*२.हनुमान पौर्णिमा:*
🔅प्रत्येक माणसाचा भक्तिमार्गावरील प्रवास, त्याचे भक्तिमार्गावरील प्रत्येक पाऊल हे हनुमंताच्या मार्गदर्शनानेच पुढे टाकले जाते. श्रीहनुमंतच बोट धरून श्रद्धावानाला भक्तिमार्गाने पुढे नेतो म्हणूनच हनुमंतांची भक्ती आवश्यक ठरते, असे बापूंनी श्रद्धावानांना सांगितले आहे. त्यामुळे हनुमान पौर्णिमा श्रद्धावान आनंदाने साजरी करतात.
*३.दत्तजयंती:*
🔅मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी अरुणोदयाच्या वेळेस श्रीगुरुदत्तात्रेयांचा जन्म झाला. हा दिवस देशभरात ‘दत्तजयंती उत्सव’ म्हणून साजरा केला जातो. सदगुरु श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार दरवर्षी न्यू इंग्लिश स्कूल, वांद्रे (श्रीहरिगुरुग्राम) येथे ‘दत्तजयंती उत्सव’ आयोजित केला जातो.
🔅दरवर्षी श्रीहरिगुरुग्राम येथे साजर्या होणार्या दत्तजयंती *उत्सवाचे स्वरूप –*
सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार साजर्या होणार्या या दत्तजयंती उत्सवात श्रद्वावान स्तोत्रपठण, मंत्र आणि गजर याचा आनंद लुटतात.
दत्तगुरुंना आवाहन करणार्या खालील प्रार्थनामंत्राचे ५४ वेळा पठण होते.
भोः दत्तगुरु । कृपया समागच्छ ।
सर्वरूपाणि दर्शय । मम ह्रदये प्रविश्य ।
मम सहस्त्रारे प्रतिष्ठ । ॐ नमो नमः ॥
दत्तजन्म ह्रुदयात व्हावा आणि सहस्त्रारचक्रात त्याची प्राणप्रतिष्ठा व्हावी हा शुद्ध हेतू मनात ठेवून श्रद्धावान हा प्रार्थनामंत्र प्रेमपूर्वक म्हणतात.
यानंतर श्रीवासुदेवानंदसरस्वतीकृत घोरकष्टोद्धरण स्तोत्राचे पठण होते.
घोरकष्टोद्धरण स्तोत्राचे पठण झाल्यावर रंगावधूत महाराजांनी रचलेल्या ‘दत्तबावनी’ या स्तोत्राचे पठण होते. नंतर श्रद्वावान ‘ॐ साई श्री साई जय जय साईराम’च्या गजरात तल्लीन होतात.
*दत्तजयंती विशेष –*
🔅– दत्तजयंतीच्या पवित्र दिवशी श्रीवर्धमान व्रताधिराजाची सुरुवात होते. मार्गशीर्ष पौर्णिमा ते पौष पौर्णिमा या महिनाभराच्या कालावधीत हे व्रत केले जाते. ‘‘श्रीवर्धमान व्रताधिराज म्हणजे मानवाच्या जन्मास येऊन मानवी जन्म व्यर्थ न जाण्याची ग्वाहीच आहे! श्रीवर्धमान व्रताधिराज म्हणजे परमात्म्याच्या नऊ अंकुरऐश्वर्याची प्राप्ती करून घेण्याचा महामार्ग, श्रीदत्तजयंतीच्या पवित्र दिनी सुरु होणारे हे व्रत आधुनिक नववर्षाच्या प्रथम दिवसास (म्हणजेच १ जानेवारी) स्वतःच्या उदरात सामावून घेते व आपोआपच नवीन वर्षासाठी शुभ स्पंदनांचा लाभ होतो आणि भगवंताचे आशीर्वाद प्राप्त होतात’’, असे सदगुरु श्री अनिरुद्धांनी ’श्रीमद्पुरुषार्थ’ ग्रंथराजाच्या ‘आनंदसाधना’ या तृतीय खंडात सांगितले आहे.
🔅– दत्तजयंतीचा मुहूर्त साधून २००५ साली सदगुरु श्री अनिरुद्धांनी (डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी) ‘प्रत्यक्ष’ हे बिगर राजकीय दैनिक सुरू केले. सदर दैनिकातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींबरोबरच तिसर्या महायुद्धाच्या संबंधीत बातम्यांचा वेध घेतला जातो.
🔅– १९९६ ते २००४ सालापर्यंत दत्तजयंतीच्या दिवशी सदगुरु श्री अनिरुद्ध विशेषांकाचे प्रकाशन होत असे.
*४.श्रीधनलक्ष्मी व श्रीयंत्रपूजन:*
🔅भारतीय संस्कृतीनुसार, अश्विन वद्य त्रयोदशी म्हणजे धनत्रयोदशी. ह्या दिवशी घरातील ऊर्जास्थानांचे अर्थात धन, अलंकार व दीपांचे यथासांग पूजन केले जाते. त्यामागे मूळ प्रार्थना अशी असते की, *‘हे लक्ष्मीमाते, तू दिलेल्या संपत्तीचा आम्ही मान राखू व त्याचा विनियोग तुला आवडणार्या सत्कार्यांसाठी करू. ही संपत्ती अशीच पवित्र मार्गाने वृद्धिंगत होत राहू दे.’*
🔆उत्सवातील भक्तिमय कार्यक्रम पुढीलप्रमाणे
१) श्रीयंत्र पूजन
२) श्रीधनलक्ष्मी पूजन
३) दत्तमालामंत्र पठण
४) श्रद्धावानांतर्फे श्रीयंत्राचे पूजन व अर्चन
🔆सर्व प्रकारचे प्रापंचिक व पारमार्थिक ऐश्वर्य प्राप्त होण्यासाठी सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार श्रद्धावान धनत्रयोदशीला श्रीहरिगुरुग्राम येथे धनलक्ष्मी आणि श्रीयंत्र पूजन उत्सव श्रद्धेने साजरा करतात.
*५.श्री माघी गणेशोत्सव:*
🔅२००९ सालापासून श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन, भारतीय भाषा संगम आणि श्री अनिरुद्धाज हाऊस ऑफस फ्रेंडस’ या संस्थेच्या वतीने माघ महिन्याच्या शुद्ध (शुक्ल) चतुर्थीस श्री माघी गणेशोत्सव साजरा करीत आहे. सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार माघी गणेश चतुर्थीच्या दिवशी पूर्ण वैदिक पद्धतीने एक-दिन-साध्य श्रीगणेश-प्रतिष्ठा यागाचे आयोजन केले जाते.
*६. अनिरूद्ध पौर्णिमा:*
🔅 अनिरुद्ध पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा. याच दिवशी श्री त्रिपुरारी अनिरूद्ध जन्माला आले होते.
🔅या उत्सवात बापूंना गाऱ्हाणे घातले जाते आणि गोड आप्प्यांचा प्रसाद अर्पण करण्यात येतो.
🔅या उत्सवाच्या ठिकाणी श्रद्धावानांना किरातरुद्र पूजन करण्यात येते.
🔅ह्यादिवशी AADM ची परेड ही असते. ह्या दिवशी सर्व DMVs आपल्या सद्गुरु अनिरुद्धांना मानवंदना देतात.
*७.श्रीललितापंचमीचा उत्सव:*
🔅१९९९ सालापासून श्रीललितापंचमीचा उत्सव सदगुरु श्रीअनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार गुरुकुल, जुईनगर येथे श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशनतर्फे साजरा केला जात आहे. गुरुकुल, जुईनगर येथे ललितापंचमीला सकाळी आठ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत हा उत्सव साजरा करण्यात येतो. आदिमाता महिषासुरमर्दिनीचे तिच्या मूळ स्थानावरील म्हणजेच मणिद्विपामधील मूळ रूप म्हणजे ललिताम्बिका स्वरूप. या उत्सवात श्रद्धावान दांपत्याकडून श्रीललिताम्बिका पूजन गुरुकुल, जुईनगर येथे केले जाते. अनेक श्रद्धावान या उत्सवात भक्तिभावाने सहभागी होतात.
विस्तृत माहिती पुढील वेबसाईटवर…👇
https://marathi.aniruddhafoundation.com/compassion-guru-poornima/
*🌺हरिओम 🌺श्रीराम🌺 अंबज्ञ 🌺*
*🙌🙌नाथसंविध्🙌🙌*
*🙌🙌नाथसंविध्🙌🙌*
*🙌नाथसंविध्🙌*
साभार – WhatsApp