श्रीगुरुचरणमासनिमित्त अनिरूद्धांचे गुणसंकीर्तन दिवस – २६

*🌟श्रीगुरुचरणमासनिमित्त अनिरूद्धांचे गुणसंकीर्तन दिवस -२६🌟*

*🔆 वार्षिक उत्सव भाग-२🔆*
१.श्री वर्धमान व्रताधिराज
२.सच्चिदानंदोत्सव
३. होळी पौर्णिमा उत्सव – साईनिवास
४. आद्यपिपा समाधी स्थान स्थापना सोहळा
५. श्रीगुरुचरण मास
६. घोरकष्टोद्धरण स्तोत्र पठण ( श्रावण महिना )
७. अश्वथ मारुती पूजन
८. दसरा उत्सव ( विजयोपासना )
९. वैभवलक्ष्मी उत्सव
१०. नंदीपक्ष पंढरवडा
११. शुभंकरा आणि अशुभनशिनी नवरात्री
१२. प्रपत्ती
१३. महाशिवरात्री आणि आषाढी एकादशी

*१)श्री वर्धमान व्रताधिराज :*

🔅वर्धमान शब्दाचा अर्थच मुळी काय आहे? वाढत जाणारा आणि वाढत नेणारा. वर्धमान शब्दामध्ये ह्या दोन्ही गोष्टी अंतर्भूत होतात. ह्या वर्धमान व्रताधिराजाच्या आसर्‍याने भौतिक, मानसिक आणि प्राणांतिक पातळीवर म्हणजे स्थूल, सूक्ष्म आणि तरल या तीनही पातळ्यांवरती जी अनेक केंद्रे, अनेक गोष्टी सुप्तावस्थेत असतात त्या सर्वांना जागृत केले जाते.’ या शब्दांत सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी श्रद्धावानांना या ‘वर्धमान व्रताधिराज’चे महत्त्व सांगितले आहे. २४ डिसेंबर २००९ रोजी सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी (बापूंनी) ‘वर्धमान व्रताधिराज’ ची कथा सांगून, या व्रताधिराजाचे महत्त्व अधोरेखित करून, हे व्रत श्रद्धावानांसाठी खुले केले.

🔅 *श्री वर्धमान व्रताधिराज म्हणजे मानवाच्या जन्मास येऊन मानवी जन्म व्यर्थ न जाण्याची ग्वाही.* श्री वर्धमान व्रताधिराज म्हणजे परमेश्‍वराच्या नऊ अंकुर ऐश्‍वर्य प्राप्त करुन घेण्याचा महामार्ग. श्री वर्धमान व्रताधिराज म्हणजे सर्व व्रतांचा मुकुटमणी. श्रीवर्धमान व्रताधिराज म्हणजे सर्वसामान्यांपासून ते संतांपर्यंत, अशिक्षितांपासून ते उच्चशिक्षितापर्यंत, महापाप्यापासून ते पुण्यवंतापर्यंत प्रत्येकाला समानपणे भगवत् कृपेचा आधार व दुःखमय प्रारब्धाचा नाश प्राप्त करुन देणारे सर्वोच्च व्रत.
🔅मार्गशिर्ष पौर्णिमा म्हणजेच दत्तजयंती अशा पवित्र दिनी सुरू होणारे हे व्रत आधुनिक नववर्षाच्या प्रथम दिवसास स्वतःच्या उदरात सामावून घेते व आपोआपच नवीन वर्षासाठी शुभ स्पंदनांचा लाभ होतो व भगवंताचे आशीर्वाद प्राप्त होतात असा श्रद्धावानांचा विश्वास आहे.

*२.सच्चिदानंदोत्सव:*
🔅मार्गशीर्ष महिना हा पवित्र आणि श्रेष्ठ महिना मानला जातो. या महिन्यात श्रध्दावान प्रेमाने दीड किंवा पाच दिवस ‘सच्चिदानंदोत्सव’ साजरा करतात. या उत्सवात रामनाम वह्यांच्या कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या सद्‌गुरुंच्या पादुकांचे पूजन श्रद्धावान आपल्या घरी भक्तिभावाने करतात.
🔅भक्तीमार्गावरील प्रवासात श्रद्धावानांचा प्रपंच व परमार्थ एकाच वेळेस सुखाचा होण्यासाठी मन, प्राण आणि प्रज्ञा ह्या तिन्ही स्तरांवर उचितत्व कायम राहणे महत्वाचे असते.

🔅सच्चिदानंदोत्सवात श्रद्धावान अनिरुद्ध-अथर्वस्तोत्र आणि अनिरुद्ध अष्टोत्तरशत-नामावलि यांसह सद्‌गुरुंच्या पादुकांचे पूजन करून हे उचितत्व साध्य व्हावे म्हणून सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांची प्रार्थना करतात.

🔅 *‘जो कोणी सदगुरुंच्या पादुका आपल्या घरी आणून पूजन करतो, त्याची प्रगती कलि थांबवू शकत नाही’*, असा श्रद्धावानांचा विश्वास आहे.

*३.साईनिवास होळी पौर्णिमा उत्सव:*
🔅दरवर्षी होळी पौर्णिमेला साईनिवासमध्ये प्रतिमा स्वरूपातील श्रीसाईनाथांच्या आगमनाप्रीत्यर्थ होळी उत्सव साजरा केला जातो.

🔅होळी पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्रद्धावान भक्तांसाठी श्री साईंच्या त्या मूळ तसबिरीला नमस्कार करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे सदगुरु श्री अनिरुद्धांनी सांगितले आहे.

🔅१९९७ पासून सदगुरु श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार ह्या उत्सवानिमित्ताने अनेक भक्तिमय उपक्रम साईनिवास येथे सुरू केले गेले.

*४. आद्यपिपा समाधीस्थान स्थापना सोहळा:*

🔅सन २००७ पासून आद्यपिपा समाधी स्थान स्थापना सोहळा साजरा केला जातो. श्री आद्यपिपांच्या स्मरणार्थ दरवर्षी १९ एप्रिल रोजी हा सोहळा साजरा केला जातो. त्यांच्या समाधी स्थानाचे अनावरण झाले तो दिवस.

🔅दरवर्षी १९ एप्रिल रोजी आद्यपिपांच्या समाधीला विधीवत स्नान दिले जाते त्यानंतर साई सहस्त्र पूजन आणि दुग्धस्नान किंवा अभिषेक केला जातो. परमपूज्य सुचित दादांच्या आवाजातील श्री साईसच्चरित्राचा अकरावा अध्याय सर्व विधी होताना लावला ​​जातो. यानंतर समाधीला अत्तराचा अभिषेक करून नैवेद्य अर्पण केला जातो. नंतर सुचित दादांच्या आवाजात ‘आरती साईबाबा’ ही आरती लावली जाते आणि त्यानंतर भक्तांना समाधी स्थानाचे दर्शन घेता येते. या दिवशी सत्संगामध्ये आद्यपिपांच्या रचना भक्तांकडून गायल्या जातात.

*५.श्रीगुरुचरण मास*

🔅दरवर्षी वटपौर्णिमा ते आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा हा कालावधी श्रद्धावान हनुमान चालिसा पठण कालावधी म्हणून साजरा करत असतात . परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी १६ जून २०११ रोजी श्रीहरीगुरुग्राम येथे झालेल्या मराठी प्रवचनात या विशिष्ट कालावधीसाठी *”श्री गुरुचरणमास”* असे नाव दिले. या काळात बापूंनी एकदा तरी १०८ वेळा हनुमान चलिसा म्हणण्यास सर्व श्रद्धावानांना सांगितले आहे.

🔅श्री हनुमान चलिसा पठण म्हणजे श्रध्दावानांसाठी साक्षात कवच. परमपूज्य बापू म्हणाले, श्री हनुमान चलिसाचे १०८ वेळा पठण केल्याने या पठणाच्या दिवसापासून बरोबर एक वर्षापर्यंत पठण कर्त्याचे कोणत्याही वाईट स्पंदनापासुन रक्षण होते तसेच या पठणाने निष्ठा, श्रद्धायुक्त सबुरी व आत्मविश्वास वाढीस लागतात.

*६.घोरकष्टोधरण स्तोत्र पठण ( श्रावण महिना )*

🔅2003 पासून, सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्ट संपूर्ण श्रावण महिन्यात घोरकष्टोधरण स्तोत्र पठण (जप) आयोजित करते. प्रत्येक सत्रात स्तोत्राचा जप १०८ वेळा केला जातो.

🔅पठणात सहभागी होणारे श्रद्धावान तांदूळ, डाळी इत्यादी देऊ शकतात , ज्याचा उपयोग सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या १३ कलमी कार्यक्रमांतर्गत “अन्नपूर्णा प्रसादम योजने” साठी केला जातो.

घोरकष्टोधरण स्तोत्र पठण महत्व 👇