श्रीगुरुचरणमासनिमित्त अनिरूद्धांचे गुणसंकीर्तन दिवस – २८
🌟श्रीगुरुचरणमासनिमित्त अनिरूद्धांचे गुणसंकीर्तन दिवस -२८🌟
४.श्रीसद्गुरुनिवास गुरुकुल, जुईनगर
५.श्रीक्षेत्र गोविद्यापीठम् – कर्जत, कोठिंबे
६.श्री सद्गुरू पुण्यक्षेत्रं, निम
७.त्रिविक्रम मठ
८.श्री हरिगुरुग्राम
९.प्रथम पुरुषार्थ धाम : अनिरुद्ध धाम
🛕🔆तीर्थक्षेत्रे भाग -२🔆🛕
४. श्रीक्षेत्र श्रीसद्गुरुनिवास गुरुकुल, जुईनगर :
🔅४ ऑक्टोबर १९९८ रोजी परमपूज्य सुचितदादा यांच्या हस्ते श्रीगुरुकुलाचे भूमिपूजन झाले.
🔅दि. २८ व २९ एप्रिल १९९९ रोजी, वैशाख पौर्णिमेच्या पवित्र दिनी परमपूज्य श्रीअनिरुद्ध, परमपूज्य नंदाई व परमपूज्य सुचितदादा ह्यांच्या उपस्थितीत, ह्या तीर्थक्षेत्रात पंचदेवतांची विधिवत् स्थापना झाली.
🔆स्थापना महात्म्🔆
🔅या तीर्थक्षेत्री भक्तांना पंचपुरुषार्थ साधून देणाऱ्या
१. श्रीमहाकाली,
२. श्रीमहालक्ष्मी,
३. श्रीमहासरस्वती
४. श्रीशांतादुर्गा व
५. श्रीमंगेश
या पंचदेवतांची स्थापना करण्यात आली आहे.
🔅’श्रीक्षेत्र गुरुकुल’ हे सद्गुरु श्रीअनिरुद्धांचे मानवी गुरु’श्री गोपीनाथशास्त्री पाध्ये यांचे निवासही आहे.
🔅या तीर्थक्षेत्री आपल्याला परमपूज्य श्रीअनिरुद्धांनी कोरलेली हनुमंताची शिळा, आदिमातेची घंटा, धर्मचक्राचेही दर्शन होते.
🔅 भारतातील 30 पवित्र नद्यांच्या जलाची तसेच भारतातील ३० तीर्थक्षेत्रांतील मृत्तिकेची येथेच स्थापना केलेली आहे.
🔅ह्याच गुरुकुलात परमपूज्य श्रीअनिरुद्ध परमपूज्य नंदाई व परमपूज्य सुचितदादा यांनी धुनी प्रज्वलित केली आहे. ती अखंड तेवत असून यातून निनिघालेली उदी भक्तांचे संकट व दुःख हरण करणारी आहे.
🔅गुरुकुलातील दुसऱ्या मजल्यावर विश्वलोचन चक्रराज आहे. या चक्राचे स्मरण करून त्या ठिकाणी बसून नियमितपणे वाचन केले असता आपल्या स्मरणशक्तीत वाढ होत असल्याचा अनेक श्रद्धावानांचा अनुभव आहे.
🔅 भक्तांच्या जीवनात सुख व आनंद येण्यासाठी तसेच दुष्प्रारब्ध भोगाच्या नाशासाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी
ह्या ठिकाणी हेरंबगणेश याग, दत्तयाग व श्री व्यंकटेश याग केले जातात.
🔅श्रद्धावानांचा संपूर्ण जीवनविकास करून देणाऱ्या पंचपुरुषार्थ उपासनेची सुरुवातही याच गुरुकुलात करून दिली जाते.
🔅ह्याच गुरुकुलात सद्गुरु श्रीअनिरुद्धां अधर्माच्या नाशासाठी धर्मचक्राची स्थापना केली गेलेली आहे. याआधी या नाशासाठी भगवान श्रीपरशुराम भगवान श्रीकृष्णांनी धर्मचक्राची स्थापना केली होती.
🔅 गुरुकुलात ‘श्रीकृष्णशास्त्री आयुर्वेद प्रशाला’, तसेच भारतीय प्राच्यविद्या संशोधन केंद्र आहे. ह्याच ठिकाणी सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी प्राचीन भारतीय बलविद्या शिकवून ‘प्रथम आचार्य तयार केले.
🔅चैत्र नवरात्र, आणि अश्विन नवरात्र इथे साजरी केली जाते, अश्विन शुद्ध पंचमी म्हणजे ललिता पंचमी ला, आपल्या नंदाई चा उत्सव साजरा केला जातो,
श्रावणी शनिवारी इथे अश्वथ्य मारुती पूजन केले जाते, आणि मार्गशीर्ष शुक्रवारी वैभव-लक्ष्मी पूजन होते, एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वर्धापन दिन असतो.
🔅असे हे सर्वांगसुंदर तीर्थक्षेत्र म्हणजे सुख व आनंदाची प्राप्ती करून देणारे, जीवनात पुरुषार्थ प्राप्त करून देणारे आणि आपल्या दुष्पाराची होळी करणारे श्रद्धावानांचे जणू माहेरघर..
पत्ता : जुईनगरजुईपाडा, सेक्टर-23, जुईनगर. नवी मुंबई. संपर्क : ०२२२-७७२६०२३
५. श्रीक्षेत्र गोविद्यापीठम् – कर्जत, कोठिंबे :
🔅सद्गुरु श्री अनिरुद्धांद्वारे एकूण १६ एकर जमिनीवर गोविद्यापीठम् ह्या महान तीर्थक्षेत्राची स्थापना केलेली आहे.
🔅 ८ एप्रिल २००२ रोजी परमपूज्य श्रीअनिरुद्ध-नंदाई सुचितदादांनी हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत श्रीकृष्णभगवंताच्या गोवर्धनधारी मूर्तीची स्थापना केली.
🔅त्यानंतर गोविद्यापीठम् मध्ये ३ एप्रिल २००२ ५ मे २००२ असा ३३ दिवसांचा चैत्रोत्सव झाला व ह्या उत्सवात हजारो श्रद्धावान सामिल झाले.
श्रीक्षेत्र गोविद्यापीठम् येथे चालणारी निवडक कार्ये :
भगवान श्रीकृष्णांची १) गोपालन विद्या, २) गोविंद विद्या तसेच ३) प्राचीन व अतिप्राचीन विद्या यांचे पुनरुजीवन करून ह्या तिन्ही विद्यांचा अभ्यास व संशोधन करणे.
१) गोपालन विद्या : श्रीबलरामाने संवर्धित केलेल्या गीर जातीच्या
गाईच्या गोसंस्कृतीचे वर्धन व संशोधन करणे त्यासाठी आधुनिक पद्धतीने प्रत्यक्षपणे गोपालन (गायींचे पालन करणे तसेच श्रीकृष्णाच्या गोपालन विद्येच्या विविध पैलूंचा अभ्यास करून अखिल मानवसमूहाच्या कल्याणासाठी गोपालनाचे महात्म्य संपूर्ण विश्वाला पटवून देतो हे श्रीक्षेत्र गोविद्यापीठचे महत्त्वाचे कार्य आहे.
२) गोविंदविद्या : श्रीकृष्ण भगवंताचे व्यक्तिमत्व, त्यांचे निष्काम जीवन, त्यांचे सामर्थ्य, त्यांचा पुरुषार्थ, त्यांचे निष्काम भक्ति-सेवा कार्य आणि त्यांचे तत्त्वज्ञान म्हणजेच गोविंदविद्या. भगवान श्रीकृष्णाच्या तत्त्वज्ञानाचा अखिल मानवसमूहाच्या कल्याणासाठी प्रचार व प्रसार करणे व त्याच तत्त्वज्ञानाच्या आधारतत्त्वावर आजच्या काळातील मानवाच्या समस्या सोडविण्यासाठी मार्ग काढणे हे प्रमुख उदिष्ट आहे.
३) प्राचीन व अतिप्राचीन भारतीय विद्यांचे पुनरुज्जीवन : कालौघात लोप पावलेल्या प्राचीन अतिप्राचीन भारतीय विद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचेही गोविद्यापीठमचे ध्येय आहे. त्यात प्राचीन युद्धकलांचे शिक्षण, व्यायाम इत्यादिचाही समावेश आहे.
४) श्रीअनिरुद्धाज इन्स्टीट्यूट ऑफ ग्रामविकास : ग्रामराज्यातून रामराज्य ह्या संकल्पनेची जागतिक प्रयोगशाळा ह्याच गोविद्यापिठमध्ये प्रस्थापित आहे. त्याचप्रमाणे शेती त्या बरोबरीच्या जोड उद्योगाच्या प्रशिक्षणाचे कार्यही इथेच चालते.
🔆गोविद्यापीठम् मधील पावनस्थाने
* गोविद्या अभ्यास कक्ष अर्थात श्रीकृष्ण सभागृह
•पुष्करिणी तीर्थ कुंड
* गरुडस्तंभ अर्थात पापविमोचक स्तंभ
• ध्यान कुटीर
•धुनीमाता
•तुलसी वृंदावन
* वडाचा पार
•द्वारकामाई
* दिग्विजय पादुका स्थान
असे हे श्रीगोविद्यापीठम् म्हणजे सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या वैश्विक कार्याची रसरशीत नियंत कार्यशाळा.
🔅दिनांक १९ एप्रिल २०१९ रोजी चैत्र पौर्णिमेच्या (हनुमानपौर्णिमेच्या) पवित्र दिनी परमपूज्य सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी महाधर्मवर्मन श्री. योगींद्रसिंह जोशी व महाधर्मवर्मन सौ. विशाखावीरा जोशी ह्यांच्या हस्ते श्रीगोविद्यापीठम येथे श्रीकृष्ण मंदिरात श्रीदत्तात्रेयांच्या मूर्तीची स्थापना करून घेतली.
पत्ता : कोठिंबे गाव, कशाळेजवळ, कर्जत, जिल्हा रायगड.
६.श्री सद्गुरू पुण्यक्षेत्रं, निम :
🔅 आज आपण सद्गुरु पुण्यक्षेत्रम विषयी थोडक्यात माहिती करुन घेऊ.
🔅17 मार्च 2005 रोजी आपल्या बापूंनी प्रथम प्रवचनापूवी सांगितले प्रवचनातील काही मुद्दे खालील प्रमाणे
१) ही जागा जळगाव (जिल्ह्यातील) अमळनेर पासून २७ कि.मी.अतंरवर ( नीम ) या गावी आहे. या ठिकाणी आपल्या संस्थेच्यावतीने(४४ एकर ) जागा घेतली आहे.
२) ह्या जागेचा महत्व म्हणजे तापी नदी व पांजरा नदी यांच्या संगमाच्या बरोबर मध्ये ही जागा बसलेली आहे.
३) ह्या जागेमध्ये सतत तीन वषे राहून (रामनवमी १९०६ ते रामनवमी १९०९ )ज्यांना मी माझे मानवी सदगुरू मानतो ते गोपीनाथ शास्त्री पाध्ये माझे पणजोबा यांनी तपश्चर्या केली आहे.
४) या ठिकाणी आपण पाहिल्यांदा उभारण्यात येणार ते मंदिर त्या मंदीरमध्ये दत्तगुरुची मूर्ती मध्ये उभी आहे त्याचा उजव्या बाजूस श्रीपाद श्रीवल्लभ,साई बाबा तर डाव्या बाजूला स्वामी नित्य सरस्वती स्वामी समर्थ या मूर्तीची स्थापना होणार आहे त्याच ठिकाणी माझे मानवी सद्गुरू गोपीनाथ शास्त्री पाध्येचा अस्थी कलश स्थापना करून समाधी बांधण्यात येणार आहे
५) पुण्यक्षेत्रम म्हणून ते सदगुरू क्षेत्र असेल की तिथे प्रवेश म्हणजे देव लोकात प्रवेश करण्यासारखी आहे ते देव लोक नव्हे अत्यंत पवित्र स्थान निर्माण आहे
६) ज्याप्रमाणे गाणगापूर हे भीमा नदीच्या व अंम्बर नदीच्या संगमावर बसलेले आहे त्याप्रमाणे निम गाव तापी व पांजरा नद्यांच्या संगमावर सदगुरू स्थान निर्माण होणार आहे
जसे हे पंचसद्गुरू व गोपीनाथ शास्त्री माझे आहे तेवढेच तुमची आहे हे आम्ही लक्षात घेतले पाहिजेल
७) असे हे पवित्र आगळ – वेगळं असे तीर्थक्षेत्र अजून घडले नाही आणि ह्याच्या पुढे कधीही घडणार नाही असे हे तिर्थक्षेत्र आहे आणि आम्ही अत्यंत वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार होणार आहे.
संकलन स्टार वृत्त
🔅1 एप्रिल 2005 ते 3 एप्रिल 2005 तीन दिवस प. पू. बापूंची श्रीसद्गुरू पुण्यक्षेत्रम् येथील भेट
१) प्रथम गोपीनाथ शास्त्री यांची तपोस्थळी असलेली तापीनदी कठावरील शिळा व पंझरानदी काठावरील टेकडी ह्या पवित्र गोष्टी शोधण्यात आला
२) तापीनदी व पांझरानदी काठावरील ही जागा अतिशय पवित्र व पुराण कालपासून इतिहास असलेले हे पुण्यक्षेत्रम आहे.
३) अनेक ऋषीमुनींनी तपस्या केली आहे ह्यात (संत नामदेव, गौतम बुद्धचाच एक अवतार अमिताभ बद्ध ,विश्वामित्रांचा मुलगा शक्तीमुनी अशा अनेक ऋषी मुनींच्या तपश्चर्याने ही जागा पवित्र झाली आहे, तसेच टेकडीच्या दक्षिण बाजूस पांझरा नदीच्या काठावर महाभारत कालीन ध्यौम्याऋषीचा आश्रम आजही चतुर्मितीमध्ये आस्तित्वात आहे .
४)वर्धमान व्रताधिराजाचा उगमही ह्याच जागेत झालाय म्हणून वर्धमान व्रताच्या काळात एकदा तरी ह्या जागेत येऊन व्रतपुष्प अर्पण कराव
५) तसेच गुरूक्षत्रेम् मधील दत्तगुरूच्या तसबिरीच्या इतिहासपण इथलाच आहे अशा अनेक प्रवित्र गोष्टीचा इतिहास या क्षेत्र आहे.
अग्रलेख क्र.९०७
१) जेव्हा हिमालय पवर्त वितळू लागले सगळे कडे हहा:कार माजू लागले अशा वेळेस कलियुगाच्या अंतिम चरणात हा शिव स्व:त वसुधरेवर येऊन हिमालयातील सप्त ज्ञानक्षेत्र व कैलासस्थान त्याचा दिव्य भाव ( श्रीपुण्यक्षेत्रम् )नामक स्थानी तपस्या नदीच्या तीरावर स्थापन करेल व मग महाप्रलयापर्यत तुम्ही आठजण ( हिमवान राजा व सप्त पत्नी ) श्रीगुरुची सेवा करीत व
श्रद्धावानांन मार्गदर्शन करत तेथेच निवास कराल.
२) आदिमाता अनसूया उवाच : – हे पवित्र कन्यांनो मी तुम्हाला वरदान देते की पार्वतीच्या दोन्ही पुत्रांच्या उपनयनांनंतर तेआपल्या आजोळी येतील व तुमची कन्या तुम्हा सर्वाना दरोराज सुर्योदयासमयी संपुर्ण परिवारासह ( श्रीसद्गुरूपुण्यक्षेत्रम् ) या स्थानवर भेटत जातील.
अग्रलेख क्र.११९२,१२२४
३) प्रथम दिव्य स्वतिक श्री सदगुरु पुण्यक्षेत्रम मध्ये आजही गोलाकार गती ने भूगर्भात फिरत आहे.
४) या वसुंधरेवर महादुर्गचा ऊर्जेचा रसस्तोत्रचा उगमस्थान या पुण्यक्षेत्रम मध्येचा आहे.
५) हेफँस्टने अँफोडाईटच्या सूचनेनुसार हक्युलीसला त्याच्या एकमेव शिष्य म्हणून स्वीकारले ते ही श्रीदत्तपर्ण पुण्यक्षेत्रम मध्येच (श्रीसदगुरु पुण्यक्षेत्रम)
६)@स्फटिकमहामस्तिष्क@
स्फटिक महामस्तिष्क म्हणजे त्या काळातील सर्वश्रेष्ठ विज्ञान व सर्वश्रेष्ठ अध्यात्म ह्याच्या सहाकार्याने बनलेले एक महायंत्र होते.
अ) या महायंत्राचे तीन अवतार(भाग) एकमेकांपासून वेगळे केले गेले.
ब) पाहिला अवतार :– हा तैवान बेटाजवळ ठेवण्यात आला.
क)दुसराअवतार :–वसुंधरेच्या दक्षिण ध्रवावरील हिमाच्छादित भागात ठेवण्यात आला.
ड) तिसरा अवतार :–हा अवतार ठेवण्यासाठी महाराजा इंद्रवधन ,महाराणी शरावती आणि राजा कौंडिण्य,यांच्या मदतीने दत्तपर्ण प्रदेशा मधील पुण्यक्षेत्रं (श्री सद्गुरू पुण्यक्षेत्रं) मध्ये ठेवण्यात आला आणि (१२स्थानाशी जोडण्यात आले 12 स्थान म्हणून12 ज्योतिलिगांची निवड करण्यात आली.
व ह्या तिसरा रचनेची वैज्ञानिक व आध्यात्मिक ताकद अफाट आहे त्यामुळे ह्याचा रक्षणासाठी राफेन,इदंवधन,मिकुला बाँग, ओरिआँन हे ( देवदूत ) बनून कार्यरत आहेत व राणी शरावती ही एका वृद्ध ऋषी स्त्रीच्या रुपात बसुन तपश्चर्या करीत आहे. रोज रात्री १२:०० ते सुर्योदयपर्यंत त्या सदगुरु पुण्यक्षेम् मध्ये फिरत त्याच रक्षण करत असते.
अग्रलेख क्र.१४४०
🔅 माझ्या लाडक्या श्रध्दावान मित्रांनो अगदी त्या वेळेपासून ते आजपर्यत प्रत्येक अधमीँ पंथाला म्हणून भारतावर आक्रमक करावसे वाटते कारण त्यांना आकर्षण असते ते…….
१)साक्षात आदिनाथांचे स्थान असाणाऱ्या ( काशीक्षेत्राचे) ज्या भूमीच्या आत सहजशिवाचा प्रकाश अजूनही जसाच्या तसाच आहे…..
२)पुण्यक्षेत्रम अर्थात(दत्तपर्ण प्रदेश, जेथे मुळ स्वस्तिक चिन्ह जमिनीत अगदी खोल भुगर्भात सातत्याने चक्राकार फिरत आहे…..
३) श्री जगदंबा क्षेत्र ह्याचे वर्णन व कथा पुढे लेखांमधून येईलच ……
४)त्रिनाथक्षेत्र अर्थात :– प्रथम पुरुषार्थधाम ( अलंकापुरी ) जेथे साक्षात संपूर्ण माणिब्दीप अठराच्या अठरा प्रभावक्रेंदाच्यासह वर अंतराळात व खाली भुमीत गेली चार युगे भुमीवर उतरण्यासाठी वाट बघत आहे……
आणि ही क्षेत्रे ताब्यात आल्याशिवाय कुमागियांचे वर्चस्व स्थापन होऊ शकत नाही…
🔅श्री श्वासम उत्सवात पुण्यक्षेत्रम विषयी माहिती दिली..
१)श्री श्वासम मध्ये बापूंनी पाच कलश समीर दादाच्या हातात देऊन पुण्यक्षत्रेम् स्थापना साठीची पूर्ण जबाबदारी समिरदादा यांच्या वर दिली.
२) राज्यांनो मी तुम्हाला आज पर्यंत दोन अत्युच्च भेट दिल्या एक म्हणजे स्वस्तिक्षेम संवाद आणि दुसरं म्हणजे हे श्रीस्वासम आणि आता मी तुम्हाला माझ्या अवतार कार्यातल तिसरं आणि अत्युच्च भेट देणार आहे ते म्हणजे श्री सदगुरु पुण्यक्षेत्रं.त्या ठिकाणी infrastructure वैगरे अस काहीच नसेल पण जेही काही असेल ते सगळं नैसर्गिक असेल तुम्ही पिकनिकला जायचं विसराल याल तर फक्त श्री सद्गुरू पुण्यक्षेत्रंलाच.
३)जो कोणी पुण्यक्षेत्रमला जाईल मग तो कितीही पापी असो तो पुण्यक्षेत्रम् मधून पुण्य आणि फक्त पुण्यचं घेऊन जाणार. कारण ते पुण्याचं अपरंपार साठा असलेलं महंत क्षेत्र आहे.
पत्ता : श्री सद्गुरू पुण्यक्षेत्रम,नीमगाव , अंमळनेर , जळगाव district, महाराष्ट्र.
७.श्री हरिगुरुग्राम :
🔅सद्गुरू अनिरुद्ध बापू ज्या ठिकाणी पितृवचन देतात ते ठिकाण “श्री हरिगुरुग्राम” म्हणून ओळखले जातात. श्री हरिगुरुग्राम असे स्थान आहे जिथे भक्तांना सद्गुरू अनिरुद्ध बापूंचा विपुल आशीर्वाद प्राप्त होतो
श्री हरिगुरुग्राम येथील कार्यक्रम –
🔅दर गुरुवारी हजारो श्रद्धावान श्री हरीगुरुग्राम येथे उपासना (सामुदायिक प्रार्थना) मध्ये भाग घेण्यासाठी आणि सद्गुरु अनिरूद्धांचे दर्शन घेण्यासाठी येतात. साईनिवासमधील विष्णुपादच्या आगमनाने आणि श्रीमद् पुरुषार्थ ग्रंथराज यांनाही दिंडी मिरवणुकीत पालखी (पालखी) येथे स्टेजवर नेले जाते. नंतर, सद्गुरू बापूंच्या निवासस्थानी असलेल्या श्री दत्तात्रेयांची मूर्ती येते. दत्तात्रेय आणि ग्रंथराज यांच्या मूर्तीवर श्रद्धावानांना फुलांची वर्षाव करण्याची संधी मिळते. श्री दत्तगुरूंच्या पूजेनंतर उपासना सुरू होते. आणि त्यानंतर सद्गुरु श्रीअनिरुद्धांचे पितृवचन होते.
पत्ता: श्रीहरिगुरुग्राम न्यू इंग्लिश स्कूल, गव्हर्नमेंट कॉलनी, खेरवाडी पोलिस स्टेशन समोर, वांद्रे (पू). मुंबई – ४००५१. उपासना दिवस आणि वेळ दर गुरुवारी संध्याकाळी ७ नंतर
८. श्री त्रिविक्रम मठ :
पावित्र्य अन मांगल्य चा स्त्रोत : त्रिविक्रम मठ
बिघाड दुरुस्तीची कार्यशाळा : त्रिविक्रम मठ!!
फाटक्या झोळीचे शिवणकाम : त्रिविक्रम मठ
अशांतीवर फुंकर : त्रिविक्रम मठ
सुख-शांती- समाधानाचे प्रवेशद्वार : त्रिविक्रम मठ
अध्यात्माची पाठशाळा : त्रिविक्रम मठ
ध्येय पूर्ती साठी प्रेरणा : मठ
इच्छा आकांक्षाचे पूर्तीस्थान : त्रिविक्रम मठ!!
जीवनात परिवर्तन : त्रिविक्रम मठ!!
🔅 परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्धांची व चण्डिकाकुलाची आम्हा श्रद्धावानांना अति उच्चतम लाभ मिळवुन देणारी कलियुगातील सर्वोच्च Bested भेट म्हणजेच ‘त्रिविक्रम मठ’.
🔅 अनन्य महत्तम महत्व असलेली ही आध्यात्मिक वास्तु आम्हा प्रत्येकाला वैयक्तिक व सांघिक पातळीवर श्रद्धावान बांधवांना स्थैर्य, शांती, तृप्ती, समाधान इत्यादीसारख्या अनेक उचित गोष्टी मिळवून देते.
🔅 जो श्रद्धाहीन आहे परंतु तो श्रद्धावान बनू इच्छितो अशा व्यक्तीस वरील सर्व गोष्टी प्राप्त होतातच असे हा त्रिविक्रम मठ !!!
🔅 या त्रिविक्रम मठात तेरा तसबिरी असणार आहे. त्यात प्रामुख्याने श्री दत्तगुरु व बापू यांची एकत्रित तसबीर, आदिमाता जगदंबा व बापू, श्री पंचमुखहनुमान व बापु तसेच स्वयम् भगवान त्रिविक्रमाची तसबीर असणार आहे. हा मठ सकाळी 8 ते रात्री 9 पर्यंत उघडा असेल. येथे येणारी व्यक्ती ह्या मठात बसून कुठलेही अध्यात्मिक पठण, उपासना एकट्याने मनातल्या मनात करू शकतो. तो कितीही वेळ मठात पठण करू शकतो. येथे फक्त सदगुरू श्री अनिरुद्धांनी दिलेले ग्रंथ वा पुस्तक वाचली पाहिजे असा काही नियम नाही.
🔅 येथे मठात येणार श्रद्धावान स्वतः सोबत आणलेली तुळशीपत्र, बेलपत्रे व फुले श्री भगवान त्रिविक्रमाच्या तसबिरी वर अर्पण करू शकतो. त्रिविक्रम मठात येणार श्रद्धावानाच्या प्रसाद म्हणून तीर्थ मिळेल व रात्री आरती नंतर तीर्थ सोबत साखर फुटाण्याचा प्रसाद मिळेल.
🔅 असा हा त्रिविक्रम मठ आम्हा प्रत्येकाला खूप काही देऊन जाणार आहे. आम्हाला प्रत्येकाला एक सच्चा श्रद्धावान होण्यासाठी उचित नियम स्वतःला लावून घेण्याची सवय शिकायला मिळणार आहे. येथे प्रत्येकाला स्वतःची भक्ती वाढवत नेण्याचे शिकायचे आहे. येथे येणाऱ्या प्रत्येकास आधार पूरेपुर मिळणारच आहे. पण त्याच बरोबर प्रत्येकाच्या जीवनातील विविध गरजाही पूर्ण होणार आहे.
🔅 मनुष्याला या कलियुगात या जीवनात सहजपणे,शांती,
समाधानाने जगण्यासाठी जे जे काही आवश्यक आहे त्याचा खजिना येथे त्रिविक्रम मठात खच्चून भरलेला आहे..
🔅गुरुक्षेत्रममध्ये गेल्याने तिथे पठण केल्याने त्याचे १०८ पट फळ प्राप्त होते तर त्रिविक्रम मठात ५४ पट फळ प्राप्त होते.
पत्ता :-
1. Trivikram math Borivali – Bungalow Plot No.253, RSC – 1 A, Gorai Rd, Borivali West, Mumbai, Maharashtra 400092
2. Trivikram math Pune- Survey No. 11/2, Plot No. 5, Vardhaman Sarita Nagari Rd, Happy Colony, Behind MKSSS’s, Cummins College Rd, Karve Nagar, Pune, Maharashtra 411052.
3. Trivikram math Miraj -Plot No.11 C Shivganga Park, Bolwad Rd, near Fodyachi Laxmi Mandir, Miraj
4. Trivikram math,Vadodara – 54, Sun City Cir, Nirman Park Society, Railway Colony, Manjalpur, Vadodara, Gujarat 390011
९. प्रथम पुरुषार्थ धाम, डूडुळगाव, आळंदी
सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या प्रथम पुरुषार्थ धाम यावरील प्रवचनातील काही मुद्दे :
🔅”त्रेतायुगामध्ये वसिष्ठ आणि अगस्ती ऋषींनी ज्या स्थापत्यशास्त्रानुसार ज्याप्रकारे मंदिरं बांधली; त्याप्रकारे पवित्र रचनांनुसार, वैदिक सुक्तानुसार प्रथम पुरुषार्थ धाम असणार आहे.”
🔅”इथे विज्ञान आणि अध्यात्म एकरूप होतंय. हा अध्यात्माचा बालेकिल्ला आहे.”
🔅”ती जागा-वास्तू अशी बनतेय की तिथे श्रद्धावानाने नुसता प्रवेश जरी केला तरी देखील बऱ्याच गोष्टी आपोआप होणार आहेत.
अशारितीने पूर्णपणे वास्तू बनविली जाते की त्याच्या प्रत्येक न् प्रत्येक जागेमध्ये, प्रत्येक न् प्रत्येक कोपऱ्यामध्ये, प्रत्येक तुकड्यामध्ये, पायाखालच्या जमिनीमध्ये-लादीमध्ये, प्रत्येक स्तंभामध्ये संपूर्ण पवित्र स्पदनं ठासून भरून राहतील आणि आपोआप निर्माण होत राहतील.”
🔅”आदिमातेचे-त्रिविक्रमाचे सर्व अल्गोरिदम्, पवित्र चिह्न ह्यांचा उचित वापर प्रथम पुरुषार्थ धाममध्ये होणार आहे.”
🔅”पुढील हजारो वर्षे पवित्र स्पंदन निर्माण करीत पावित्र्याचे रक्षण करणारा आणि श्रद्धावानांना जन्मोजन्मीचा आधार देणारा प्रथम पुरुषार्थ धाम दिमाखात सज्ज होतोय !”
🌺हरिओम 🌺श्रीराम🌺 अंबज्ञ 🌺
🙌🙌नाथसंविध्🙌🙌
🙌🙌नाथसंविध्🙌🙌
🙌नाथसंविध्🙌
साभार – WhatsApp