श्रीगुरुचरणमासनिमित्त अनिरूद्धांचे गुणसंकीर्तन दिवस – २९

🌟श्रीगुरुचरणमासनिमित्त अनिरूद्धांचे गुणसंकीर्तन दिवस -२९🌟

🔆 🎼विशेष सत्संग कार्यक्रम🎼🔆

१.नाहू तुझिया प्रेमे
२.अनिरुद्ध प्रेमनो सागर
३.अनिरुद्ध प्रेमसागरा
४.अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य महासत्संग सोहळा
५.मन:सामर्थ्यदाता

१. नाहू तुझिया प्रेमे🎻🪘:
( २६ मे २०१३)

🔅न्हाऊ तुझिया प्रेमे’ ही “अलौकिक” प्रेमयात्रा सर्व श्रद्धावानांनी अनुभवली आणि मनाने अजूनही सर्वजण त्या दिवसाच्या आठवणींमध्ये जगत आहेत. या प्रेमयात्रेच्या महासत्संगाची सुरुवात झाली, रविवार दिनांक २६ मे २०१३ रोजी, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्टस् अकॅडमीच्या स्टेडियमवर. सकाळपासूनच श्रद्धावानांनी मैदान भरू लागलं होत. तळपत्या उन्हाची पर्वा न करता आबालवृद्ध श्रध्दावान या प्रेमयात्रेत सहभागी होण्यासाठी उत्सुक होते.

🔅स्टेडियममध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत होते, सर्वत्र झळकत असलेले ’न्हाऊ तुझिया प्रेमे अनिरुद्ध प्रेमसागरा’ चे फलक, सद्गुरु श्रीअनिरुद्धांचे मोठे कट आऊट्सआणि आद्यपिपादादा, मीनावैनी, चौबळ आजोबा, साधनाताई यांच्या तसबिरी.

🔅सकाळी ११:३० वाजल्यापासून दुपारी ३:३० वाजेपर्यंत आजवर झालेल्या सर्व रसयात्रा, भावयात्रा व मोजके महत्त्वाचे उत्सव ह्यांमधील अविस्मरणीय व भक्तिमय क्षणांचा आनन्द श्रध्दावानांनी घेतला. जे श्रध्दावान या रसयात्रांचा आनंद अनुभवू शकले नाहीत, त्यांच्यासाठी ही ’विशेष पर्वणी’ होती, तर जे श्रध्दावान ह्या रसयात्रा व भावयात्रांमध्ये सहभागी झाले होते, त्यांना पुन:प्रत्ययाचा आनन्द मिळत होता.

🔅’आम्ही त्यावेळेस नव्हतो’ ही खंत आता कुणाही श्रध्दावानास नक्कीच असणार नाही कारण हे सर्व पाहताना मनाने हा सारा प्रवास श्रद्धावान करत होते. बापुंनी या विभिन्न यात्रा आणि उत्सवप्रसंगी केलेले मार्गदर्शन ऐकून श्रद्धावान समाधानी झाले होते.

🔅दुपारी सव्वा दोन वाजता परमपूज्य बापू, नन्दाई आणि सुचितदादांचे आगमन झाले आणि त्यावेळी मैदान खचाखच भरून गेले होते. अनन्यप्रेमस्वरूप सद्गुरु श्रीअनिरुद्धांचे आगमन होताच श्रद्धावानांमध्ये प्रेमाचे चैतन्य पसरले.

🔅साधारण चारच्या सुमारास बापू, नन्दाई आणि सुचितदादा प्रेममंचाच्या (व्यासपीठाच्या) दिशेने जाऊ लागले, तेव्हा सर्व श्रद्धावानांनी ’हरि ॐ’ म्हणून त्यांना अभिवन्दन केले. बापुंनी प्रेममंचावरून सर्वांना हात हलवून ’हरि ॐ’ म्हटले आणि प्रेमयात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. ’रामो राजमणि: सदा विजयते…’ या विजयमंत्राने ’न्हाऊ तुझिया प्रेमे’ या ’प्रेमयात्रेच्या’ सत्संगाची सुरुवात झाली.

🔅आद्यपिपादादा, मीनावैनी, सुशीलाताई इनामदार, श्रीकृष्णशास्‍त्री इनामदार, लीलाताई, साधनाताई या श्रेष्ठ श्रद्धावानांच्या सद्गुरु श्रीअनिरुद्धांवरील भक्तिरचना सादर केल्या गेल्या. प्रेमयात्रेच्या महासत्संगाच्या पहिल्या सत्राची सुरुवात श्लोकीने झाली आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक अशा भक्तिरचना सादर केल्या गेल्या. साधारण ६:४५ पर्यंत पहिल्या सत्रातील भक्तिरचना प्रस्तुत केल्या गेल्या. ’सांजवेळच्या रं वार्‍या…’ या पहिल्या सत्रातील अन्तिम भक्तिरचनेने विशेषत: श्रद्धावान भगिनींना माहेरच्या प्रेमाचा अनुभव करून दिला. त्यानंतर साधारण ४५ मिनिटांचे मध्यंतर झाले.

🔅प्रत्येक श्रध्दावानला या अभंगाच्या ताकदीची कल्पना आहे. हे अभंग श्रध्दावानांना त्यांच्या बापू भक्तित स्थिर करतात. पण हे अभंग सहज सोपे केले ते प्रत्येक अभंगाच्या आधी असलेल्या निवेदनाने. आणि गौरांगसिंहने समर्थपणे केलेले त्याचेसादरीकरण यांचा सुंदर मिलाप आपल्या सर्वांना पहायला मिळाला. लिहिण्याची व सादरीकरणाची साधी सोपी व सहजशैली अभंगाचा भाव सहजपणे श्रध्दावानांपर्यंत पोहचत होती. अभंग लिहणार्‍याचा भाव, त्याचबरोबर निवेदन लिहणार्‍याचे बापूंवरील प्रेम, सदरकरणार्‍या गौरांगसिंहची भावोत्कटता व श्रध्दावानांचे बापूंवरील प्रेम व प्रत्यक्ष आपल्याबरोबर असलेले परमपूज्य बापू, नंदाई व सूचितदादा यामुळे सर्व आसमंत अक्षरश: मंत्रमय झाला होता.

🔅प्रेमयात्रेचे दुसरे सत्र रात्री १० च्या आसपास संपले आणि ’सब सौंप दिया है जीवन का…’ या अन्तिम भक्तिरचनेच्या वेळी सर्व श्रद्धावान सद्गुरु श्रीअनिरुद्धांप्रति असणार्‍या प्रेम आणि कृतज्ञतेच्या भावनेने स्वत:हून उठून उभे राहिले, त्यांचे हात आपोआप जोडले गेले आणि सर्वांनीच मन:पूर्वक ही प्रार्थना म्हटली.

🔅सर्वांचेच अन्त:करण प्रेमभावाने भरून आले होते. महासत्संगातील विशिष्ट क्रमाने घेतल्या गेलेली भक्तिरचना, नेमक्या शब्दांतील निवेदन यांनी प्रत्येकाला आपापल्या जीवननदीचा प्रवास प्रेमप्रवास कसा बनवायचा आणि त्या प्रेमसागर अनिरुद्धापर्यंत कसा न्यायचा हे सहजपणे कळले होते. आद्यपिपांच्या ’मीच ह्याचा हाचि माझा अनिरुद्ध अवघा’ या शब्दांनी ’मला आधी याचे व्हायला हवे, मग तो माझा होतोच’, हे मर्म आज कळले होते. महासत्संगाचा हा टप्पा पूर्ण झाला, तरी प्रत्येकाची प्रेमयात्रा सुरूच होती. प्रेमयात्रा सदैव सुरूच असते. आज प्रत्येकाला ही यात्रा करण्यासाठी प्रेमाची शिदोरी मिळाली होती, दिशा मिळाली होती, सामर्थ्य मिळाले होते, प्रकाश मिळाला होता.

🔅प्रत्येक जण आज अनिरुद्धप्रेमात चिंब भिजला होता. महासत्संगाची सांगता झाल्यावर बापू, नन्दाई आणि सुचितदादा जेव्हा प्रेममंचावर आले, तेव्हा बापुंच्या प्रेममय दृष्टिने जणू सर्वांना प्रेमाने न्हाऊ घातले. बापू मंचावरून खाली उतरले आणि त्याच वेळी जेव्हा आकाशातून पावसाचे थेंब अचानक बरसू लागले, तेव्हा श्रद्धावानांनी एकच जल्लोश केला. बापू, आम्ही आज तृप्त झालो, आज जन्माचे सोने झाले, आम्ही खरोखरच आज या भक्तिरचनांच्या गंगेत पूर्णपणे न्हाऊन स्वच्छ, शुद्ध, पवित्र झालो अशा प्रकरचा भाव श्रद्धावानांच्या मनात दाटत होता.

🔅ज्यांना कार्यक्रमस्थळी येऊन सहभागी होणे शक्य नव्हते अशांनी आपल्याला घरी कुटुंबाबरोबर, मित्रमंडळीसह ह्या महासत्संगाचा आनंद घेतला. थेट प्रक्षेपणाचा (LIVE Webcast) फायदा देशविदेशातील अनेक श्रद्धावानांनी घेतला. भारतातील जवळजवळ सर्वच राज्यांत आणि जगभरातील ३८ देशांमध्ये या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहिले गेले.

🔅भक्तीचा सुर, उत्कट भाव आणि मन:पूर्वक कृतज्ञता यांचा त्रिवेणी संगम असणारी ही प्रेमयात्रेची सुरुवात अनुभवून सर्व श्रद्धावानांच्या मनात एकच शब्द निनादत होता- “थेंब एक ह पूरा ‘अवघे’ नहाण्या ‘अवघे’ नहाण्या… न्हाऊ तुझिया प्रेमे अनिरुध्द प्रेमसागरा माझ्या भक्तनायका, माझ्या भक्तनायका!!!”

२)अनिरुद्ध प्रेमनो सागर – गुजरात 🪘🎻 (१ नोव्हेंबर २०१५)

(भक्तिरसपूर्ण, प्रेमरसपूर्ण!)

🔅खरच भक्तिप्रेमाला भाषेची बंधने नसतात हे दिसले होते. आद्यपिपादादांच्या प्रेमपूर्ण भक्तितून प्रवाहित झालेल्या अनेक अभंगांना गुजरातीत ऐकतानासुद्धा श्रद्धावानांच्या मनात तेच भक्तितरंग उमटत होते जे नेहमी मराठीत ऐकताना उमटतात.
🔅 सर्वच श्रद्धावान अगदी नवीनसुद्धा ह्या भक्तिरंगात रंगून गेले होते आणि हा गुणसंकीर्तन व सत्संगाचा कार्यक्रम संपूच नये असेच वाटत होते.

🔅सर्व टीमने घेतलेली मेहनत आणि सदगुरु श्रीअनिरुद्धांच्या कृपेने हा कार्यक्रम इतका जबरदस्त झाला जो नेहमीच स्मरणात राहील.

३.)अनिरुद्ध प्रेमसागरा ( २५ फेब्रुवारी २०१८ – नाशिक)

🔅२६ मे २०१३ रोजी ’न्हाऊ तुझीया प्रेमे’ हा भव्य सत्संगाचा कार्यक्रम मुंबईत डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये झाला होता. आजही श्रद्धावानांच्या मनात या कार्यक्रमाच्या गोड आणि सुमधुर आठवणी रुंजी घालत आहेत. या कार्यक्रमाच्या वेळेस सद्‌गुरु श्री अनिरुद्ध म्हणाले होते, “मित्रांनो, चार रसयात्रा झाल्या. शिर्डी, अक्कलकोट, आळंदी आणि मंगेश शांतादुर्गा. त्यानंतर भावयात्रा झाल्या. परंतू सगळ्याच्या बरोबर कायम चालू असते, आणि कायम चालू रहावी तुमच्या प्रत्येकाच्या जीवनात, ती ’आनंदयात्रा’.

अवघाची संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोकं ॥

🔅ही माझी शपथ आहे माझ्या आईच्या पायावर हात ठेवून मी घेतलेली. माझं प्रत्येक बाळ, त्याचं जीवन सफळ झालं पाहिजे, त्याला कृतार्थच वाटलं पाहिजे आणि सर्व बाजूने तो संपन्नच असला पाहिजे. मग ती कन्या असो वा पुत्र. याच इच्छेने, याच प्रेरणेने मी उभा आहे, आणि हीच प्रेरणा तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आद्यपिपा, मीनावैनी, साधनाताई, चौबळ आजोबा. या सगळ्यांच्या आठवणी खुप मधुर आहेत, अत्यंत सुंदर आहेत. आणि या सगळ्यांच्या बरोबरीने आपल्याला हा कार्यक्रम, हा सोहळा, ही प्रेमयात्रा अनुभवायची आहे. तुमच्या बरोबर मीही सामील आहे. तुमच्या प्रत्येकाच्या मागे आणि पुढे मी बसलेला आहे.”

🔅ह्या आनंदयात्रेचा भाग म्हणजेच वडोदरा, गुजरात येथे १ नोव्हेंबर २०१५ रोजी झालेला अनुभव आणि सत्संगरूपी गुजराती कार्यक्रम ’अनिरुद्ध प्रेमनो सागर’. याही कार्यक्रमाला श्रद्धावानांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला होता.

🔅या अनिरुद्ध प्रेमसागराला भेटण्यासाठी निघालेली ही आमची आनंदयात्रा त्याच्यासारखीच अथांग आणि कधीही न संपणारी असावी. श्रद्धावानांना या अनिरुद्ध प्रेमसागराला भेटण्याची जेवढी ओढ आहे त्याहूनही अधिक या अनिरुद्धांना त्यांच्या श्रद्धावान मित्रांना भेटण्याची आर्तता आहे. आणि ह्या आनंदयात्रेचा पुढील टप्पा होता, २५ फेब्रुवारी २०१८ रोजी नाशिक येथे होणारा अनुभव आणि भक्तीरचनांनी नटलेला सत्संगाचा कार्यक्रम ’अनिरुद्ध प्रेमसागरा’.

🔅२५ फेब्रुवारी रोजी नाशिक येथे ’अनिरुद्ध प्रेमसागरा’ हा सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांवरील अनुभवसंकिर्तन व सत्संगाचा कार्यक्रम भक्तीमय व आनंदमय वातावरणात पार पडला.

🔅या कार्यक्रमाच्या सफलतेला साथ लाभली ती नाशिक येथील कार्यकर्त्यांच्या उत्कृष्ट नियोजनाची व सर्व वादक आणि गायक यांच्या सुरेल साथीची. या कार्यक्रमाला श्रद्धावान श्रोत्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता.

४.अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य महासत्संग सोहळा :🎻🪘
( ३१ डिसेंबर २०१९)

🔅३१ डिसेंबरची रात्र ही सर्वच लोकांसाठी फार महत्वाची आणि आनंदाची असते. नववर्षाचे स्वागतासाठी सर्वच जण आपापल्या पद्धतीने #आनंद साजरा करतच असतात. आपण श्रद्धावानही जुन्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत हे नेहमीच आपल्या लाडक्या डॅडच्या सुचनेप्रमाणेच करीत आलेलो आहोत. पण या वर्षीची पर्वणी काही औरच होती. कारणही तसेच आहे – ३१ डिसेंबर रोजी डी. वाय पाटील स्टेडियम येथे ‘अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्याच्या अभंगाच्या कार्यक्रमात अत्यंत कनवाळू आणि अकारण कारुण्याचे स्तोत्र असलेले आपले लाडके डॅडच आपल्यासोबत नववर्षाच्या जल्लोषात सहभागी झाले होते.

🔅त्या कार्यक्रमाचे शब्दात वर्णन करणे शक्यच नाही तो अवर्णनीय असाच होत. तरीही सांगावेसे वाटते की –

🔅सर्वात महत्वाचे लाडक्या डॅड चे दमदार आगमन, त्याचे ते अभंगावर नाचणं, त्याने दिलेले आशिर्वाद, त्याचे ते हावभाव या सर्वामुळे अगदी सर्व अडचणी, दु:खावर मात करून प्रत्येकाच्या नसनसात एकदम चैतन्य संचारले.

🔅बापूंवर असणारे अभंग मग ते सर्व सुंदर असणारच.
त्यात अभंग रचनाही आफलातून. गायकांनी गायलेही छान.

🔅प्रत्येक अभंगासाठी ऍनिमेशन आणि त्याची कल्पना केली होती तीही खूप छान होती ज्यायोगे त्या अभंगाची किमया आणखीनच वाढत होते.

🔅कार्यक्रमासाठीची घेतलेली प्रचंड मेहनतही कार्यक्रम अनुभवताना दिसून येत होती.

प्रत्येक अभंगाच्या आधी असलेले निवेदन ही सुंदर. शिवाय प्रत्येक श्रद्धावानही अत्यंत शिस्तबद्धतेने वागत होत.

🔅पण आम्हा श्रद्धावानांचे मन नेहमीच अजून काही पाहिजे असेच असते जसे दिल मांगता है मोअर. सो आता स्वस्तिक्षेम मधे मोठ्या आईकडे मागावेसे वाटते की असे कार्यक्रम होतच रहावे आणि आम्हाला असेच परत परत अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य’च्या जल्लोषात न्हाऊन जाण्याची संधी मिळावी. आधी ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ आणि आता ‘अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य’ हा कार्यक्रम झाला. इजा आणि बिजा झाले आता तिजा आणि त्यापुढे असे अनेक येतच रहावे ही बापूंचरणी प्रार्थना.

🔅आहाहा काय पर्वणी होती ती. तो कार्यक्रम ३१च्या रात्री झाला असला तरी अजूनही त्याच धुंदीत आहोत असे वाटते. जय जगदंब जय दुर्गे।

🔅आनंदाचे डोही आनंद तरंग… त्या प्रत्येक अभगाची गोडी अशीच अविरत तरंगत राहो.

🔅आणि मुख्य म्हणजे ज्या ज्या श्रद्धावानांना हा अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्यच्या महासत्संगाच्या कार्यक्रमाला येण्याची इच्छा होती त्या त्या प्रत्येक श्रद्धावानाला त्याने कार्यक्रमासाठी आणले. अगदी अनेक संकटावर मात करून चिडीच्या पायाला दोर लावल्याप्रमाणे त्याने खेचून आणले.

🔅एकंदरीत पुर्ण कार्यक्रमच एकदम शिस्तबद्धतेने, उत्साहात, जल्लोषात, आणि मुख्य म्हणजे भक्तीभाव चैतन्यात ओत प्रोत न्हाऊन निघणारा असा झाला. या कार्यक्रमाची तुलना कशासीही करता येणारच नाही.

आनंद माझा आहे, कारण #स‌च्चिदानंद माझा आहे.

५.मन:सामर्थ्यदाता, रत्नागिरी :-🎻🪘
(७ जानेवारी २०२४)

🔅रत्नागिरी येथे ७ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या ’मनःसामर्थ्यदाता’ या भक्तिमय सत्संग सोहळ्याची रूपरेषा साधारणतः पुढील प्रमाणे होती :

१) कार्यक्रम स्थळी प्रवेश घेण्याची वेळ – दुपारी २ वाजल्यापासून.
२) सर्व श्रद्धावानांनी कार्यक्रमासाठी स्थानापन्न होण्याची वेळ – दुपारी ४:०० वाजेपर्यंत.
३) सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापूंचा गजर – दुपारी ४:२० वाजता.
४) प्रार्थना – दुपारी ४:२५ वाजता.
५) सत्संगाची सुरुवात – दुपारी ४:३० वाजता.
६) मध्यांतर – संध्याकाळी ६:३० वाजता.
७) कार्यक्रमाच्या दुसर्‍या सत्राची सुरुवात – संध्याकाळी ७:०५ वाजता.
८) कार्यक्रमाची सांगता – रात्रौ ९:३० वाजता.

🔅 रत्नागिरीत रविवार दि.७ जानेवारी २०२४ रोजी प्रमोद महाजन स्टेडियमवर अनिरुद्ध बापूंवरील भक्तीरसमय रचनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

हा कार्यक्रम न भूतो न भविष्यती असा आणि इतका यशस्वी झाला की या कार्यक्रमाने बापुभक्तांचे पारणे फेडले.
बापूभक्त म्हणजे एक वेड्यांची मांदियाळी! आपल्या भगवंतावर आणि आपल्या सद्गुरूंवर कसं प्रेम करावं?कशी भक्ती करावी?कशी आस्था असावी?आणि पुरेपूर विश्वास किती असावा?याची एक पाठशाला आहे. त्याचा वर्ग रत्नागिरीत घेण्यात आला. बापूभक्तांनी त्याला भरपूर, भरघोस,भरीव वाटावा असा अमाप प्रतिसाद देऊन तो कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी केला.
सद्गुरू अनिरुद्ध बापू ,माता नंदाई आणि भ्राता सुचितदादा यांच्या अनुपस्थितीनेही कार्यक्रम बहारदार व्हावा हे त्या सद्गुरू अनिरुद्धांवरच्या त्याच्या भक्तांच प्रेम ही साक्ष मानावी लागेल
सध्या रत्नागिरी खोदलेली आहे, दळणवळणाची बोंबाबोंब,त्यात हजारो सद्गुरू भक्त रत्नागिरीत प्रवेश करणार? म्हणजे केवढा मोठा विसंवाद!
पण सद्गुरू अनिरुद्धांच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली,माझ्या सद्गुरूच्या कार्यक्रमास कुठेही गालबोट लागणार नाही हा त्या मागचा ध्यास,परिस्थिती कितीही प्रतिकूल असो,त्याच्यावर मात करण्याची ताकद आणि जिद्द अनिरुद्ध बापूंचे कसलेले फौजी म्हणजेच त्यांचे कार्यकर्ते यांनी ज्या कौशल्याने रस्त्यावरील वाहतुक यंत्रणा हाताळली,
ते त्यांचे कसब पाहून रत्नागिरीतील पोलिस वाहतूक यंत्रणाही चकित झाली.सुमारे वीस हजारांचा अनिरुद्ध भक्तांचा समुदाय रत्नागिरीत आला पण हा भक्तीचा भूकंप
रत्नागिरीकरांना तसूभर ही जाणवला नाही.
हे श्रेय आहे कार्यकर्त्यांचं,भक्तांचं आणि नियोजन समितीचं!आपल्या देवावर किती प्रेम असावं,ते कसं असावं,याचा वस्तुपाठ शिकवणारं एक शिबिर रत्नागिरीत नुकतंच पार पडलं आणि त्यात लोकांनी प्रचंड आनंद अनुभवला.
बेभानपणे नाचले,गायले,बागडले आणि भक्तिरसात ओथंबून न्हाऊन निघाले.

🌺हरिओम 🌺श्रीराम🌺 अंबज्ञ 🌺
🙌🙌नाथसंविध्🙌🙌
🙌🙌नाथसंविध्🙌🙌
🙌नाथसंविध्🙌

साभार – WhatsApp

error: Content is protected !!