आजचे पंचांग आणि दिनविशेष- शनिवार, दिनांक १० एप्रिल २०२१
शनिवार, दिनांक १० एप्रिल २०२१
राष्ट्रीय मिती चैत्र – २०
श्री शालिवाहन शके १९४२
तिथी- फाल्गुन कृष्णपक्ष चतुर्दशी ३० वा. ०३ मि. पर्यंत,
नक्षत्र- पू. भाद्रपदा ०६ वा. ४५ मि. पर्यंत,
योग- ब्रह्मा १३ वा. ३२ मि. पर्यंत,
करण १– विष्टि १७ वा. १२ मि. पर्यंत
करण २– शकुनी ३०वा. ०३ मि. पर्यंत
राशी- मीन अहोरात्र
सूर्योदय- ०६ वाजून २७ मिनिटे
सूर्यास्त- १८ वाजून ५३ मिनिटे
भरती- ११ वाजून २८ मिनिटे, ओहोटी- ०५ वाजून २६ मिनिटे
भरती- २३ वाजून ३५ मिनिटे, ओहोटी- १७ वाजून २३ मिनिटे
दिनविशेष:- शिवरात्री
१८७५ : स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली.
१९१२ : जगप्रसिद्ध टायटॅनिक जहाजाचा पहिला आणि शेवटचा प्रवास सुरू.
१९५३ : हॉलिवूडच्या मोठ्या स्टुडिओचा पहिला रंगीत त्रिमितीय (3 D) चित्रपट ‘हाऊस ऑफ वॅक्स’ प्रदर्शित झाला.
१९५५: योहान साल्क यांनी सर्वप्रथम पोलिओ लसीची यशस्वी चाचणी केली.
१९७२ : जैविक अस्त्रांच्या निर्मितीवर बंदी आणणारा पहिला बहुदेशीय ‘जैविक अस्त्र करार’ ७४ देशांनी स्वीकारला.
१९८२ : भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह ‘इन्सॅट वन्’चे उड्डाण.