उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- शनिवार दिनांक ०२ ऑक्टोबर २०२१

शनिवार दिनांक २ ऑक्टोबर २०२१
राष्ट्रीय मिती आश्विन- १०
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- भाद्रपद कृष्णपक्ष एकादशी रात्री २३ वाजून १० मिनिटांपर्यंत
नक्षत्र- आश्लेषा ३ ऑक्टोबरच्या पहाटे ३ वाजून ३४ मिनिटांपर्यंत
योग- सिद्ध सायंकाळी १७ वाजून ४५ मिनिटांपर्यंत
करण १- बव सकाळी ११ वाजून १२ मिनिटांपर्यंत
करण २- बालव रात्री २३ वाजून १० मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- कर्क ३ ऑक्टोबरच्या पहाटे ३ वाजून ३४ मिनिटांपर्यंत

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ३२ मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून २४ मिनिटांनी होईल.
चंद्रोदय -उत्तररात्री १ वाजून ४६ मिनिटांनी
चंद्रास्त- दुपारी १५ वाजून ३६ मिनिटांनी होईल.

ओहोटी- उत्तररात्री २ वाजून १४ मिनिटांनी आणि दुपारी १५ वाजून ३८ मिनिटांनी
भरती- सकाळी ०९ वाजून १७ मिनिटांनी आणि रात्री २१ वाजून १४ मिनिटांनी असेल.

ऐतिहासिक दिनविशेष:-
१८६९: मोहनदास करमचंद गांधी अर्थात महात्मा गांधी यांचा जन्म झाला.
१९०४: साली भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचा मुगलसराई उत्तरप्रदेश येथे जन्म झाला.
१९६९: साली महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांची प्रतिमा व सही असलेल्या २, ५, १० व १०० रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने जारी केल्या.