ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनची ३ ऑक्टोबरला कणकवली येथे मार्गदर्शनपर कार्यशाळा

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार!

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी):- ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनची ३ ऑक्टोबरला कणकवलीतील मातोश्री मंगल कार्यालय येथे सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान मार्गदर्शनपर कार्यशाळा होणार असून त्यावेळी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सिंधुदुर्गात अशाप्रकारची कार्यशाळा प्रथमच होत असून ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्गातील कार्याला अधिक वेग येणार आहे.

सदर कार्यशाळेत मानवी हक्क, कर्तव्य अधिकार व अंमलबजावणी ह्या विषयावर तज्ञांकडून उपस्थित पदाधिकाऱयांना-सभासदांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार असून भविष्यात सिंधुदुर्गात ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या माध्यमातून जनतेच्या तक्रारींचा पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे इतर सामाजिक समस्यांवर कशाप्रकारे कार्य करायचे? ह्यावर सविस्तर विश्लेषण करण्यात येणार आहे.

ह्या कार्यशाळेला ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे अध्यक्ष एम.डी. चौधरी, राष्ट्रीय सचिव तथा ह्युमन राईट न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक डॉ. जावेद शिकलगार, राष्ट्रीय प्रवक्ते संतोष कदम, राष्ट्रीय कायदेविषयक सल्लागार जेष्ठ विधिज्ञ अनिल कुमार जाधव आणि महाराष्ट्र राज्य निरीक्षक घनश्याम सांडीम उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न होणार असून जिल्ह्यातील विविध विषयातील तज्ञ मंडळी उपस्थित राहतील.

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या मार्गदर्शनपर कार्यशाळेत उपस्थित राहण्याचे आवाहन ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक मनोज तोरस्कर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष अमेय मोरे, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष डॉ. आर. एम .परब, कणकवली तालुकाध्यक्ष परेश परूळेकर, देवगड तालुकाध्यक्ष बाळा धुपकर, कुडाळ तालुकाध्यक्ष डॉ. अरुण गोडकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष संजय सावंत, मालवण तालुकाध्यक्ष सुधीर धुरी, कणकवली तालुका कार्याध्यक्ष हनिफ भाई पिरखान यांनी केले आहे.

You cannot copy content of this page