उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- सोमवार दिनांक १० ऑगस्ट २०२१

मंगळवार दिनांक १० ऑगस्ट २०२१
राष्ट्रीय मिती श्रावण- १९
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- श्रावण शुक्ल पक्ष द्वितीया सायंकाळी १८ वाजून ०६ मिनिटापर्यंत
नक्षत्र- मघा सकाळी ०९ वाजून ५२ मिनिटापर्यंत
योग- परीघ रात्री २० वाजून २८ मिनिटापर्यंत
करण १- बालव सकाळी ०६ वाजून ३४ मिनिटापर्यंत आणि तैतिल ११ ऑगस्ट पहाटे ५ वाजून ३२ मिनिटापर्यंत
करण २- कौलव सायंकाळी १८ वाजून ०६ मिनिटापर्यंत

चंद्रराशी- सिंह अहोरात्र

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून २१ मिनिटांनी होईल.
सूर्यास्त- सायंकाळी १९ वाजून ०७ मिनिटांनी होईल.

चंद्रोदय- पहाटे ०७ वाजून ४२ मिनिटांनी होईल.
चंद्रास्त- सायंकाळी २० वाजून ४६ मिनिटांनी होईल.

भरती- रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी आणि दुपारी १३ वाजून १९ मिनिटांनी होईल.
ओहोटी- सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी आणि सायंकाळी १९ वाजून २७ मिनिटांनी होईल.

दिनविशेष:-
आज आहे मंगळागौरी पूजन- मंगळागौरी व्रत.
मंगळागौर हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे. ते श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिली पाच वर्षे करावयाचे असते. इतर नवविवाहितांनाही बोलावून सकाळी एकत्रित पूजा करतात व त्यानंतर रात्री जागरण करतात. जागरणाच्या वेळी, विविध खेळ खेळण्याचा प्रघात आहे.

ऐतिहासिक घटना
१० ऑगस्ट १५१९ रोजी फर्डिनांड मॅगेलन पाच जहाजे घेऊन पृथ्वी-प्रदक्षिणेसाठी निघाला. हा एक पोर्तुगीज खलाशी होता. १५१९ ते १५२२ दरम्यान पृथ्वीची जलयात्रा सर्वप्रथम पूर्ण करण्याचे श्रेय मेजेलनला दिले जाते. वास्तविकपणे मेजेलन स्वतः ही जगयात्रा पूर्ण करू शकला नाही कारण २७ एप्रिल १५२१ रोजी फिलिपाईन्समधील सेबू ह्या प्रांतात घडलेल्या एका चकमकीत तो ठार झाला.

भारतीय संगीतकार, संगीततज्ञ विष्णू नारायण भातखंडे यांचा जन्म १० ऑगस्ट १८६० रोजी जन्माष्टमी च्या दिवशी मुंबई येथील वाळकेश्वर भागात झाला. झाला. त्यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या वर्गीकरणाची थाट पद्धत विकसित केली. लहानपणापासूनच त्यांचे संगीतकलेवर विशेष प्रेम होते. ते एल्फिन्स्टन कॉलेजमधून बी.ए. झाले. याच काळात त्यांनी गोपालगिरी यांच्याकडून सतारीचे धडे आत्मसात केले. इ.स. १८८५ साली ते कायद्याचे पदवीधर झाले व वकिली करू लागले.

त्यांनी भरताच्या नाट्यशास्त्राचा आणि संगीत रत्नाकर या प्राचीन भारतीय संगीतविषयक ग्रंथांचा अभ्यास केला. त्यांनी राग, रागिण्या आणि पुत्ररागांमध्ये वर्गीकरण करण्याच्या जुन्या पद्धतीऐवजी ‘थाट पद्धत’ नावाची नवी वर्गीकरण पद्धत हिंदुस्तानी संगीतामध्ये आणली.

You cannot copy content of this page