पंचांग आणि दिनविशेष- शुक्रवार दिनांक १० डिसेंबर २०२१

शुक्रवार दिनांक १० डिसेंबर २०२१
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- मार्गशीर्ष शुक्लपक्ष सप्तमी सायंकाळी १९ वाजून ०८ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- शततारका रात्री २१ वाजून ४७ मिनिटांपर्यंत
योग- हर्षण सकाळी ०८ वाजून २० मिनिटांपर्यंत त्यानंतर वज्र ११ डिसेंबररच्या सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांपर्यंत

करण १- गरज सकाळी ७ वाजून २५ मिनिटांपर्यंत
करण २- वणिज सायंकाळी १९ वाजून ०८ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- कुंभ अहोरात्र

सूर्योदय- सकाळी ०७ वाजून ०३ मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजता

चंद्रोदय- दुपारी १२ वाजून २८ मिनिटांनी

भरती- पहाटे ०४ वाजून २२ मिनिटांनी आणि सायंकाळी १६ वाजून ३५ मिनिटांनी
ओहोटी- सकाळी ११ वाजून १३ मिनिटांनी आणि रात्री २२ वाजून ४४ मिनिटांनी

राहुकाळ- सकाळी ११ वाजून ०९ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून ३१ मिनिटांपर्यंत

दिनविशेष- वैभव लक्ष्मीपूजन

आज आहे मानवी हक्क दिन

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या जाहीरनाम्यानुसार १९४८ पासून १० डिसेंबर हा ‘मानवी हक्क दिन’ म्हणून साजरा केला जातो. ‘मानवी हक्क’ हे मूलभूत आणि नैसर्गिक हक्क आहेत, जे माणसाच्या विकासासाठी अत्यावश्यक आहेत. हे हक्क हिरावून घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. जगातील प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित राहावे, त्यांना सन्मानपूर्वक जगता यावे यासाठी १० डिसेंबर हा ‘आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

१० डिसेंबर रोजी घडलेल्या घटना-
१९०१ साली नोबेल पारितोषिकांचे प्रथमच वितरण करण्यात आले.
१९१६ साली ’संगीत स्वयंवर’ या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
१९९८ साली अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक अर्थतज्ज्ञ प्राध्यापक अमर्त्य सेन यांना प्रदान करण्यात आला .

You cannot copy content of this page