उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- शनिवार १४ ऑगस्ट २०२१

शनिवार दिनांक १४ ऑगस्ट २०२१
राष्ट्रीय मिती श्रावण- २३
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- श्रावण शुक्ल पक्ष षष्टी दुपारी ११ वाजून ५० मिनिटापर्यंत आहे.
नक्षत्र- चित्र सकाळी ०६ वाजून ५५ मिनिटापर्यंत नंतर स्वाती सकाळी १५ ऑगस्टच्या पहाटे ५ वाजून ४३ मिनिटापर्यंत,
योग- शुभ दुपारी ११ वाजून ११ मिनिटापर्यंत
करण १- तैतिल दुपारी ११ वाजून ५० मिनिटापर्यंत
करण २- गरज रात्री २२ वाजून ५२ मिनिटापर्यंत

चंद्रराशी- तुळ अहोरात्र

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून २२ मिनिटांनी होईल.
सूर्यास्त- सायंकाळी १९ वाजून ०५ मिनिटांनी होईल.

चंद्रोदय- दुपारी ११ वाजून २८ मिनिटांनी होईल.
चंद्रास्त- रात्री २३ वाजून २४ मिनिटांनी होईल.

ओहोटी- सकाळी ९ वाजून २२ मिनिटे आणि रात्री २२ वाजून ०७ मिनिटे
भरती- पहाटे ३ वाजून ३५ मिनिटे आणि दुपारी १५ वाजून ३९ मिनिटे

आध्यात्मिक दिनविशेष:-

अश्वत्थ मारुती पूजन,
श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे. त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो. पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णूपूजा करणे, असे मानले जाते.
त्याचप्रमाणे प्रत्येक मानवाच्या जीवनात कमीतकमी तीन वेळा येणा-या साडेसातीच्या काळामध्ये प्रारब्धभोगांचा प्रभाव कमी होण्यासाठी व ते भोग भोगण्यास लागणारे सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी श्रीहनुमंताची उपासना अत्यंत फलदायी ठरते.

श्रियाळ षष्टी
श्रावण शुद्ध षष्ठी , म्हणजेच नागपंचमीचा दुसरा दिवस . श्रियाळ पाठी म्हणून हा दिवस प्रसिद्ध आहे . शिवलीलामृतामध्ये श्रियाळ राजाची गोष्ट आपल्याला आढळते . श्रियाळ राजा , त्याची राणी चांगुणा आणि त्यांचा लाडका बाळ चिलिया सर्व कुटुंब शंकराचे भक्त होते .

सितला सप्तमी
स्कंद पुराणानुसार, आई शीतला दुर्गा आणि माता पार्वतीचा अवतार आहे. प्राचीन काळापासून, आदिमातेच्या अनंत प्रकारांच्या प्रमुख शीतला मातेची श्रावण कृष्ण सप्तमीला पूजा केली जाते. परिणामी कुटुंब नैसर्गिक आपत्ती आणि अपघाती आपत्तींपासून सुरक्षित राहते. त्यांची उपासना केल्याने शारीरिक उष्णता, ताप, राजक्षमा, संसर्ग आणि इतर विषाणूंच्या वाईट प्रभावांपासून आराम मिळतो; अशी भक्तांची श्रद्धा आहे.

ऐतिहासिक दिनविशेष:-

१३ ऑगस्ट १९११ रोजी भारतीय तत्त्वज्ञानी वेदतिरी महारिषी यांचा आणि ,

१३ ऑगस्ट १९२५ रोजी मराठी लेखक, नाटककार जयवंत दळवी यांचा जन्म झाला.

१३ ऑगस्ट १९८४ रोजी ऑलिंपिक पदक विजेते, भारतीय कुस्तीगीर खाशाबा जाधव यांचा मृत्यू झाला. इ.स. १९५२ सालातल्या ऑलिंपिकमध्ये त्यांनी जिंकलेले फ्रीस्टाइल कुस्तीतले कांस्यपदक हे भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले वैयक्तिक पदक होते. खाशाबा जाधव यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यातील गोळेश्वर खेड्यात झाला.

You cannot copy content of this page