दिप्ती लुडबे स्मरणार्थ १४ ऑगस्टला वायरी. ता. मालवण येथे रक्तदान शिबीर

मालवण:- वायरी लुडबेवाडी मित्रमंडळ आयोजित शनिवार १४ ऑगस्टला सकाळी ९ ते २ दरम्यान चव्हाण मंगल कार्यालय वायरी ता.मालवण येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

अपघातग्रस्त व्यक्ती, गरोदर महिला, थॅलेसिमिया रुग्ण, कॅन्सर, डायलिसिस रुग्ण, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण ह्या सारख्या गरजू रुगांना आपल्या रक्तदानाची अतिआवश्यकता असते. आताच्या घडीला रक्तसाठा कमी असल्याने रक्तदान करण्यासाठी सुदृढ नागरिकांना कळकळीचे आवाहन वायरी लुडबेवाडी मित्रमंडळाने केले आहे. रक्तदान शिबिरादरम्यान शासकीय नियमांचे पालन करण्यात येणार असून सर्व काळजी घेण्यात येणार आहे.

रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी सहकार्य खालील स्वयंसेवकांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क:-
⛑️ चिन्मय लुडबे :-7822895330
⛑️ चेतन लुडबे :-7219439117
⛑️ वैभव लुडबे :-8459582196
⛑️ नारायण लुडबे :- 7507396694
⛑️ मयू लुडबे:-9021423802
⛑️ बाळा लुडबे:-7588903003
⛑️ आशू लुडबे:-7588899003
⛑️ पपू लुडबे :- 8275650459
⛑️ विराज लुडबे :- 9156130711
⛑️श्रवण लुडबे :-8421073802