उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- मंगळवार १८ ऑगस्ट २०२१

बुधवार दिनांक १८ ऑगस्ट २०२१
राष्ट्रीय मिती श्रावण- २७
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- श्रावण शुक्ल पक्ष एकादशी १९ ऑगस्टच्या रात्री १ वाजून ०६ मिनिटापर्यंत

नक्षत्र- मूळ १९ ऑगस्टच्या रात्री १२ वाजून ०६ मिनिटापर्यंत,
योग- विष्कंभ रात्री २१ वाजून ०८ मिनिटापर्यंत

करण १- वणिज संध्याकाळी १४ वाजून १३ मिनिटापर्यंत
करण २- विष्टि १९ ऑगस्टच्या रात्री १ वाजून ०६ मिनिटापर्यंत

चंद्रराशी- धनु अहोरात्र

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून २३ मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १९ वाजून ०२ मिनिटांनी आणि

चंद्रोदय- सायंकाळी १५ वाजून ३७ मिनिटांनी होईल.
चंद्रास्त- रात्री १ वाजून ५३ मिनिटापर्यंत.

ओहोटी- रात्री १ वाजून २९ वाजता आणि दुपारी १४ वाजून ४१ मिनिटांनी
भरती- सकाळी ८ वाजून ३८ मिनिटे आणि रात्री २० वाजता

दिनविशेष:- आज आहे पुत्रदा एकादशी आणि बुध पूजन!

ऐतिहासिक दिनविशेष: १८ ऑगस्ट रोजी झालेल्या घटना.

१८४१ साली जगात सर्वप्रथम ब्रिटनमधे राष्ट्रीय अग्निशमन दलाची स्थापना झाली.

१९२० साली अमेरिकेच्या स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.

आज आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची पुण्यतिथी!
हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. त्यांना नेताजी सुद्धा म्हटले जाते. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती. त्यांनी दिलेला जय हिंदचा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे. त्यांनी “तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा” असे भारतीयांना आवाहन केले होते.