उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- गुरुवार २ सप्टेंबर २०२१

गुरुवार दिनांक २ सप्टेंबर २०२१
राष्ट्रीय मिती भाद्रपद- ११
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- श्रावण कृष्णपक्ष एकादशी अहोरात्र
नक्षत्र- आर्द्रा दुपारी १४ वाजून ५५ मिनिटांपर्यंत
योग- सिद्धि सकाळी १० वाजून ०७ मिनिटांपर्यंत
करण १- बव संध्याकाळी १९ वाजून ०७ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- मिथुन अहोरात्र

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून २६ मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून ५० मिनिटांनी होईल.

चंद्रोदय- रात्री १ वाजून ४६ मिनिटांनी तर
चंद्रास्त- दुपारी १५ वाजून ३६ मिनिटांनी होईल.

ओहोटी- रात्री १ वाजून ४३ मिनिटांनी आणि दुपारी १५ वाजून २१ मिनिटांनी
भरती- सकाळी ०९ वाजून १३ मिनिटांनी आणि सायंकाळी २० वाजून २० मिनिटांनी

दिनविशेष:- बृहस्पती पूजन!

ऐतिहासिक दिनविशेष

२ सप्टेंबर रोजी घडलेल्या घटना.

१९२० साली महात्मा गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन सुरु केले.

१९४५ साली व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.

१९९९ साली भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणारी आशियातील पहिली महिला ठरली.

१८३८ साली भारतीय गुरु आणि तत्वज्ञ भक्तिविनाडो ठाकूर आणि

१८८६ साली साहित्यिक, विचारवंत व अस्पृश्यता निवारणासाठी सतत प्रयत्न करणारे कृतिशील समाजसुधारक प्रा. श्रीपाद महादेव माटे यांचा जन्म झाला.

१९७६ साली ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कादंबरीकार वि. स. खांडेकर आणि

२०११ साली संगीतकार श्रीनिवास खळे यांचे निधन झाले.