उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- शुक्रवार ३ सप्टेंबर २०२१

शुक्रवार दिनांक ३ सप्टेंबर २०२१
राष्ट्रीय मिती भाद्रपद- १२
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- श्रावण कृष्णपक्ष एकादशी सकाळी ७ वाजून ४३ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- पुनर्वसू सायंकाळी १६ वाजून ४० मिनिटांपर्यंत
योग- व्यतिपात सकाळी १० वाजून ०८ मिनिटांपर्यंत
करण १- बालव सकाळी ०७ वाजून ४३ मिनिटांपर्यंत
करण २- कौलव रात्री २० वाजून ०९ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- मिथुन सकाळी १० वाजून १८ मिनिटांपर्यंत

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून २६ मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून ४९ मिनिटांनी होईल.

चंद्रोदय- रात्री २ वाजून ४० मिनिटांनी तर
चंद्रास्त- सायंकाळी १६ वाजून २७ मिनिटांनी होईल.

ओहोटी- रात्री २ वाजून ५२ मिनिटांनी आणि दुपारी १६ वाजून १३ मिनिटांनी
भरती- सकाळी १० वाजून ०४ मिनिटांनी आणि सायंकाळी २१ वाजून ३४ मिनिटांनी

दिनविशेष:- आज आहे अजा एकादशी आणि जरा जिवंतिका पूजन!

ऐतिहासिक दिनविशेष

३ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना.

३०१: जगातील सर्वात जुने प्रजासत्ताक राष्ट्र सॅन मरीनो स्थापित झाले. सान मारिनो हा युरोपातील एक छोटा देश आहे. सान मारिनो देश पुर्णपणे इटली देशाच्या अंतर्गत आहे. सान मारिनो हा युरोपातील तिसरा सर्वात लहान देश आहे.

१७५२: अमेरिकेत ग्रेगरियन कॅलेंडरचा वापर सुरू झाला.