उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- रविवार २२ ऑगस्ट २०२१

रविवार दिनांक २२ ऑगस्ट २०२१
राष्ट्रीय मिती श्रावण- ३१
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- श्रावण पौर्णिमा सायंकाळी १७ वाजून ३१ मिनिटापर्यंत,
नक्षत्र- धनिष्ठा सायंकाळी १९ वाजून ३९ मिनिटापर्यंत,
योग- शोभन सकाळी १० वाजून ३२ मिनिटापर्यंत

करण १- बव सायंकाळी १७ वाजून ३१ मिनिटापर्यंत
करण २- बालव २३ ऑगस्टच्या पहाटे ४ वाजून ५७ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- मकर सकाळी ७ वाजून ५६ मिनिटांपर्यंत

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून २४ मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून ५९ मिनिटांनी आणि

चंद्रोदय- सायंकाळी १९ वाजून १२ मिनिटांनी होईल.
चंद्रास्त- सकाळी ६ वाजता

ओहोटी- पहाटे ०५ वाजून ३४ मिनिटांनी आणि सायंकाळी १८ वाजून २४ मिनिटांनी
भरती- दुपारी १२ वाजून ०८ मिनिटे

दिनविशेष:- आज आहे नारळी पौर्णिमा, रक्षा बंधन, अन्वाधान, आदित्य पूजन, तैत्तिरिय श्रावणी.

ऐतिहासिक दिनविशेष:-
१९८२ साली क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारकाचे शिल्पकार एकनाथ रानडे यांचे निधन झाले. एकनाथ रामकृष्ण रानडे, ज्यांना एकनाथजीही म्हणत असत, हे भारतातील सामाजिक व आध्यात्मिक चळवळीतील एक खंदे कार्यकर्ते होते. ते आपल्या संघटनात्मक कार्यासाठी नावाजलेले होते. त्यांनी कन्याकुमारी येथे विवेकानंद शिला स्मारकाची आणि विवेकानंद केंद्र या सामाजिक व आध्यात्मिक संस्थेची स्थापना केली.