पंचांग आणि दिनविशेष- बुधवार दिनांक २४ नोव्हेंबर २०२१

बुधवार दिनांक २४ नोव्हेंबर २०२१
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- कार्तिक कृष्णपक्ष पंचमी २५ नोव्हेंबरच्या पहाटे ३ वाजून ३ मिनिटापर्यंत
नक्षत्र- पुनर्वसु सायंकाळी १६ वाजून २८ मिनिटांपर्यंत
योग- शुभ सकाळी ७ वाजून २८ मिनिटापर्यंत

करण १- कौलव दुपारी १४ वाजून ०२ मिनिटांपर्यंत
करण २- तैतिल २५ नोव्हेंबरच्या पहाटे ३ वाजून ३ मिनिटापर्यंत

चंद्रराशी- मिथुन सकाळी ९ वाजून ४९ मिनिटापर्यंत

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ५३ मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १७ वाजून ५७ मिनिटांनी होईल

चंद्रोदय- रात्री २१ वाजून ५९ मिनिटांनी
चंद्रास्त- सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी होईल

भरती- रात्री ०२ वाजून ३६ मिनिटांनी आणि दुपारी १४ वाजून ०७ मिनिटांनी
ओहोटी- सकाळी ८ वाजून ३४ मिनिटांनी आणि रात्री २० वाजून ०६ मिनिटांनी

राहुकाळ- दुपारी १२ वाजून २५ मिनिटांपासून दुपारी १३ वाजून ४९ मिनिटांपर्यंत

दिनविशेष: आज आहे शहीद दिन!

१६७५ साली शिखांगुरू तेग बहादूरचे नववे गुरू यांनी धर्माच्या रक्षणार्थ आपले बलिदान दिले. म्हणून हा दिवस शहिद दिन म्हणून पाळला जातो. शिखांचे नववे गुरू गुरू तेग बहादूर यांचा जन्म १ एप्रिल १६२१ रोजी झाला.

१९६९ साली अपोलो-१२ हे यान चंद्रावर उतरले.

१९९२ साली देवगड तालुक्यातील कवी माधव यांना पहिला कवी माधव पुरस्कार जाहीर झाला.