पंचांग आणि दिनविशेष- गुरुवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२१
आज सकाळी ६ वाजून ५४ मिनिटांपासून सायंकाळी १८ वाजून ४८ मिनिटांपर्यंत गुरुपुष्यामृत योग
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- कार्तिक कृष्णपक्ष षष्टी २६ नोव्हेंबरच्या पहाटे ४ वाजून ४२ मिनिटापर्यंत
नक्षत्र- पुष्य सायंकाळी १८ वाजून ४८ मिनिटांपर्यंत
योग- शुक्ल सकाळी ७ वाजून ५६ मिनिटापर्यंत
करण १- गरज दुपारी १५ वाजून ५६ मिनिटांपर्यंत
करण २- वणिज २६ नोव्हेंबरच्या पहाटे ०४ वाजून ४२ मिनिटापर्यंत
चंद्रराशी- कर्क अहोरात्र
सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ५४ मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १७ वाजून ५७ मिनिटांनी होईल
चंद्रोदय- रात्री २२ वाजून ५३ मिनिटांनी
चंद्रास्त- सकाळी ११ वाजून ४१ मिनिटांनी
भरती- रात्री ०३ वाजून १४ मिनिटांनी आणि दुपारी १४ वाजून ४७ मिनिटांनी
ओहोटी- सकाळी ९ वाजून २१ मिनिटांनी आणि रात्री २० वाजून ४५ मिनिटांनी
राहुकाळ- दुपारी १३ वाजून ४९ मिनिटांपासून दुपारी १५ वाजून १२ मिनिटांपर्यंत आहे.
१६६४ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया घातला आणि बांधकामाला सुरुवात झाली. त्याचे बांधकाम गोविंद विश्वनाथ प्रभू यांनी केले. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २१ जून २०१० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
१८८२ साली मराठी चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर तर
१९२१ साली नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांचा जन्म झाला.
१९२२ साली मधुमेह या आजारावरील इन्सुलिनचा शोध फ्रेडरिक बँटिंग यांनी जाहीर केला.
१९६२ साली आधुनिक संतकवी आणि शिर्डीच्या साईबाबांचे परमभक्त गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू महाराज यांनी समाधी घेतली.
१९८४ साली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे निधन झाले.