उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- सोमवार दिनांक २७ सप्टेंबर २०२१
सोमवार दिनांक २७ सप्टेंबर २०२१
राष्ट्रीय मिती आश्विन-५
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- भाद्रपद कृष्णपक्ष षष्टी सायंकाळी १५ वाजून ४२ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- रोहिणी सायंकाळी १७ वाजून ४० मिनिटांपर्यंत
योग- सिद्धि सायंकाळी १६ वाजून ४९ मिनिटांपर्यंत
करण १- वणिज सायंकाळी १५ वाजून ४२ मिनिटांपर्यंत
करण २- विष्टि २८ सप्टेंबरच्या पहाटे ५ वाजून ०१ मिनिटापर्यंत
चंद्रराशी- वृषभ अहोरात्र
सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ३१ मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून २८ मिनिटांनी होईल.
चंद्रोदय- रात्री २२ वाजून ५० मिनिटांनी तर
चंद्रास्त- सकाळी ११ वाजून ४३ मिनिटांनी होईल.
ओहोटी- सकाळी ९ वाजून ०६ मिनिटांनी आणि रात्री २१ वाजून १३ मिनिटांनी तर
भरती- पहाटे ३ वाजून २२ मिनिटांनी आणि दुपारी १४ वाजून ५९ मिनिटांनी असेल.
दिनविशेष:- आज आहे, जागतिक प्रवासी दिन.
ऐतिहासिक दिनविशेष:-
१८२५ साली द स्टॉक्टन अँड डार्लिंग्टन रेल्वेने जगातील सर्वप्रथम प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू केली.
१९२५: डॉ. केशव हेडगेवार द्वारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरएसएसची स्थापना.
१९०७ साली भारतीय क्रांतिकारी भगत सिंग यांचा जन्म झाला. हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या लढ्यात त्यांनी केलेल्या दोन हिंसात्मक कार्यांमुळे वयाच्या २३व्या वर्षी २३ मार्च, १९३१ रोजी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली.
१८३३ साली भारतीय पुनर्जागरणाचे अग्रदूत आणि आधुनिक भारताचे जनक तसेच समाजसुधारक व ब्राह्मो समाजाचे जनक राजा राममोहन रॉय यांचे निधन झाले.