उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- मंगळवार दिनांक २८ सप्टेंबर २०२१

मंगळवार दिनांक २८ सप्टेंबर २०२१
राष्ट्रीय मिती आश्विन- ०६
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- भाद्रपद कृष्णपक्ष सप्तमी सायंकाळी १८ वाजून १५ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- मृगशीर्ष रात्री २० वाजून ४२ मिनिटांपर्यंत
योग- व्यतिपात सायंकाळी १७ वाजून ४८ मिनिटांपर्यंत
करण १- बव सायंकाळी १८ वाजून १५ मिनिटांपर्यंत
चंद्रराशी- वृषभ सकाळी ०७ वाजून १३ मिनिटांपर्यंत

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ३१ मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून २७ मिनिटांनी होईल.

चंद्रोदय- रात्री २३ वाजून ३७ मिनिटांनी तर
चंद्रास्त- सकाळी १२ वाजून ३५ मिनिटांनी होईल.

ओहोटी- सकाळी ०९ वाजून ४९ मिनिटांनी आणि रात्री २१ वाजून ५५ मिनिटांनी तर
भरती- पहाटे ०४ वाजून ०५ मिनिटांनी आणि दुपारी १५ वाजून ३० मिनिटांनी असेल.

ऐतिहासिक दिनविशेष:-
१९२४: साली पहिली पृथ्वी प्रदक्षिणा करणारी विमान फेरी पूर्ण झाली.
१९२८: साली सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना प्रयोगशाळेत विशिष्ट प्रकारच्या जिवाणूंची वाढ होताना आढळली. यातूनच पुढे पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा शोध लागला.
१९२९: साली ‘भारतरत्‍न’ पुरस्कार प्राप्त भारतीय कोकिळा लता मंगेशकर यांचा जन्म झाला.