पंचांग आणि दिनविशेष- बुधवार दिनांक २९ डिसेंबर २०२१

बुधवार दिनांक २९ डिसेंबर २०२१
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- मार्गशीर्ष कृष्णपक्ष दशमी सायंकाळी १६ वाजून १२ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- स्वाती ३० डिसेंबरच्या उत्तररात्री २ वाजून ३८ मिनिटांपर्यंत
योग- सुकर्मा ३० डिसेंबरच्या उत्तररात्री १ वाजून १६ मिनिटांपर्यंत
करण १- विष्टि संध्याकाळी १६ वाजून १२ मिनिटांपर्यंत
करण २- बव ३० डिसेंबरच्या पहाटे ०३ वाजून ०० मिनिटांपर्यंत
चंद्रराशी- तूळ अहोरात्र

सूर्योदय- सकाळी ०७ वाजून १३ मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून ०९ मिनिटांनी

चंद्रोदय- उत्तररात्री ०२ वाजून १३ मिनिटांनी
चंद्रास्त- दुपारी १४ वाजून १३ मिनिटांनी

भरती- सकाळी ०६ वाजून ५८ मिनिटांनी आणि रात्री २० वाजून ३७ मिनिटांनी
ओहोटी- उत्तरात्री ०१ वाजून ०१ मिनिटांनी आणि दुपारी १३ वाजून ५० मिनिटांनी

राहुकाळ- दुपारी १२ वाजून ४१ मिनिटांपासून दुपारी ०२ वाजून ०३ मिनिटांपर्यंत
——————————————————–
दिनविशेष:-
श्रीब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज समाधी दिन.

१९००साली मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचा जन्म झाला.
दीनानाथ गणेश मंगेशकर गायक, नाट्यअभिनेते, संगीतकार होते. या गायक नटाला श्री.कृ. कोल्हटकरांनी मास्टर ही उपाधी बहाल केली, आणि तेव्हापासून ते मास्टर दीनानाथ मंगेशकर झाले.