पंचांग आणि दिनविशेष- शुक्रवार दिनांक ०३ डिसेंबर २०२१

शुक्रवार दिनांक ०३ डिसेंबर २०२१
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- कार्तिक कृष्णपक्ष चतुर्दशी सायंकाळी १६ वाजून ५६ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- विशाखा दुपारी १३ वाजून ४४ मिनिटांपर्यंत
योग- अतिगंड दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांपर्यंत

करण १- शकुनी सायंकाळी १६ वाजून ५६ मिनिटांपर्यंत
करण २- चतुष्पाद ४ डिसेंबरच्या पहाटे ०३वाजून ०५ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- तुळ सकाळी ८ वाजून २६ मिनिटांपर्यंत

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ५९ मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १७ वाजून ५८ मिनिटांनी होईल

चंद्रोदय- पहाटे ०५ वाजून ३४ मिनिटांनी
चंद्रास्त- सायंकाळी १७ वाजून १२ मिनिटांनी

भरती- सकाळी १० वाजून ३२ मिनिटांनी आणि रात्री २३ वाजून ३६ मिनिटांनी
ओहोटी- पहाटे ०४ वाजून ४५ मिनिटांनी आणि सायंकाळी १६ वाजून ५० मिनिटांनी

राहुकाळ- सकाळी ११ वाजून ०५ मिनिटांपासून ते दुपारी १३वाजून २८ मिनिटांपर्यंत

दिनविशेष
३ डिसेंबर रोजी झालेल्या घटना.

१८८४ साली स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा जन्म झाला.

कवियत्री बहिणाबाई चौधरी यांचा स्मृती दिन

भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा स्मृती दिन! त्यांचे निधन १९७९ साली झाले.

१९८४ साली भोपाळ वायू दुर्घटना घडली. भोपाळमधील युनियन कार्बाईड या कारखान्यातून मेथिल आयसो सायनेट या विषारी वायूची गळती होऊन सुमारे चौदाशे लोक लगेच मृत्युमुखी पडले तर नंतरच्या काही वर्षांत मृतांची एकूण संख्या सुमारे २०,००० इतकी झाली. तर ५ लाखाहून जास्त जण जखमी अथवा अपंग झाले. भोपाळ वायु दुर्घटना ही उद्योगजगतातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी दुर्घटना गणली जाते.

२०११ साली हिंदी चित्रपट अभिनेते देव आनंद यांचे लंडन यथे निधन झाले.